घरी नसलेल्यांची नोंद का ठेवावी?
१ एके दिवशी सकाळी साक्षीदारांचे एक दांपत्य बाहेर क्षेत्र कार्यात होते. ते त्यांच्या क्षेत्रातील घरी नसणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी त्याच दिवशी परत गेले. एका मनुष्याने त्यांना आत बोलावून लक्ष देऊन त्यांचे ऐकले. त्याने अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक घेतले आणि साक्षीदारांना परत येण्यासाठी सांगितले. तो यहोवाच्या साक्षीदारांबरोबर यापूर्वी कधीही बोलला नव्हता आणि त्याला अनेक प्राश्नांची उत्तरे हवी होती; बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. अशाप्राकारच्या मेंढरासमान व्यक्तीचा शोध घेतल्याने या दांपत्याला आनंद झाला होता. या प्राकारचा अनुभव मिळवण्याची तुमची इच्छा आहे काय? घरी नसलेल्यांची उत्तम नोंद ठेवल्याने आणि त्यांच्याकडे तत्काळ परतल्याने हे शक्य होते.
२ घरी नसणाऱ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी आणि त्यांना लवकरच भेट देण्यासाठी आपल्याला वारंवार आर्जविण्यात आले आहे. वरील अनुभव दाखवून देतो की, त्याच दिवशी घेतलेल्या दुसऱ्या भेटीमुळे उत्तम निष्कर्ष निघतात. नेमून दिलेल्या क्षेत्रात केवळ प्राचार करण्याचा आपला हेतू असल्यास घरी नसलेल्यांचा अहवाल ठेवण्यास आपण खास परिश्रम घेणार नाही. काही म्हणतात: ‘आमच्या क्षेत्रात आम्ही प्रात्येक दोन किंवा तीन सप्ताहांमध्ये कार्य करतो; अशाप्राकारचा अहवाल ठेवण्याची काहीएक गरज नाही कारण आम्ही त्यांच्याकडे लवकरच परत जाणार आहोत.’ परंतु ही गोष्ट एक अहवाल ठेवण्याचे आणखी कारण पुरवते. वारंवार कार्य केल्या जाणाऱ्या क्षेत्रातील घरी नसलेल्या लोकांची भेट घेतल्याने इच्छुक असणाऱ्यांचा अधिक कसून शोध घेण्यास आपल्याला शक्य होते. कशाप्राकारे?
३ अनेक क्षेत्रातील ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रहिवाशी दिवसा घरी नसतात. त्यामुळे घरी नसणाऱ्या लोकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याद्वारे आपण अधिक क्षेत्र उपलब्ध करू शकतो. क्षेत्रात क्वचितच कार्य होत असल्यास प्रात्येकाला भेटण्याचा प्रायत्न करण्याद्वारे आपण परिणामांमध्ये सुधार करू शकतो आणि त्यानंतर क्षेत्रात कार्य झाले आहे, असे चिन्हांकित करू शकतो.
४ घरी नसणाऱ्यांना भेट देण्याची योजना सामान्यपणे दुसऱ्या दिवशी, खासकरून त्याच सप्ताहामध्ये केली जाऊ शकते. पहिल्या भेटीनंतर इतर दिवशी वेगळ्या समयी परत जाणे, पुष्कळांना उत्तम आढळले आहे. सप्ताहाभरात घरी नसलेल्यांची नोंद घेतलेल्यांकडे परत जाण्यासाठी तुम्ही शनिवार किंवा रविवारचा काही वेळ निवडू शकता. दुसरी शक्यता म्हणजे, अशाप्राकारच्या भेटी संध्याकाळी केल्यास फलदायी ठरतात, असे अनेक मंडळ्यांना दिसून आले आहे. अशावेळी निम्म्यापेक्षा अधिक रहिवाशी त्यांना घरी भेटतील.
५ तुमच्या व्यक्तिगत अहवालांमध्ये पुनर्भेटीची यादी तुम्ही केली पाहिजे. घरी नसलेल्यांकडे परत जाण्यास तुम्हाला शक्य नसल्यास, घरी नसलेल्यांची नोंद असलेला तुमचा अहवाल त्या क्षेत्रात जाणाऱ्या दुसऱ्या गटाला वापरता यावा म्हणून गटाचे नेतृत्व करणाऱ्या बांधवाकडे द्यावा.
६ आपल्या सेवेच्या या प्रामुख बाबीकडे बारकाईने लक्ष दिल्याने आपली उत्पादनक्षमता तसेच आपला आनंद देखील वाढेल. मेंढरासमान लोकांची आपण पूर्णपणे काळजी आणि शोध घेत आहोत, हे जाणल्याने आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकते.—यहे. ३४:११-१४.