“जागृत राहा”
१ येशूने मत्तय २६:३८-४१ मध्ये नमूद केलेले शब्द म्हटले तेव्हा, तो त्याच्या मानवी अस्तित्वातील सर्वात निर्णायक घटकेच्या नजीक जात होता. सबंध मानवी इतिहासात तो सर्वात महत्त्वपूर्ण समय ठरणार होता. संपूर्ण मानवजातीचे तारण धोक्यात होते. येशूच्या शिष्यांना ‘जागृत राहण्याची’ गरज होती.
२ मुक्तीदाता व शासनकर्ता या दुहेरी भूमिकेसह येशूचे आगमन होण्याच्या उंबरठ्यावर आज आपण उभे आहोत. काळाची निकड लक्षात घेता, जागरूक ख्रिस्ती या नात्याने आपण केवळ हातावर हात ठेवून मुक्ततेची वाट पाहत बसत नाही. आपण सर्व समयी तयार असले पाहिजे हे आपल्याला ठाऊक आहे. आपण यहोवाची सेवा करत असताना “श्रम व खटपट” करीत राहावे हे आवश्यक आहे. (१ तीम. ४:१०) आपल्या प्रात्येकाविषयी काय? आपण जागृत आहोत का?
३ स्वतःचे परीक्षण करणे: येशूने असाही ईशारा दिला: “तुम्ही सांभाळा.” (लूक २१:३४, ३५) आपण “कुटिल व विपरीत पिढीत . . . निर्दोष व निरुपद्रवी” आहोत म्हणून स्वतःला सांभाळले पाहिजे. (फिलिप्पै. २:१५) आपण प्रात्येक दिवशी ख्रिस्ती या नात्याने, येशूचे अनुकरण करीत व देवाच्या वचनात दिलेल्या तत्त्वांनुरूप जगत आहोत काय? “त्या दुष्टाला वश” झालेल्या जगाचे गुणलक्षण असणारी गैर-ख्रिस्ती वर्तणूक आपण टाळली पाहिजे. (१ योहा. ५:१९; रोम. १३:११-१४) आपण स्वतःला शास्त्रवचनांच्या प्राकाशात पारखतो तेव्हा येशूने सूचना दिल्याप्रामाणे आपण खरोखर जागृत असतो का?
४ वडिलांनी मंडळीतील आपल्या नेमणूका हाताळताना दक्ष असले पाहिजे व ते कळपाची काळजी कशी घेतात यासाठी जाब द्यावा लागेल याची जाणीव त्यांनी राखली पाहिजे. (इत्त्वी. १३:१७) कुटुंब प्रामुखांना आपल्या घराण्याला यहोवाच्या मार्गात निर्देशित करण्याचे खास बंधन आहे. (उत्प. १८:१९; यहो. २४:१५; पडताळा १ तीम. ३:४, ५.) तसेच, आपल्यातील सर्वांनी एकमेकांवर प्रीती करण्याची शास्त्रवचनीय आज्ञा पूर्ण करावी हे किती अत्यावश्यक आहे! ते खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचे चिन्ह आहे.—योहा. १३:३५.
५ इतरांना ईशारा देण्यास दक्ष असा: जागृत असण्यामध्ये स्वतःला सांभाळण्यापेक्षाही अधिक काही गोवलेले आहे. आपल्यावर इतरांना शिष्य बनवण्याची कामगिरी आहे. (मत्त. २८:१९, २०) शेजाऱ्यांबद्दलच्या प्रोमाने आपल्याला इतरांना ईशारा देण्यास प्रावृत्त करावे जेणेकरून ते या जगाच्या नाशापासून बचावू शकतील. ही जबाबदारी सर्व ख्रिश्चनांवर आहे. तो आपल्या उपासनेचा एक आवश्यक भाग आहे. (रोम. १०:९, १०; १ करिंथ. ९:१६) आपण या जीवन बचावणाऱ्या कार्याबद्दल बहुधा उदासीनता किंवा उघड विरोधाचा सामना करतो. बहुतांश लोकांनी आपल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, तरी आपल्याला टिकून राहणे बंधनकारक आहे. (यहेज्केल ३३:८, ९) देवाबद्दल व शेजाऱ्याबद्दल खरे प्रोम आपल्याला टिकून राहण्यास प्रावृत्त करील.
६ ही आत्म-संतुष्ट असण्याची वेळ नाही. आपण जीवनाच्या दररोजच्या चिंतांना आपल्याला विचलित करण्यास वाव देऊ नये; तसेच ते पाश ठरतील इतके या व्यवस्थीकरणाच्या सुखविलासांमध्ये गोवले जाऊ नये. (लूक २१:३४, ३५) आताच निकड याची जाणीव असणे आवश्यक आहे. येशूने या दुष्ट व्यवस्थीकरणाविरुद्ध न्यायदंड बजावण्याचा समय वेगाने जवळ येत आहे. केवळ सावध, दक्ष व जागरूक असणारेच बचावतील. आपण येशूच्या सूचना पाळण्यास व “या सर्व गोष्टी चुकवावयास . . . समर्थ” ठरलो तर किती कृतज्ञ असू!—लूक २१:३६.