घोषणा
▪ साहित्य सादरता
जुलै: कोणत्याही तीन ३२-पानी पुस्तिकांना मिळून ३.०० रूपये. आमच्याजवळ खालील पुस्तिकांचा भरपूर साठा उपलब्ध आहे: इंग्रजी आणि मराठी मध्ये सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल; इंग्रजी, फ्रेंच, मराठी आणि पंजाबी मध्ये कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव; इंग्रजी आणि फ्रेंच मध्ये इन सर्च ऑफ ए फादर (बुद्ध लोकांसाठी); इंग्रजी, गुजराती, हिंदी, कोंकणी (कन्नड व गोअन), मनीपुरी, मल्याळम, पंजाबी, आणि तामिळ मध्ये काळजी वाहणारा देव आहे का?; इंग्रजी, लुशाय, मल्याळम आणि तामिळ मध्ये मुक्तीकडे निरवणारा ईश्वरी सत्याचा मार्ग; इंग्रजी, हिंदी, लुशाय, मराठी, आणि पंजाबी मध्ये जीवनात आणखीन पुष्कळसे आहे!; गुजराती, खासी, कोंकणी (कन्नड आणि गोअन), लुशाय, मनीपुरी, मराठी, मल्याळम आणि तामिळ मध्ये “राज्याची ही सुवार्ता”; इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, नेपाळी आणि पंजाबी मध्ये विक्ट्री ओवर डेथ—इज इट पॉसिबल फॉर यू? तुमच्या भाषेत कोणत्याच पुस्तिका नसतील तर, शाळा (इंग्रजी) माहितीपत्रक सोडून कोणतेही माहितीपत्रक प्रत्येकी ४.०० रुपयांना सादर करा.
ऑगस्ट: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक ४.०० रुपयांना. हे उपलब्ध नसेल तेथे, किंवा दुसरा कोणताही विषय अधिक योग्य असेल तेथे, पुढीलपैकी कोणत्याही ३२-पानी माहितीपत्रकांचा उपयोग केला जाऊ शकतो: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, द डिवाईन नेम दॅट वील एन्ड्यूअर फॉरएव्हर, “पहा! मी सर्व नवे करतो,” नंदनवन आणविणारे सरकार, तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, आणि जीवनाचा काय उद्देश आहे—तो तुम्हाला कसा शोधता येईल?
सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २०.०० रुपयांना. (मोठ्या आकाराचे ४०.०० रुपयांना.)
ऑक्टोबर: अवेक! किंवा टेहळणी बुरुज यांची वर्गणी. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ६०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची व पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३०.०० रुपयांना. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.
▪ ऑक्टोबर ३, १९९४ पासून प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! हे पुस्तक मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी वापरण्यात येईल.
▪ कृपया अधिवेशन मुख्यालयांच्या पत्त्यांमध्ये दोन बदल झाले आहेत त्याची नोंद घ्या:
मुंबई (हिंदी): c/o F.G. Dias, Post Bag 17723, Borivili West, Bombay, MAH 400 092.
कॅलीकट: c/o Saji Thomas, Chembukavu House, Kanimangalam P.O., Trichur, KER 680 007.
▪ भविष्यात, मंडळीने कॅलेंडर व पुढील वर्षाच्या ईयरबुक सारख्या तात्पुरते साठ्यात नसलेल्या किंवा अजूनही उपलब्ध होणार असलेल्या एका वस्तूसाठी मागणी केल्यास संस्था मागणीचा स्वीकार करील व ती मागणी शिल्लक ठेवेल. अशा वस्तूंचे वर्णन व संख्या तुमच्या पुढील साहित्य यादीत दिसेल परंतु, त्याची किंमत दाखवली किंवा घेतली जाणार नाही. जर, एखाद्या यादीत वस्तू व तिची संख्या आहे परंतु किंमत दाखवलेली नाही तर त्याचा अर्थ ती वस्तू सध्या उपलब्ध नाही असा होतो. यासाठी, तुम्हाला ती वस्तू मिळाली नाही असे संस्थेला लिहून पाठवण्याची गरज नाही कारण, त्या पाठवलेल्या साठ्यात ती मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू नये. याचा असा अर्थ होतो की, संस्थेने तुमची मागणी कबूल केली आहे व ती वस्तू उपलब्ध होईपर्यंत मागणी ‘शिल्लक’ ठेवली जाते. उपलब्ध झाल्यावर तुम्हाला ती आपोआप पाठवली जाईल. यासाठी, तुम्हाला त्या वस्तूची अधिक संख्या हवी असेपर्यंत तीच मागणी पुन्हा करू नका.
▪ आम्ही आता १९९५ च्या शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे, कॅलेंडर व ईयरबुक यांची मागणी स्वीकारत आहोत. कृपया तुमच्या मागण्या जुलै ६, १९९४ च्या आधी पाठवा. तुम्ही या साहित्यांची मागणी लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-AB-14) यावर करता तेव्हा, कृपया त्यावर इतर कोणत्याही साहित्याची मागणी करू नका. १९९५ या वर्षासाठी, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे हे इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, नेपाळी, तामिळ आणि तेलगू मध्ये उपलब्ध आहे.
▪ ज्या मंडळ्यांनी अद्याप ‘ईश्वरी भय’ अधिवेशनासाठी बॅज कार्डांची मागणी केलेली नाही, त्यांना त्यांच्या मागण्या तत्काळ पाठवाव्यात अशी विनंती केली जाते. बॅज कार्ड, इंग्रजी, मल्याळम आणि तामिळ मध्ये उपलब्ध आहेत.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
इंग्रजी: नंदनवन आणविणारे सरकार, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य; कन्नड: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!