प्रात्येक चांगल्या कार्यासाठी स्वतःला स्वेच्छेने सादर करणे
१ एका जगिक प्राकाशनाने यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत असे म्हटले: “साक्षीदारांप्रामाणे आपल्या धर्माकरता अतिशय कष्टाने कार्य करणारे इतर गटातील सदस्य मिळणे फारच कठीण असेल.” यहोवाचे साक्षीदार इतक्या कष्टाने व अशा स्वेच्छिक आत्म्याने कार्य का करतात?
२ त्याचे एक कारण म्हणजे, आवश्यकतेच्या जाणीवेने त्यांना स्फूर्ती मिळाली आहे. पृथ्वीवरील आपले कार्य संपवण्याकरता येशूकडे मर्यादित वेळ होती हे त्याने जाणले. (योहा. ९:४) देवाचा गौरवी पुत्र आज त्याच्या शत्रुंवर विजय मिळवीत असता, यहोवाच्या लोकांना त्यांचे कार्य करण्यासाठी फारच मर्यादित वेळ उरली आहे याची जाणीव आहे. यास्तव, ते स्वतःला पवित्र सेवेकरता स्वेच्छेने सादर करत असतात. (स्तोत्र ११०:१-३) कापणी करण्यासाठी आणखी कामकऱ्यांची गरज असल्यामुळे त्यांच्या प्रायत्नात कोणत्याही प्राकारची ढिलाई असू शकत नाही. (मत्त. ९:३७, ३८) यास्तव, ज्याने स्वेच्छेचे व आपल्या कार्यात मेहनतीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले त्या येशूचे अनुकरण करण्याचा प्रायत्न ते करतात.—योहा. ५:१७.
३ यहोवाचे साक्षीदार यहोवाकरता संपूर्ण जिवाने कार्य करतात त्याचे आणखी एक कारण हे की त्यांची जगव्याप्त संघटना इतर सर्व गटांपासून वेगळी आहे. जगिक धार्मिक संघटना त्यांच्या अनुयायांकडून केवळ कमीतकमी वेळ व प्रायत्नाची विशिष्टपणे अपेक्षा करतात. ते, जो विश्वास करतात याचा त्यांच्या दैनिक जीवनावर, इतरांसोबतच्या व्यवहारावर किंवा जीवनातील त्यांच्या कार्यांवर थोडा किंवा काहीच परिणाम होत नाही. खऱ्या विश्वासाची चालना देणारी शक्ती नसल्यामुळे ते त्यांच्या मेंढपाळांना ‘गोड गोड गोष्टी सांगण्यास’ गळ घालतात व त्यांचे वरवरचे प्रायत्न पुरेसे आहेत याची खात्री देतात. (यश. ३०:१०) त्यांच्या पाळकांनी ‘आपल्या कानांची खाज जिरवून’ उपकार केले आहेत व औदासिन्य तसेच आध्यात्मिक आळशीपणाचा आत्मा मनात हळूहळू रुजवला आहे.—२ तीम. ४:३.
४ यहोवाच्या लोकांमध्ये याच्या किती विरुद्ध घडत आहे! आपल्या उपासनेच्या प्रात्येक गोष्टीत श्रम, कष्ट व काम गोवलेले आहे. दर दिवशी तसेच आपण करतो त्या प्रात्येक गोष्टीत, आपण जो विश्वास बाळगतो तेच अनुसरतो. सत्यामुळे आपल्याला पुष्कळ आनंद मिळत असला, तरी ते आपल्याकडून जी अपेक्षा करते त्यास पूर्ण करण्यासाठी ‘मोठे कष्ट’ करावे लागते. (पडताळा १ थेस्सलनी. २:२.) दैनंदिन जीवनाच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष देणे एवढीच गोष्ट बहुतेक लोकांना व्यग्र ठेवण्याकरता पुरेशी आहे. तथापि, आपण या चिंतांना, राज्य आस्था प्राथम स्थानी ठेवण्यापासून आपल्याला रोखण्यास वाव देत नाही.—मत्त. ६:३३.
५ आपल्याला यहोवाच्या सेवेत जे करायला दिले आहे ते इतके लाभदायक व निकडीचे आहे की, इतर गोष्टींमधून वेळ ‘विकत घेऊन’ आध्यात्मिक बाबींमध्ये त्याचा अधिक फायदेकारक पद्धतीने उपयोग करण्यास आपण प्रावृत्त होतो. (इफिस. ५:१६, NW) आपली ईश्वारी भक्ती व स्वेच्छेचा आत्मा यहोवाला संतुष्ट करतात हे माहीत असल्यामुळे, आपले परिश्रमाचे कार्य करत राहण्यास आपल्याला सर्वात अधिक प्रोरणा मिळते. आपल्याला आता प्राप्त होणारे समृद्ध आशीर्वाद तसेच भवितव्यातील जीवनाची आशा यामुळे, राज्य आस्थेसाठी “श्रम व खटपट” करीत राहण्याचा आपला दृढनिश्चय आहे.—१ तीम. ४:१०.
६ समर्पण आणि स्व-त्यागी आत्मा: बहुतेक लोक आज सर्व गोष्टींपेक्षा भौतिक गरजा व आस्थांना प्राधान्य देतात. काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे यावर लक्ष केंद्रित करणे त्यांना पूर्णपणे योग्य असे वाटते. (मत्त. ६:३१) आवश्यक गोष्टींमध्ये समाधान न मानता, ते आता चांगल्या राहणीमानाचा संपूर्ण आनंद घेण्याच्या ध्येयाने प्रावृत्त होतात व ‘पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवतात म्हणजे ते विसावा घेऊ शकतात व खाऊन, पिऊन आनंद करू शकतात.’ (लूक १२:१९) चर्चला जाणाऱ्या विशिष्ट व्यक्तीला तिच्या धर्माकडून अपेक्षित असलेले कोणतेही व्यक्तिगत श्रम तिच्या हक्कांवर अतिक्रमण आहे असे वाटते. एखाद्या भौतिक ध्येयाचा त्याग करणे किंवा ते कमी करणे किंवा सुखकारक आस्थेची गोष्ट सोडून देण्याची कल्पना देखील नापसंतीची आहे. त्या व्यक्तीचे विचार स्वतःवर केंद्रित झालेले असून, स्व-त्यागी आत्मा विकसित करणे काल्पनिक किंवा अव्यवहार्य असते.
७ आपण या बाबीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. देवाच्या वचनाने आपले विचार उच्च झाल्यामुळे आपण मनुष्यांऐवजी देवाच्या विचारांचे मनन करतो. (यश. ५५:८, ९) आपल्या जीवनातील ध्येये दैहिक ध्येयांपेक्षा वरचढ आहेत. यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण हे सबंध विश्वामध्ये सर्वात महत्त्वाचे विषय आहेत. हे विषय इतके मोठे आहेत की, त्यांच्या तुलनेत सर्व राष्ट्रे “त्याजपुढे काहीच नाहीत.” (यश. ४०:१७) देवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रायत्न मूर्खपणाचा असल्याप्रामाणे त्याकडे पाहण्यात आले पाहिजे.—१ करिंथ. ३:१९.
८ काही भौतिक गोष्टी आवश्यक असतात व इतर आपल्या राज्याच्या कार्यहालचाली चालू ठेवण्यास उपयुक्त असतात, तरीपण या खरोखर “श्रेष्ठ” गोष्टी नाहीत असे आपण समजतो. (फिलिप्पै. १:१०) आपल्या भौतिक आस्थेचा पिच्छा मर्यादित ठेवताना व ‘सार्वकालिक अदृश्य गोष्टींवर’ आपले लक्ष लावण्याकरता सुज्ञतेने प्रायत्न करताना आपण १ तीमथ्य ६:८ मधील मनोवृत्ती अनुसरतो.—२ करिंथ. ४:१८.
९ आपण देवाच्या विचारांचे जितके अधिक मनन करतो तितकीच भौतिक गोष्टींबद्दल आपल्याला कमी चिंता वाटते. यहोवाने आपल्यासाठी आधीच केलेल्या गोष्टींचा व भवितव्यासाठी त्याने अभिवचन दिलेल्या अद्भुत आशीर्वादांचा आपण गंभीरपणे विचार करतो त्यावेळी त्याने आपल्याकडून अपेक्षा केलेल्या गोष्टींचा त्याग करण्यास आपण इच्छुक असतो. (मार्क १०:२९, ३०) आपल्या अस्तित्वाबद्दलच आपण त्याचे ऋणी आहोत. त्याने दया व प्रोम दाखवले नसते, तर आता आपल्या जीवनात कोणत्याच प्राकारचा आनंद राहिला नसता तसेच आपल्याला कोणत्याही प्राकारचे भवितव्य मिळाले नसते. आपण त्याच्या सेवेत जे काही करतो ते आपले ‘कर्तव्य असल्यामुळे’ स्वतःला सादर करणे भाग पाडणारे असल्याचे आपल्याला वाटते. (लूक १७:१०) यहोवाला परत काही देण्यास आपल्याला सांगण्यात येते तेव्हा, आपण ‘सढळ हाताने कापणी करू’ हे जाणून आनंदाने ते अर्पण करतात.—२ करिंथ. ९:६, ७.
१० इच्छुक कामकऱ्यांची आता गरज आहे: अगदी सुरवातीपासूनच, ख्रिस्ती मंडळीने आवेशी कार्यहालचालीच्या काळात प्रावेश केला. सा. यु. ७० मध्ये जेरूसलेमचा पाडाव होण्याआधी सर्वस्वी साक्ष द्यावयाची होती. त्या वेळी, येशूचे शिष्य, “वचन सांगण्यात . . . गढून गेले होते.” (प्रो. कृत्ये १८:५) जलद प्रागतीमुळे आणखी सुवार्तिकांना व कुशल मेंढपाळांना प्राशिक्षण देणे तसेच त्यांची मदत मिळवणे आवश्यक बनले. जगिक अधिकाऱ्यांसोबत व्यवहार राखण्याचा अनुभव असणाऱ्या तसेच भौतिक गोष्टी साठवणे व त्यांचे वितरण करणे यावर देखरेख करू शकणाऱ्या कार्यक्षम पुरुषांची गरज होती. (प्रो. कृत्ये ६:१-६; इफिस. ४:११) थोडकेच सेवा करण्यामध्ये ठळकपणे दिसून येत होते परंतु बहुतांश दृष्टिआड होते. परंतु, सर्वांनी कार्य पूर्ण व्हावे म्हणून संपूर्ण अंतःकरणाने एकत्र काम करण्यासाठी “नेटाने यत्न” केला.—लूक १३:२४.
११ नंतरच्या शतकांमध्ये जागतिक प्रामाणावर नेटाने कार्यहालचाल करण्याची तुलनात्मकरित्या पाहता फारच कमी गरज होती, तरी १९१४ मध्ये येशूने राज्य सत्ता हाती घेतली त्या वेळी राज्याच्या कार्यहालचालीचे पुनरुज्जीवन झाले. राज्य आस्थेसाठी कामकऱ्यांची गरज, म्हणजेच संपूर्ण जगभरातील देशांमध्ये लक्षावधी इच्छुक जणांच्या मदतीची गरज इतकी वाढेल हे सुरवातीला फार कमी जणांनी जाणले.
१२ आज संघटना अनेक विविध प्राकल्पांमध्ये गुंतलेली असल्यामुळे आपल्या ठेव्यांवर अतिशय ताण पडतो. राज्याची कार्यहालचाल मोठ्या वेगाने पुढे प्रागती करत आहे. हाताशी असलेले कार्य पूर्ण करण्यासाठी स्वतःला झटण्यास व आपल्याजवळ असणाऱ्या प्रात्येक ठेव्याचा उपयोग करण्यास आपल्या समयाची निकड आपल्याला प्रावृत्त करते. संपूर्ण दुष्ट व्यवस्थीकरणाची समाप्ती इतक्या समीप आली असल्यामुळे, आपण भवितव्यात आणखी कार्यहालचालीची वाट पाहतो. निकडीच्या एकत्रीकरणाच्या कार्यात यहोवाच्या प्रात्येक समर्पित सेवकाला स्वतःस सादर करण्याची विचारणा केली जात आहे.
१३ काय करण्याची आवश्यकता आहे? ‘प्राभूच्या कामात पुष्कळ करावयाचे आहे’ असे आपण खरेपणाने म्हणू शकतो. (१ करिंथ. १५:५८, NW) पुष्कळ क्षेत्रांमध्ये पीक तयार आहे, परंतु कामकरी कमी आहेत. आपल्याला केवळ आपल्याच क्षेत्रामध्ये पूर्णपणे साक्षकार्य करण्यासाठी नव्हे, तर अधिक गरज आहे तेथे देखील सेवा करण्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपली भूमिका बजावण्याकरता आमंत्रण दिले आहे.
१४ जगाच्या सर्व भागातील साक्षीदार स्वतःला इतर कार्यहालचालींसाठी स्वेच्छेने कसे सादर करतात हे पाहणे प्राशंसात्मक आहे. यामध्ये, उपासनेच्या ठिकाणांची बांधणी करण्यामध्ये स्वयंसेवा करणे, अधिवेशनांमध्ये काम करणे व विपत्तीच्या काळांमध्ये मदत कार्यांत साहाय्य करणे इथपासून ते नियमितपणे स्थानिक राज्य सभागृह स्वच्छ करण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. उल्लेखिलेल्या शेवटल्या कामाच्या बाबतीत, प्रात्येक सभेनंतर राज्य सभागृह स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्यात आले आहे याची खात्री करावयाची असते. हलक्या प्रातीची कामे केल्याने, लूक १६:१० मधील “जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीहि विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे,” या येशूच्या शब्दांबद्दल योग्य समज प्रादर्शित होते.
◼ मंडळीच्या कार्यहालचालींना पाठिंबा देणे: प्रात्येक मंडळी सबंध संघटनेचा भाग म्हणून कार्य करते व ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडून’ मार्गदर्शन मिळवते; तरीसुद्धा, ती वैयक्तिक राज्य प्राचारकांची मिळून बनलेली आहे. (मत्त. २४:४५) प्रात्येक साक्षीदार किती करण्यास इच्छितो व करू शकतो यावर तिची साध्यता मोठ्या प्रामाणात अवलंबून आहे. मंडळी, तिच्या क्षेत्रामध्ये सुवार्तेचा प्राचार करणे, नवीन शिष्य बनवणे व त्यांना आध्यात्मिकरित्या बळकट करणे या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवते. या कार्यासाठी आपल्यापैकी प्रात्येक जण हातभार लावू शकतो. आपण स्वतःकरता वैयक्तिक अभ्यासाच्या, सभांमध्ये अर्थपूर्ण सहभाग घेण्याच्या व मंडळीमधील गरजवंत लोकांना मदत करण्याच्या बाबतीत देखील ध्येये ठेवू शकतो. या कार्यहालचाली आपल्याला आपली स्वेच्छा प्रादर्शित करण्यास अनेक उत्तम संधी सादर करतात.
◼ देखरेख्याच्या पदावर असणाऱ्यांनी पुढाकार घेणे: यहोवाने प्रात्येक मंडळीची देखरेख तिच्या नियुक्त वडिलांवर सोपवली आहे. (प्रो. कृत्ये २०:२८) या विशेषाधिकारासाठी पात्र ठरण्याकरता या पुरुषांनी प्रायत्न केला आहे. (१ तीम. ३:१) खरे म्हणजे, मंडळीतील प्रात्येक बांधवाजवळ मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र ठरण्याची काही क्षमता आहे. अनेक बांधव आध्यात्मिकरित्या प्रागती करत आहेत व त्यांना मंडळीच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोमळ साहाय्यामध्ये वाढ करत राहण्याची गरज आहे. हे पुरुष बायबलचे व आपल्या प्राकाशनांचे परिश्रमी विद्यार्थी असले पाहिजेत. ते आत्म्याने नियुक्त केलेल्या वडिलांच्या अधीन राहून, त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करून व पर्यवेक्षकांमध्ये पाहिले जातात त्या गुणांना विकसित करून आपली स्वेच्छा प्रादर्शित करू शकतात.—इत्त्वी. १३:७, १७.
◼ पूर्ण-वेळेची सेवा पत्करणे: मंडळी प्रामुख्याने सुवार्तेचा प्राचार करण्यासाठी कार्य करते. (मत्त. २४:१४) आवेशी जण पायनियर या नात्याने नाव नोंदवून आपले प्रायत्न अधिक वाढवतात तेव्हा तो किती आशीर्वाद आहे! बहुधा, यामध्ये त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये बदल करण्याचा समावेश असतो. या सेवेच्या खास क्षेत्रात टिकून राहण्यासाठी अधिक बदल करण्याची गरज असेल. परंतु, अंदाजे एका वर्षानंतर कोणत्याही तात्पुरत्या निरुत्साहामुळे या विशेषाधिकाराचा त्याग करण्याऐवजी जे त्याला धरून राहतात त्यांना नक्कीच यहोवाच्या आशीर्वादाचा अनुभव येईल. प्रोमळ वडील व इतर प्रौढ जण पायनियरांना त्यांच्या बोलण्याद्वारे व कृतीद्वारे उत्तेजन देऊन त्यांच्या यशाला हातभार लावू शकतात. शाळा संपल्यावर, थेट पायनियर कार्य सुरू करणारे तरुण किती उत्तम आत्मा प्रादर्शित करतात! तसेच ऐहिक बंधने कमी होताच नियमित पायनियर म्हणून नाव नोंदवणाऱ्या प्रौढ जणांबद्दलही हीच गोष्ट खरी आहे. यहोवा एकत्रीकरणाच्या कार्याला वेग देत असताना त्यास सहकार्य देण्यात एका समर्पित ख्रिश्चनाला केवढे समाधान प्राप्त होते!—यश. ६०:२२.
◼ सभेच्या ठिकाणांचे बांधकाम व व्यवस्था राखून ठेवण्यात भाग घेणे: अक्षरशः शेकडो आधुनिक राज्य सभागृहे तसेच पुष्कळ संमेलन सभागृहे बांधण्यात आली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्वेच्छेने आपला वेळ व कौशल्य देऊन आपल्या बांधवांनी व बहिणींनी बरेच काम केले आहे. (१ इति. २८:२१) हजारो इच्छुक कामकरी आवश्यक असलेली कोणतीही कामगिरी करून या सुविधा चांगल्या स्थितीत ठेवतात. (२ इति. ३४:८) हे कार्य पवित्र सेवेचा एक पैलू असल्यामुळे, मदत करणारे स्वतःला स्वेच्छेने सादर करतात. घरोघरी प्राचार करण्यासाठी, मंडळीत जाहीर भाषणे देण्यासाठी किंवा संमेलन वा अधिवेशनाच्या कार्याला मदत करण्यासाठी ते पैसे मागत नाहीत त्याचप्रामाणे या बाबतीत देखील त्यांच्या सेवेची भरपाई केली जाण्यासाठी ते विचारणा करत नाहीत. हे स्वयंसेवक यहोवाची स्तुती करून उपासनेच्या ठिकाणांची योजना व बांधणी करण्यास त्यांची सेवा विनामूल्य सादर करतात. ते, कायदेशीर दस्तऐवजांना पूर्ण करणे, जमाखर्चाचा अहवाल राखणे, क्रय संपर्क साधणे व आवश्यक साहित्याच्या रक्कमेचा हिशेब करणे या सारख्या मामल्यांसाठी उत्सुकतेने साहाय्य देतात. यहोवाचे हे निष्ठावान सेवक वरकड खर्च लावत नाहीत किंवा प्रात्यक्ष वा अप्रात्यक्षपणे करत असलेल्या सेवेबद्दल कोणत्याही प्राकारे भौतिकरित्या लाभ मिळवण्याचा प्रायत्न करत नाहीत कारण त्यांचे सर्व कौशल्य किंवा ठेवा यहोवाला समर्पिलेला आहे. (मे १९९२ आमची राज्य सेवा, पृष्ठ ४, परिच्छेद १० पाहा.) या कार्यासाठी परिश्रमी कामकऱ्यांची गरज आहे जे त्यांची सेवा “प्राभूसाठी [यहोवा, NW] म्हणून जिवेभावे” करतात.—कलस्सै. ३:२३.
१५ तर मग, यहोवाच्या लोकांची स्वेच्छा कशामुळे अद्वितीय आहे? तो दान करण्याचा आत्मा आहे. या उदार देण्यामध्ये पैसे किंवा भौतिक गोष्टींपेक्षाही अधिक गोष्टींचा समावेश आहे—ते ‘स्वतःला संतोषाने पुढे करतात.’ (स्तोत्र ११०:३) हे यहोवाला केलेल्या आपल्या समर्पणाचे मूलतत्त्व आहे. आपल्याला एका खास पद्धतीने प्रातिफळ मिळालेले आहे. आपण “सढळ हाताने पेरतो” त्यावेळी “धन्यता” अनुभवतो कारण आपण जे काही करतो त्याबद्दल इतर गुणग्राहकता दाखवतात व ते आपल्याला त्याचा मोबदला देतात. (२ करिंथ. ९:६; प्रो. कृत्ये २०:३५; लूक ६:३८) आपला महान दाता आपला स्वर्गीय पिता, यहोवा आहे व त्याला ‘संतोषाने देणारी व्यक्ती प्रिय वाटते.’ (२ करिंथ. ९:७) तो आपल्याला मोबदल्यात शंभरपट देईल व त्यासोबत सर्वकाळ टिकणारे आशीर्वादही देईल. (मला. ३:१०; रोम. ६:२३) यास्तव, यहोवाच्या सेवेतील विशेषाधिकार तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात तेव्हा तुम्ही स्वतःला स्वेच्छेने सादर करून, “हा मी आहे, मला पाठीव,” असे यशयाने म्हटल्याप्रामाणे उत्तर द्याल का?—यश. ६:८.