आम्ही पुन्हा गेल्यावाचून ते कसे ऐकतील?
१ “घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील?” (रोम. १०:१४) अर्थातच, आम्ही परिणामकारक पुनर्भेटी केल्यावाचून ते सत्याचा अर्थ कसा समजू शकतील? आम्ही घरमालकासोबत राज्य संदेशाबाबत संभाषण करू शकलो अशी कोणतीही भेट, पुनर्भेटीस पात्र आहे. या महिन्यात, आम्ही कोणत्याही अधिक शास्त्रवचनीय विचारांद्वारे दिलेल्या पुस्तिकेच्या सुरवातीच्या संभाषणाचा मागोवा घेऊ शकतो. ते यशस्वीपणे पवित्र शास्त्राभ्यासाकडे निरवेल.
२ तुम्ही, “सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल” ही पुस्तिका दिली असल्यास, अशाप्रकारे पवित्र शास्त्राभ्यासाकडे निरवणाऱ्या संभाषणाची सुरवात करू शकाल. मुखपृष्ठाकडे निर्देश करून तुम्ही विचारू शकता:
▪“तुम्हाला व तुमच्या कुटुंबाकरता सुरक्षित भवितव्याची हमी देण्यात येईल अशा जगात राहावयास आवडेल काय? [प्रतिसादासाठी वाव द्या. त्यानंतर परिच्छेद २ कडे वळा.] हे कधी शक्य होईल का याबद्दल पुष्कळ जण शंका बाळगीत असले तरी, आम्हा सर्वांची हीच इच्छा आहे. या गोष्टीला वास्तविकता बनवण्याचे अभिवचन देणाऱ्या देवासाठी हे अशक्य नाही.” परिच्छेद २ मध्ये उद्धृत केलेले यशया ३२:१७, १८ आहे तसेच वाचून दाखवा किंवा तुमच्या पवित्र शास्त्रातून वाचा. याचे स्पष्टीकरण देत राहा की, भवितव्याच्या निश्चित आशेद्वारे मिळणारा आनंद व मनाच्या शांतीचा पूर्वीपासूनच अनुभव घेणारे लोक या जगात आहेत. परिच्छेद ३ मधील शास्त्रवचनीय विचारांची चर्चा करा, व पुस्तिकेचा अभ्यास घरमालकाला त्याबद्दल अधिक शिकण्यात मदत कसा करील हे समजावून सांगा. ती व्यक्ती आस्थेवाईक असेल तर, चर्चा चालू ठेवण्याकरता लवकरच पुनर्भेटीची व्यवस्था करा.
३ “काळजी वाहणारा देव आहे का?,” ही पुस्तिका दिल्यावर तुम्ही परताल तेव्हा अशाप्रकारचे काही परिणामकारक ठरेल:
▪“माझ्या आधीच्या भेटीत आपण काळजी वाहणारा देव आहे का, या प्रश्नाची चर्चा केली होती. पीडा व गुन्हेगारीचा अंत करण्याइतपत काळजी देव आपल्याबद्दल बाळगतो असे तुम्हाला वाटते का? [त्या व्यक्तीने प्रतिसाद दिल्यानंतर परिच्छेद ३२ कडे वळा व पुढे तसेच चालू ठेवा.] देवाने या दुष्ट जगाच्या बदली एक नवे जग आणण्याचे अभिवचन दिले आहे. त्यात चांगले लोक वसतील व ते शांतीने राहू शकतील. [स्तोत्र ३७:११ वाचा.] आपण पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवला व त्याच्या सल्ल्याचा अवलंब केला तर, तुम्ही व मी देखील त्या नवीन जगात जीवनाचा आनंद लुटू शकतो.” लोकांना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास मदत करणाऱ्या आपल्या व्यवस्थेबद्दल समजावून सांगा.
४ “पहा! मी सर्व काही नवे करतो,” हे माहितीपत्रक दिल्यावर तुम्ही पुनर्भेट कराल तेव्हा, मुखपृष्ठावरील चित्र दाखवून तुम्ही सुरवात करू शकता व नंतर असा प्रश्न विचारू शकता:
▪“एका परिपूर्ण जगात राहणे कशासारखे असेल असे तुम्हाला वाटते? [घरमालकाची विवेचने मिळवा.] तुम्ही या चित्रात पाहात असलेली गोष्ट केवळ कल्पित नाही; ती पवित्र शास्त्रात सांगितलेल्या निश्चित अभिवचनांवर आधारित आहे. [प्रकटीकरण २१:४ व स्तोत्र ३७:११, २९ वाचा.] तुम्ही व तुमचे कुटुंब या आशीर्वादाचा आनंद कसा लुटू शकता हे समजावून सांगण्यास मला आवडेल.” घरमालकाने आस्था प्रदर्शित केल्यास, चर्चा चालू ठेवा व पवित्र शास्त्राभ्यास सादर करा.
५ सत्याचा शोध घेणारे प्रामाणिक लोक आम्हाला भेटतात तेव्हा त्यांना, ऐकलेल्या गोष्टींप्रमाणे कार्य करण्यास मदत करण्यासाठी आपण परत जाऊन आपली खरी प्रीती प्रदर्शित करतो. आम्हाला प्रदान केलेल्या पवित्र सत्याचा, आम्ही स्वतःकरता तसेच ऐकणाऱ्यांकरता चिरकालिक आशीर्वाद मिळवण्यासाठी उपयोग करतो.—१ तीम. ४:१६.