१९९५ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
१९९५ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुरुप चालवली जाईल.
क्रमिक पुस्तके: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स [bil2], एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य [uw], “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” (१९९० ची आवृत्ती) [si], सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य [gt] आणि “चर्चेसाठी पवित्र शास्त्र विषय” [td], ही प्रकाशने साहित्याच्या नेमणूका देण्यासाठी वापरली जातील.
प्रशालेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने सुरु होईल. त्यानंतर तो पुढील प्रकारे चालवला जाईल:
नेमणूक क्रमांक १: १५ मिनिटे. हे भाषण, वडील किंवा प्रशिक्षित सेवा सेवकांकरवी हाताळले जावे. ते एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य किंवा “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” यावर आधारलेले असेल. ही नेमणूक १० ते १२ मिनिटाकरता बोधपर भाषण या अर्थी सादर करावी व नंतर ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील प्रश्नांचा वापर करून तोंडी उजळणी घ्यावी. या मागील हेतू, केवळ साहित्य उरकण्याचा नसावा तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीतील व्यावहारिक मूल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा व मंडळीस अत्यंत साहाय्यक ठरणारे मुद्दे ठळकपणे सामोरे मांडण्याचा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक उपयोगात आणावे. सर्वांना या साहित्याची काळजीपूर्वक पूर्वतयारी करण्याचे प्रोत्साहन दिले जाते की ज्याकरवी साहित्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकेल.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी वेळेमध्ये आपले भाषण संपवण्याची दक्षता घ्यावी. जरुरी भासल्यास किंवा वक्त्याने आधीच विनंती केली असल्यास, या बांधवाला खाजगी सूचना द्याव्या.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग प्रशाला पर्यवेक्षकांकरवी किंवा इतर कोणा वडिलांनी किंवा सेवा सेवकांनी हाताळावा, जे स्थानिक गरजांप्रमाणे साहित्याचा प्रभावीपणे अवलंब करतील. नेमून दिलेल्या वाचनाचा तो सारांश नसावा. प्रारंभी, नेमून दिलेल्या अध्यायांचे संपूर्ण पुनरावलोकन ३० ते ६० सेकंदांपर्यंतच मर्यादित ठेवावे. माहिती आम्हास का व कशी महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्यासाठी श्रोत्यांना साहाय्य करण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. यानंतर प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
भाषण क्रमांक २: ५ मिनिटे. एका बंधूला नेमून दिलेल्या भागाचे हे, बायबल वाचन आहे. हे प्रशालेच्या मुख्य वर्गास तसेच उपवर्गास सुद्धा लागू आहे. ही वाचनाची नेमणूक, विद्यार्थ्याला, सुरुवातीला त्रोटक विवेचन, व समाप्तीचे विचार यात काही मुद्दे विवेचित करता येतील एवढी पुरेशी आहे. यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, भविष्यवादित किंवा तात्त्विक विषयाची अर्थसूचकता व त्यांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व शास्त्रवचने मध्यंतरी न थांबता वाचली जावीत. अर्थात, वाचावयाची वचने क्रमाने नसतील तेथे वाचन कोठून चालू राहते, ते वचन विद्यार्थी सांगू शकतो.
भाषण क्रमांक ३: ५ मिनिटे. हे भाषण भगिणींना नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा चर्चेसाठी पवित्र शास्त्र विषय या पुस्तकातून असेल. नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थीनीस वाचता आले पाहिजे. भाषण सादर करताना ही विद्यार्थीनी बसू शकते किंवा उभी राहू शकते. प्रशाला पर्यवेक्षक एक मदतनीस नेमून देतील, पण अधिक मदतनीस वापरता येतील. हे भाषण नेमून दिलेल्या भगिणींनी, व्यावहारिक, विशेषतः क्षेत्र सेवा किंवा अनौपचारिक साक्ष कार्यानुरूप भाषणाचा विषय व साहित्य जुळवावे. दृश्य रचनेला नव्हे तर साहित्याच्या प्रभावी वापराला अधिक प्राधान्य दिले जावे.
भाषण क्रमांक ४: ५ मिनिटे. बंधूला किंवा भगिणीला नेमून देण्यात येईल. ते, चर्चेसाठी पवित्र शास्त्र विषय या पुस्तिकेवर आधारित असेल. जेव्हा बंधूला नेमणूक देण्यात येईल तेव्हा त्याने सबंध श्रोत्यांना ते भाषण सादर करावे. राज्य सभागृहातील उपस्थितांना विचारात घेऊन त्या बांधवाने भाषणाची तयारी करावी हे बरे, म्हणजे ऐकणाऱ्यांना ते माहितीयुक्त व लाभदायक ठरेल. तथापि, हे भाषण भगिणीला नेमून दिल्यास ते तिने भाषण क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावे.
सल्ला व शेरे: प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर, प्रशाला पर्यवेक्षक विशिष्ट प्रकारातील सल्ला देतील. याकरता कौन्सिल स्लीपवरील प्रगतीशील सूचनेसंबंधाने दाखवण्यात आलेला अनुक्रम पाळण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात प्रगती करण्याची गरज आहे त्याकडे त्यांनी लक्ष देण्यास हवे. विद्यार्थी वक्ता “जी” या शेऱ्यास पात्र आहे व स्पीच कौन्सिलवर इतर कोणत्याही गुणावर “आय” किंवा “डब्ल्यू” असा निर्देश नाही तर ज्या गुणावर पुढील भाषणाबाबत विद्यार्थ्याने तयारी करावी असे प्रशाला पर्यवेक्षकांना वाटते तेथील चौकोनावर त्यांनी गोल करावे. ही माहिती ते त्या विद्यार्थ्याला त्या सायंकाळी देतीलच व त्यासोबत पुढल्या वेळी विद्यार्थ्याला थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल असायन्मेंट स्लीप (S–89) वर जी नेमणूक ते देतील त्यावेळीही हाच गुण तयारीकरता दर्शवितील. भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या रांगेत बसावे. याद्वारे एकतर वेळ वाचेल व प्रशाला पर्यवेक्षकांनाही त्यांना थेट सूचना देण्यासाठी सोईचे होईल. तोंडी सूचना देऊन झाल्यावर वेळ मुभा देईल त्याप्रमाणे सल्लागारास, विद्यार्थ्याने आपल्या भाषणात साहित्याच्या ज्या माहितीयुक्त व व्यावहारिक मुद्यांचा समावेश केला नव्हता त्यावर विवेचन मांडता येईल. प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर सल्ला व इतर काही त्रोटक शेरा देण्यासाठी प्रशाला पर्यवेक्षकांनी केवळ दोनच मिनिटे वापरण्याची दक्षता घ्यावी. बायबल वाचनातील ठळक मुद्यात काही विशिष्ट असे सांगायचे राहून गेले असल्यास याविषयीची सूचना त्या बंधूस खाजगी रितीने देण्यात यावी.
भाषणांची तयारी: भाषणाची तयारी करण्याआधी विद्यार्थ्याने, तो ज्या भाषणशैलीच्या गुणावर काम करत आहे त्याविषयी स्कूल गाईड पुस्तकामध्ये असलेले साहित्य काळजीपूर्वकतेने वाचावे. दुसरे भाषण मिळालेल्या विद्यार्थ्याने असा विषय निवडावा की, ज्याकरवी नेमलेल्या साहित्याचा एकंदर उरक त्यामध्ये येऊ शकेल. इतर भाषणे आराखड्यात दाखवलेल्या विषयाचा वापर करून तयार केली जातील.
वेळ: कोणतेही भाषण वेळेच्याबाहेर जाऊ देऊ नये. तसेच सल्लागाराने दिलेला सल्ला व शेराही वेळेच्या आत असावा. भाषण क्रमांक २ ते ४ ची वेळ झाली म्हणजे ते कुशलतेने थांबवावे. ज्या बांधवाला थांबण्याचा संकेत करण्यासाठी नेमले आहे, त्यानेही तो तत्परतेने करावा. नेमणूक क्रमांक १ व बायबल वाचनातील ठळक मुद्दे हाताळताना हे बांधव वेळेच्याबाहेर गेल्यास त्यांना खाजगी सूचना देण्यात यावी. सर्वांनी त्यांच्या वेळेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. सबंध कार्यक्रम: गीत व प्रार्थना वगळता ४५ मिनिटे.
लेखी उजळणी: वेळोवेळी लेखी उजळणी घेण्यात येईल. याच्या तयारीसाठी नेमलेल्या साहित्याची व नियुक्त केलेल्या बायबल वाचनाची उजळणी करावी. २५ मिनिटांच्या उजळणीत फक्त बायबल वापरता येईल. राहिलेल्या वेळात प्रश्नोत्तराच्या रुपाने चर्चा होईल. प्रत्येक विद्यार्थी आपली उत्तर पत्रिका तपासील. प्रशाला पर्यवेक्षक श्रोत्यांसोबत सर्व उत्तरांना विचारात घेतील. यात कठीण प्रश्नांवर अधिक लक्ष देऊन त्यांची उत्तरे सर्वांना स्पष्टपणे समजावून देण्यास ते साहाय्य करतील. स्थानिक परिस्थितीच्या अपरिहार्य कारणामुळे ही लेखी उजळणी नियुक्त केलेल्या तारखेच्या एक आठवड्यानंतर घेता येईल.
मोठ्या मंडळ्या: ज्या मंडळीतील शाळेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पटावर असतील तेथे नियोजित भाषणे देण्यासाठी विद्यार्थ्यांची गट रचना करून त्यांची भाषणे दुसऱ्या सल्लागारांच्या समक्ष ऐकवता येतील. अर्थातच, बाप्तिस्मा प्राप्त न झालेल्या पण ख्रिस्ती तत्त्वांनुरूप जीवन व्यतित करणाऱ्यांना प्रशालेत आपले नाव दाखल करून नेमणूका प्राप्त करता येतील.
अनुपस्थिती: दर आठवडी प्रशालेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून, आपणाला दिलेल्या नेमणूकांची चांगली तयारी करून आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात भाग घेऊन सर्वांनी ह्या प्रशालेबद्दल रसिकता दाखवावी. सर्व विद्यार्थी, आपणास मिळालेल्या नेमणूका जाणीवपूर्वकतेने पूर्ण करतील अशी आम्ही आशा करतो. नेमलेला विद्यार्थी गैरहजर असल्यास एखादा स्वयंसेवक ती नेमणूक आपल्या परीने जे करता येईल त्याद्वारे हाताळील. किंवा प्रशाला पर्यवेक्षक त्या साहित्याची चर्चा सभागृहासोबत करू शकतील.
आराखडा
जाने. २ बायबल वाचन: स्तोत्र ११९:११३-१७६
गीत क्र. १२७
क्र. १: मोठ्या लोकसमुदायाला ओळखणे (uw पृ. १०३-४ परि. १-४)
क्र. २: स्तोत्र ११९:१६१-१७६
क्र. ३: येशूला “हा मनुष्य” असे का म्हणण्यात आले (gt अध्या. १२३)
क्र. ४: td ४४ए मानवाचे नशीब ठरवलेले नाही
जाने. ९ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १२० ते १३०
गीत क्र. २६
क्र. १: दुसऱ्या मेंढरांनी प्रदर्शित करावी अशी गुणलक्षणे (uw पृ. १०५ परि. ५)
क्र. २: स्तोत्र १२२:१-१२३:४
क्र. ३: पिलात येशूला का घाबरला (gt अध्या. १२४)
क्र. ४: td ४६ए येशूने मानवी जीवन सर्वांसाठी खंडणी म्हणून दिले
जाने. १६ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १३१ ते १३६
गीत क्र. १२९
क्र. १: मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून का बचावतो (uw पृ. १०६-९ परि. ६-१३)
क्र. २: स्तोत्र १३२:१-१८
क्र. ३: मानवजातीच्या प्रेमासाठी असलेला येशूच्या प्रेमाचा पुरावा (gt अध्या. १२५)
क्र. ४: td ४६बी येशू खंडणी का देऊ शकला
जाने. २३ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १३७ ते १४०
गीत क्र. २०५
क्र. १: पृथ्वीवर आज एवढे अल्प राज्याचे वारीस का (uw पृ. ११०-१२ परि. १-७)
क्र. २: स्तोत्र १३७:१-१३८:८
क्र. ३: येशू शेवटपर्यंत कसा आदर्श होता (gt अध्या. १२६)
क्र. ४: td ४७ए एकच खरा धर्म कसा ओळखावा
जाने. ३० बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १४१ ते १४५
गीत क्र. १६५
क्र. १: स्तोत्रसंहिता—लाभदायक का—भाग १ (si पृ. १०४-५ परि. २३-७)
क्र. २: स्तोत्र १४४:१-१५
क्र. ३: येशूचे दफन आणि रिकामी कबर या दोन गोष्टी आपल्याला आस्थेच्या का वाटतात (gt अध्या. १२७)
क्र. ४: td ४७सी खोट्या शिकवणींचा धिक्कार करणे अयोग्य आहे का?
फेब्रु. ६ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १४६ ते १५०
गीत क्र. १०२
क्र. १: स्तोत्रसंहिता—लाभदायक का—भाग २ (si पृ. १०५-६ परि. २८-३२)
क्र. २: स्तोत्र १४८:१-१४
क्र. ३: येशूच्या पुनरुत्थानाचा आनंद (gt अध्या. १२८)
क्र. ४: td ४७ई परमेश्वर धर्म बदलण्यास स्वीकृती देतो तेव्हा
फेब्रु. १३ बायबल वाचन: नीतीसूत्रे १ आणि २
गीत क्र. १८५
क्र. १: नीतीसूत्राची प्रस्तावना—भाग १ (si पृ. १०६-७ परि. १-५)
क्र. २: नीतीसूत्रे २:१-१९
क्र. ३: पुनरुत्थानावरील विश्वास कसा बळकट केला जातो (gt अध्या. १२९)
क्र. ४: td ४७जी परमेश्वराला सर्व धर्मात चांगले दिसते का?
फेब्रु. २० बायबल वाचन: नीतीसूत्रे ३ आणि ४
गीत क्र. २००
क्र. १: नीतीसूत्राची प्रस्तावना—भाग २ (si पृ. १०७-८ परि. ६-११)
क्र. २: नीतीसूत्रे ३:१-१८
क्र. ३: प्रेम कसे व्यक्त करावे हे येशू स्पष्ट करतो (gt अध्या. १३०)
क्र. ४: td ४८ए मृतांपैकी कोणास उठविले जाईल?
फेब्रु. २७ बायबल वाचन: नीतीसूत्रे ५ आणि ६
गीत क्र. ११
क्र. १: आत्मिक पुत्र असल्याचे त्यांना कसे कळेल? (uw पृ. ११२-१६ परि. ८-१४)
क्र. २: नीतीसूत्रे ६:१-१९
क्र. ३: येशू त्याच्या शिष्यांना कसा धीर देतो (gt अध्या. १३१)
क्र. ४: td ४८बी मृत कोठे पुनरुत्थित केले जातील?
मार्च ६ बायबल वाचन: नीतीसूत्रे ७ आणि ८
गीत क्र. १०५
क्र. १: यहोवाच्या दृश्य संस्थेस ओळखणे (uw पृ. ११७-२० परि. १-७)
क्र. २: नीतीसूत्रे ८:२२-३६
क्र. ३: येशू देवाच्या उजव्या हाताशी काय करतो (gt अध्या. १३२)
क्र. ४: td ४९ए येशूचे पुनरागमन अदृश्य आहे
मार्च १३ बायबल वाचन: नीतीसूत्रे ९ आणि १०
गीत क्र. २२४
क्र. १: नियमन मंडळाची शास्त्रवचनीय भूमिका (uw पृ. १२०-२२ परि. ८-१२)
क्र. २: नीतीसूत्रे १०:१६-३२
क्र. ३: येशू सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य का होता (gt अध्या. १३३)
क्र. ४: td ४९बी येशूचे पुनरागमन भौतिक वास्तविकतेने जाणणे
मार्च २० बायबल वाचन: नीतीसूत्रे ११ आणि १२
गीत क्र. ३८
क्र. १: देवाच्या संघटनेबद्दल असणाऱ्या आपल्या गुणग्राहकतेविषयी विश्लेषण करणे (uw पृ. १२३-४ परि. १३, १४)
क्र. २: नीतीसूत्रे ११:१-१४
क्र. ३: प्रत्येकाने सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक का वाचले पाहिजे (gt—पुस्तकातील प्रस्तावनेच्या साहित्याने तयार करा.)
क्र. ४: td ५०ए शब्बाथ पाळणे ख्रिश्चनांवर बंधनकारक नाही
मार्च २७ बायबल वाचन: नीतीसूत्रे १३ आणि १४
गीत क्र. १३९
क्र. १: सल्ला का ऐकावा? (uw पृ. १२५-७ परि. १-४)
क्र. २: नीतीसूत्रे १४:१-१६
क्र. ३: td ५०बी शब्बाथाचा नियम खिश्चनांसाठी दिलेला नव्हता
क्र. ४: td ५०डी देवाच्या शब्बाथाच्या विसाव्याचा आरंभ आणि शेवट केव्हा होतो
एप्रि. ३ बायबल वाचन: नीतीसूत्रे १५ आणि १६
गीत क्र. ५९
क्र. १: सल्ल्याचा स्वीकार केलेल्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करा (uw पृ. १२७-८ परि. ५, ६)
क्र. २: नीतीसूत्रे १५:१-१६
क्र. ३: td ५१बी परमेश्वर केवळ ख्रिस्ताद्वारे तारण देतो
क्र. ४: td ५१डी “एकदा तरला की कायमचा तरला” हे अशास्त्रीय आहे
एप्रि. १० बायबल वाचन: नीतीसूत्रे १७ आणि १८
गीत क्र. १६३
क्र. १: बहुमोल गुण जोपासा (uw पृ. १२८-३१ परि. ७-१४)
क्र. २: नीतीसूत्रे १८:१-१५
क्र. ३: td ५१ई “विश्वव्यापी तारण” अशास्त्रीय आहे
क्र. ४: td ५३ए पाप काय आहे
एप्रि. १७ बायबल वाचन: नीतीसूत्रे १९ आणि २०
गीत क्र. ३५
क्र. १: प्रीती खऱ्या ख्रिश्चनांचे ओळखचिन्ह आहे (uw पृ. १३२-३ परि. १-५)
क्र. २: नीतीसूत्रे १९:८-२३
क्र. ३: td ५३बी आदामाच्या पापामुळे सर्व मानवजातीला त्रास का होतो
क्र. ४: td ५३सी मना केलेले फळ काय होते?
एप्रि. २४ लेखी उजळणी. संपूर्ण स्तोत्र ११९:११३ ते नीतीसूत्रे २०
गीत क्र. ६
मे १ बायबल वाचन: नीतीसूत्रे २१ आणि २२
गीत क्र. ९५
क्र. १: समस्या उद्भवल्यास काय करावे (uw पृ. १३४ परि. ६-९)
क्र. २: नीतीसूत्रे २२:१-१६
क्र. ३: td ५३एफ पवित्र आत्म्याविरुद्धचे पाप काय आहे?
क्र. ४: td ५४ए जीव काय आहे?
मे ८ बायबल वाचन: नीतीसूत्रे २३ आणि २४
गीत क्र. ४६
क्र. १: समस्या शास्त्रवचनीय पद्धतीने हाताळा (uw पृ. १३५-८ परि. १०-१७)
क्र. २: नीतीसूत्रे २४:१-१६
क्र. ३: td ५४बी जीव आणि आत्मा हे कसे भिन्न आहेत?
क्र. ४: td ५५ए पवित्र आत्मा काय आहे?
मे १५ बायबल वाचन: नीतीसूत्रे २५ आणि २६
गीत क्र. १४५
क्र. १: घरामध्ये ईश्वरी भक्ती आचरा (uw पृ. १३९-४१ परि. १-५)
क्र. २: नीतीसूत्रे २५:१-१३
क्र. ३: td ५५बी मनुष्य आणि इतर प्राण्यांच्या जीवन शक्तीला आत्मा असे म्हटले जाते
क्र. ४: td ५५सी आपण सर्व प्रकारची भूतविद्या का टाळतो
मे २२ बायबल वाचन: नीतीसूत्रे २७ आणि २८
गीत क्र. ८४
क्र. १: नीतीसूत्रे—लाभदायक का—भाग १ (si पृ. १०९-१० परि. १९-२८)
क्र. २: नीतीसूत्रे २८:१-१४
क्र. ३: td ५८ए यहोवा त्रैक्याचा भाग का होऊ शकत नाही
क्र. ४: td ५८बी पुत्र पित्याच्या समान नाही
मे २९ बायबल वाचन: नीतीसूत्रे २९ ते ३१
गीत क्र. ५०
क्र. १: नीतीसूत्रे—लाभदायक का—भाग २ (si पृ. ११०-११ परि. २९-३८)
क्र. २: नीतीसूत्रे ३१:१०-३१
क्र. ३: td ५८डी देव आणि ख्रिस्त कसे एक आहेत
क्र. ४: td ५८ई पवित्र आत्मा एक व्यक्ती नाही
जून ५ बायबल वाचन: उपदेशक १ ते ३
गीत क्र. ४१
क्र. १: उपदेशकाची प्रस्तावना (si पृ. ११२-१३ परि. १-८)
क्र. २: उपदेशक ३:१-९, १८-२२
क्र. ३: td ५९सी जगातील त्रासाला देव जबाबदार नाही
क्र. ४: td ५९डी देवाने दुष्टतेला परवानगी का दिली
जून १२ बायबल वाचन: उपदेशक ४ ते ६
गीत क्र. ६२
क्र. १: देवाने लावून दिलेल्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये आपली भूमिका पार पाडा (uw पृ. १४२-४ परि. ६-१३)
क्र. २: उपदेशक ५:१-८, १८-२०
क्र. ३: td ५९ई देव त्याची महान दया प्रकट करतो
क्र. ४: td ५९एफ देवाचे राज्य एकमात्र उपाय आहे
जून १९ बायबल वाचन: उपदेशक ७ ते ९
गीत क्र. १६२
क्र. १: आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही याची शास्त्रवचनीय कारणे (uw पृ. १४६-८ परि. १-६)
क्र. २: उपदेशक ७:१-१२
क्र. ३: td ६०ए सर्व ख्रिश्चनांनी सत्याबद्दल साक्ष दिलीच पाहिजे
क्र. ४: td ६०बी आपण लोकांची वारंवार का भेट घेत राहतो
जून २६ बायबल वाचन: उपदेशक १० ते १२
गीत क्र. १३३
क्र. १: उपदेशक—लाभदायक का (si पृ. ११४ परि. १५-१९)
क्र. २: उपदेशक १२:१-१४
क्र. ३: td ६०जी साक्ष आपल्याला रक्तदोषापासून मुक्त करते
क्र. ४: td १ए पूर्वजांची भक्ती व्यर्थ का आहे
जुलै ३ बायबल वाचन: गीतरत्न १ ते ४
गीत क्र. १६८
क्र. १: गीतरत्नाची प्रस्तावना (si पृ. ११५ परि. १-४)
क्र. २: गीतरत्न २:१-१४
क्र. ३: td १बी आपण मानवास आदर देतो; परंतु भक्ती मात्र देवाची करतो
क्र. ४: td २ए दुष्टाईचा अंत करणारे देवाचे युद्ध
जुलै १० बायबल वाचन: गीतरत्न ५ ते ८
गीत क्र. १५२
क्र. १: गीतरत्न—लाभदायक का (si पृ. ११७ परि. १६-१८)
क्र. २: गीतरत्न ८:१-१४
क्र. ३: td २सी हर्मगिदोन देवाच्या प्रीतीचा भंग करीत नाही
क्र. ४: td ३ए बाप्तिस्मा ही ख्रिस्ती गरज आहे
जुलै १७ बायबल वाचन: यशया १ ते ३
गीत क्र. १८०
क्र. १: यशयाची प्रस्तावना (si पृ. ११८-१९ परि. १-८)
क्र. २: यशया १:१-१३
क्र. ३: td ३बी बाप्तिस्मा पातके पुसून टाकत नाही
क्र. ४: td ४ए बायबल देवाचे प्रेरित वचन आहे
जुलै २४ बायबल वाचन: यशया ४ ते ७
गीत क्र. १४४
क्र. १: क्षमा आणि तारणासाठी विश्वास अत्यावश्यक आहे (uw पृ. १४८-५० परि. ७-१०)
क्र. २: यशया ६:१-१३
क्र. ३: td ४सी बायबल आपल्या दिवसांसाठी व्यवहारी मार्गदर्शक आहे
क्र. ४: td ४एफ बायबल सर्व राष्ट्रातील आणि वंशातील लोकांसाठी आहे
जुलै ३१ बायबल वाचन: यशया ८ ते १०
गीत क्र. १४०
क्र. १: नियमशास्त्राच्या माहितीमुळे फायदे (uw पृ. १५०-१ परि. ११-१३; पृ. १५३ परि. १४)
क्र. २: यशया ९:१-१२
क्र. ३: td ५ए रक्त संक्रमण देवाच्या नियमाचे उल्लंघन करते
क्र. ४: td ५बी देवाची आज्ञा मानणे महत्त्वपूर्ण आहे
ऑग. ७ बायबल वाचन: यशया ११ ते १३
गीत क्र. ४४
क्र. १: मोशेच्या नियमशास्त्रातील मूलभूत तत्त्वे सिद्धांत: “देवासंबंधी जबाबदाऱ्या” (uw पृ. १५२)
क्र. २: यशया ११:१-१०
क्र. ३: td ६ए विदेशांचा काळ १९१४ मध्ये समाप्त झाला
क्र. ४: td ७ए खऱ्या ख्रिस्ती मंडळीची ओळख करणे
ऑग. १४ बायबल वाचन: यशया १४ ते १७
गीत क्र. १७०
क्र. १: मोशेच्या नियमशास्त्रातील मूलभूत तत्त्वे “मनाई केलेल्या धार्मिक चालीरीती” (uw पृ. १५२)
क्र. २: यशया १४:३-२०
क्र. ३: td ७डी खरी ख्रिस्ती मंडळी ख्रिस्तावर उभारलेली आहे
क्र. ४: td ९ए सृष्टी शाबीत झालेल्या विज्ञानाशी सहमत आहे
ऑग. २१ बायबल वाचन: यशया १८ ते २२
गीत क्र. १७५
क्र. १: मोशेच्या नियमशास्त्रीतील मूलभूत तत्त्वे: “विवाह आणि कौटुंबिक जीवन” (uw पृ. १५२)
क्र. २: यशया २१:१-१७
क्र. ३: td ९बी उत्पत्तीचे दिवस २४ तासांचे नव्हते
क्र. ४: td १०ए येशू निंदा स्तंभावर मरण पावला; क्रूसावर नाही
ऑग. २८ लेखी उजळणी. संपूर्ण नीतीसूत्रे २१ ते यशया २२
गीत क्र. २०४
सप्टें. ४ बायबल वाचन: यशया २३ ते २६
गीत क्र. १०६
क्र. १: मोशेच्या नियमशास्त्रातील मूलभूत तत्त्वे: “इतरांसंबंधी कर्तव्ये” (uw पृ. १५२)
क्र. २: यशया २५:१-१२
क्र. ३: td १०बी क्रूसाची उपासना मूर्तीपूजा का आहे
क्र. ४: td ११ए मनुष्य का मरतो
सप्टें. ११. बायबल वाचन: यशया २७ ते २९
गीत क्र. २७
क्र. १: जीवन आणि रक्त पवित्र आहेत (uw पृ. १५४-६ परि. १-६)
क्र. २: यशया २८:१-१३
क्र. ३: td ११बी मृत बेशुद्ध आहेत आणि त्यांना कशाचीही जाणीव नाही
क्र. ४: td ११सी मृतांसोबत संभाषण करणे अशक्य का आहे
सप्टें. १८ बायबल वाचन: यशया ३० ते ३३
गीत क्र. १६०
क्र. १: रक्ताचा वैद्यकीय उपयोग आणि ख्रिश्चनाची जबाबदारी (uw पृ. १५६-६० परि. ७-१२)
क्र. २: यशया ३२:१-८, १६-२०
क्र. ३: td १४ए दियाबलाचे वास्तविक अस्तित्व
क्र. ४: td १४बी दियाबल या व्यवस्थीकरणावर अधिपत्य करतो
सप्टें. २५ बायबल वाचन: यशया ३४ ते ३७
गीत क्र. १४६
क्र. १: खरे ख्रिस्ती या जगाचे भाग नाहीत (uw पृ. १६१-३ परि. १-६)
क्र. २: यशया ३५:१-१०
क्र. ३: td १४डी सैतानास मिळालेल्या देवदूतांनी स्वतःस दुरात्मे बनविले
क्र. ४: td १७ए पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश
ऑक्टो. २ बायबल वाचन: यशया ३८ ते ४०
गीत क्र. १४३
क्र. १: जगाचे भाग न होण्यासाठी ख्रिश्चनांना कशाची आवश्यकता आहे (uw पृ. १६३-८ परि. ७-१६)
क्र. २: यशया ४०:१२-२६
क्र. ३: td १७सी पृथ्वी सर्वदा व्यापलेली असेल
क्र. ४: td १९ए खोट्या संदेष्टयांना कसे ओळखावे
ऑक्टो. ९ बायबल वाचन: यशया ४१ ते ४३
गीत क्र. ९२
क्र. १: देवाचे वचन निरंतर धैर्याने बोलत राहा (uw पृ. १६९-७१ परि. १-७)
क्र. २: यशया ४३:१-१५
क्र. ३: td २२ए आध्यात्मिकरित्या बरे होण्याचे चिरकालिक फायदे
क्र. ४: td २२बी देवाचे राज्य चिरकालिक शारीरिक आरोग्य प्रदान करील
ऑक्टो. १६ बायबल वाचन: यशया ४४ ते ४६
गीत क्र. १६६
क्र. १: प्रेषितांच्या उदाहरणाने लाभ मिळविणे (uw पृ. १७२ परि. ८)
क्र. २: यशया ४६:१-१३
क्र. ३: td २२सी आधुनिक विश्वासाने बरे करण्यामध्ये ईश्वरी मान्यतेच्या पुराव्याची उणीव आहे
क्र. ४: td २२डी अन्य भाषेत बोलण्याने त्याचा उद्देश पूर्ण केला
ऑक्टो. २३ बायबल वाचन: यशया ४७ ते ४९
गीत क्र. ५६
क्र. १: धैर्याने आणि चाणाक्षतेने प्रचार (uw पृ. १७३-५ परि. ९-१३)
क्र. २: यशया ४८:१-११, १६-१९
क्र. ३: td २३बी केवळ १,४४,००० स्वर्गास जातात
क्र. ४: td २४बी नरकामध्ये कोणालाही यातना होत नाही
ऑक्टो. ३० बायबल वाचन: यशया ५० ते ५३
गीत क्र. १३२
क्र. १: यहोवाचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे हे ध्यानात ठेवा (uw पृ. १७६-७ परि. १-४)
क्र. २: यशया ५२:१-१५
क्र. ३: td २४सी अग्नी सर्वनाशाचे द्योतक आहे
क्र. ४: td २४ई श्रीमंत मनुष्य आणि लाजारस यांच्या दाखल्यातील अग्नी हा खरोखरचा नाही
नोव्हें. ६ बायबल वाचन: यशया ५४ ते ५७
गीत क्र. १८७
क्र. १: चिन्हाची पूर्णता करणाऱ्या घटनांच्या बाबतीत जागृत राहा (uw पृ. १७८-९ परि. ५, ६)
क्र. २: यशया ५५:१-१३
क्र. ३: td २५बी जन्म दिवस किंवा नाताळ, सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी साजरा केला नाही
क्र. ४: td २६ए मूर्तीची उपासना देवास निंदा आणते
नोव्हें. १३ बायबल वाचन: यशया ५८ ते ६२
गीत क्र. १०७
क्र. १: विभाजनाचे महान कार्य—शेवट जवळ असल्याचा पुरावा आहे (uw पृ. १७९-८३ परि. ७-१४)
क्र. २: यशया ६०:४-१७
क्र. ३: td २६बी मूर्तिपूजा इस्त्राएलांना पाश ठरली
क्र. ४: td २६सी यहोवा जिचा धिक्कार करतो अशी उपासना
नोव्हें. २० बायबल वाचन: यशया ६३ ते ६६
गीत क्र. ७७
क्र. १: यशया—का लाभदायक (si पृ. १२३ परि. ३४-९)
क्र. २: यशया ६५:११-२५
क्र. ३: td २७ए मिश्र विश्वास देवाला स्वीकार्हार्य नाही
क्र. ४: td २७बी देवाला अनन्य भक्तीची अपेक्षा आहे
नोव्हें. २७ बायबल वाचन: यिर्मया १ ते ३
गीत क्र. ७०
क्र. १: यिर्मयाची प्रस्तावना (si पृ. १२४ परि. १-५)
क्र. २: यिर्मया १:४-१९
क्र. ३: td २९बी खऱ्या ख्रिश्चनांनी देवाचे नाव जाणून घेऊन त्याचा वापर केला पाहिजे
क्र. ४: td २९सी बायबल आणि सृष्टी देवाच्या अस्तित्वाची साक्ष देतात
डिसें. ४ बायबल वाचन: यिर्मया ४ ते ६
गीत क्र. ९७
क्र. १: यहोवाचा बुद्धिमान आणि प्रेमळ उद्देश (uw पृ. १८४-५ परि. १-५)
क्र. २: यिर्मया ५:१-१४
क्र. ३: td २९डी यहोवाचे अद्भुत गुण
क्र. ४: td २९एफ सर्वजण एकाच देवाची सेवा करीत नाहीत
डिसें. ११ बायबल वाचन: यिर्मया ७ ते ९
गीत क्र. १५८
क्र. १: यहोवा त्याच्या लोकांचे एकीकरण करतो (uw पृ. १८६-७ परि. ६-९)
क्र. २: यिर्मया ९:१२-२६
क्र. ३: td ३०ए यहोवाच्या साक्षीदारांचा आरंभ
क्र. ४: td ३१बी येशू देवाचा पुत्र आणि नेमलेला राजा आहे
डिसें. १८ बायबल वाचन: यिर्मया १० ते १२
गीत क्र. २२२
क्र. १: मानवजात मुक्त होईल (uw पृ. १८८-९१ परि. १०-१७)
क्र. २: यिर्मया १०:६-१५, २२-२५
क्र. ३: td ३१डी आपण येशूवर विश्वास का ठेवला पाहिजे
क्र. ४: td ३१ई येशूवरील विश्वासासोबत क्रिया असली पाहिजे
डिसें. २५ लेखी उजळणी. संपूर्ण यशया २३ ते यिर्मया १२
गीत क्र. ३४