प्रश्न पेटी
◼ आपण सभांमध्ये अधिक परिणामकारकतेने विवेचने कसे देऊ शकतो?
आपण मंडळीच्या साप्ताहिक सभांमध्ये एकत्र मिळण्याची वाट पाहत असतो. तेथे आपली विवेचने देण्याकरवी, आपला विश्वास प्राकट करण्याची आणि इतरांना उत्तेजन देण्याची आपल्याला संधी असते. (नीती. २०:१५; इत्त्वी. १०:२३, २४) आपण विवेचन देण्याला विशेषाधिकार मानले पाहिजे व नियमित सहभाग घेण्यास झटले पाहिजे. आपण हे अधिक परिणामकारकतेने कसे करू शकतो?
तयारी हे याचे पहिले पाऊल आहे. साहित्य आगाऊ वाचणे व त्यावर मनन करणे हे महत्त्वपूर्ण आहे. जे सादर केले जाते त्याचा सार जाणून घेण्याचा प्रायत्न करा. गतकाळात तो विषय चर्चिला गेला असला तरी, सादर केलेले काही विस्तारित किंवा अधिक स्पष्टीकरण दिलेले मुद्दे पाहा. संपूर्ण साहित्याचे शीर्षक लक्षात ठेवा. एखाद्या बायबल पुस्तकाचा खोलवर अभ्यास असणाऱ्या प्राकाशनातून, जसे प्राकटीकरणाचा कळस पुस्तकातून विवेचन तयार करत असताना, एखादे विशिष्ट वचन सभोवतालच्या वचनांना कसे संबंधित आहे ते पाहण्याचा प्रायत्न करा. या सूचनांना अनुसरल्याने, तुमच्या विचार क्षमतेला चालना मिळेल. ते तुम्हाला चांगली विवेचने तयार करण्यास व तुमच्या सहभागितेचा आनंद प्राप्त करण्यास मदत करील.
सर्वोत्तम विवेचने, संक्षिप्त, सोप्या शब्दात व अभ्यास केल्या जाणाऱ्या प्राकाशनावर आधारलेली असतात. पहिल्या विवेचनकर्त्याने प्राश्नाचे थेट उत्तर द्यावे व इतर मुद्दे अधिक विवेचन मांडण्याकरता राहू द्यावीत. लांबलचक, वाहवत जाणारी विवेचने टाळा ज्यामुळे अधिक वेळ घेतला जातो व इतरांना सहभाग घेण्यास वाव मिळत नाही. तुमचे विवेचन, प्राकाशनातून वाचून दाखवण्याऐवजी तुमच्या शब्दात ते व्यक्त करा. साहाय्यक विवेचनांमध्ये उल्लेखिलेल्या शास्त्रवचनांतील मुद्यांचा समावेश होऊ शकतो. इतर काय म्हणतात ते लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्ही कोणतीही अनावश्यक पुनरावृत्ती टाळू शकता.
अनेक वेळा हात वर करणे चांगले असेल परंतु प्रात्येक परिच्छेदासाठी नव्हे. आम्ही युवकांना विवेचन देण्यासाठी आमंत्रण देतो. विवेचन देण्यास तुम्ही कचरत असाल तर, तुम्हाला कोणत्या परिच्छेदावर विवेचन द्यावयास आवडेल हे चालकाला आधीच सांगू शकता आणि संभवतः, ते तुम्हाला तसे करण्यास संधी देऊ शकतील.
आपण सर्वांनी, श्रोत्यांना सामील करणाऱ्या मंडळीच्या सभांमध्ये सांगण्यासाठी काही असावे म्हणून मनःपूर्वक प्रायत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा, की अशा सभांचे यश, विवेचन देण्याच्या आपल्या इच्छेवर आणि परिणामकारकतेवर मोठ्या प्रामाणात अवलंबून आहे.—स्तोत्र २६:१२.