वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९४ पृ. १
  • सकारात्मक मनोवृत्ती राखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सकारात्मक मनोवृत्ती राखा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • निश्‍चयी मनोवृत्ती ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • निराश होऊ नका, प्रचार करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • आशादायी मनोवृत्ती बाळगा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ८/९४ पृ. १

सकारात्मक मनोवृत्ती राखा

१ पुष्कळ देशांमध्ये होत असलेल्या आश्‍चर्यकारक वाढींबद्दल वाचण्यास आम्हाला किती आनंद होतो! तरीसुद्धा, काही भागांमध्ये राज्य प्रचारकांना आपल्या प्रचाराच्या कार्यांबद्दल भावनाशून्यता, बेपर्वाई, किंवा थेट प्रतिकार यांचा सामना करावा लागतो हे आम्ही समजतो. आमच्या क्षेत्रात असेच घडत असेल तर आम्ही सकारात्मक मनोवृत्ती कशी बाळगू शकतो? आमचा हर्ष हिरावून घेणारी किंवा शिष्य बनविण्याच्या कार्याबद्दलचा आमचा आवेश मंदावणारी नकारात्मक मनोवृत्ती आम्ही कशी टाळू शकतो?

२ सकारात्मक मनोवृत्ती आम्हाला आमचा तोल राखण्यास मदत करील. कठीण परिस्थितींमध्ये देखील आम्ही नकारात्मक विचारांना आमच्या दृष्टिकोनावर वर्चस्व करण्यास देऊ नये. येशू ख्रिस्ताने आम्हासाठी अगदी परिपूर्ण उदाहरण ठेवले आहे. तुलनात्मकरित्या फारच कमी लोकांनी, त्याने शिकवलेल्या गोष्टींचा स्वीकार केला. पुष्कळ जण त्याच्या शिकवणींमुळे अडखळले. त्याने अशा परिस्थितींचा सामना केला ज्यामध्ये त्याच्या सहनशीलतेची निष्ठुरतेने परीक्षा घेतली गेली. धार्मिक पुढाऱ्‍यांनी त्याच्या कार्याची टीका केली व त्याला ठार मारण्यासाठी कट रचला. त्याच्यावर थुंकले, त्याच्या तोंडात मारले, त्याची थट्टा केली, त्याला चोपण्यात आले व शेवटी ठार मारण्यात आले. तरीसुद्धा, तो करीत असलेल्या कार्यात त्याला हर्ष प्राप्त झाला. का बरे? त्याने देवाची इच्छा करण्याचे महत्त्व ओळखले व त्याने ते करण्याचे थांबवले नाही.—योहान ४:३४; १३:१७; इब्री. १२:२.

३ आमच्या सेवेचा योग्य दृष्टिकोन राखणे: हे करण्यासाठी, आम्हाला पुष्कळ गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. हे लक्षात असू द्या की, आम्हाजवळ असा संदेश आहे ज्याकडे पुष्कळ लोक दुर्लक्ष करतात किंवा विरोध करतात. (मत्त. १३:१४, १५) प्रेषितांना येशूच्या नावाने शिकवण्याचे थांबवण्याबद्दल अधिकृतपणे सांगण्यात आले होते, तरी प्रचार करण्याच्या त्यांच्या कामगिरीस ते विश्‍वासू राहिले व कापणी गोळा होतच होती. (प्रे. कृत्ये ५:२८, २९; ६:७) आम्हाला पूर्वकल्पना आहे की, काही क्षेत्रांमध्ये तुलनात्मकरित्या फारच कमी लोक ऐकतील. (मत्त. ७:१४) या कारणास्तव, आमच्या क्षेत्रातील एका व्यक्‍तीने ऐकले तरी आम्हाला आनंद करावयास कारण आहे. हेही लक्षात ठेवा की, विरोध करणाऱ्‍यांना देखील ऐकण्याची संधी दिली पाहिजे. (यहे. ३३:८) काही विरोधक अखेरीस परिवर्तीत होतात व यहोवाचे उपासक होतात. अल्प लोकांनी ऐकले तरी, योग्य दृष्टिकोन बाळगल्याने आपल्या सेवेमुळे काहीतरी साध्य केल्यासारखे वाटते. देव राज्याच्या संदेशासह आपली दरवाज्यातील उपस्थितीच एक साक्ष आहे.—यहे. २:४, ५.

४ आम्हाजवळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास एक चांगले कारण आहे. जागतिक कार्यातील वृद्धी आणि मोठे संकट जवळ येत असल्याचा अधिकाधिक पुरावा, या गोष्टींनी आम्हाला ईश्‍वरी भक्‍तीने सेवा करण्यात होईल तितके करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. (२ पेत्र ३:११, १४) आम्ही जे शिकलो त्याबद्दल गुणग्राहकता प्रदर्शित करण्यासाठी, ऑगस्टमध्ये आवेशी कार्य करणे हा एक उत्तम मार्ग ठरेल. नव्यानेच सहवासात आलेल्यांनी, त्यांना शिकवल्या जाणाऱ्‍या गोष्टींचा उपयोग करण्याविषयी एक सकारात्मक मनोवृत्ती प्रदर्शित करावी असेही आम्हाला वाटते. आमच्या काही पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मा प्राप्त नसलेले प्रचारक होण्यास तयारी दाखवण्याइतकी प्रगती केली असल्यास, त्यांना तसे करण्यास संधी देण्यासाठी ऑगस्टचा महिना एक उत्तम कालावधी असेल.

५ प्रचारक किंवा पायनियर या नात्याने सेवा करीत असताना, यहोवा आमच्याकडून जे अपेक्षितो ते कठीण नाही हे आम्ही लक्षात ठेवले तर आम्हाला मदत मिळेल. (१ योहान ५:३) आम्हाला तो आधार देण्याचे अभिवचन देतो. (इब्री. १३:५ब, ६) लोकांची बेपर्वाई, भावनाशून्यता, किंवा प्रतिकार असताना देखील, आम्ही सकारात्मक असावे व प्रचार चालू ठेवावा कारण आम्ही तसे करावे अशी देवाची इच्छा आहे.—१ तीम. २:३, ४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा