वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९४ पृ. ५
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९४
आमची राज्य सेवा—१९९४
km ४/९४ पृ. ५

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत फेब्रुवारी २८, ते जून १३, १९९४ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ पवित्र शास्त्र वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. द वॉचटावरच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:

१. देवाची कृपा असणाऱ्‍यांना अरिष्ट सहन करावे लागत नाही. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w९२ ९/१५ पृ. ४.]

२. नहेम्या १०:३४ नुसार नियमशास्त्रात लाकडाची अर्पणे करण्यास आज्ञापिले होते. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR८६ ३/१ पृ. २९.]

३. ईयोब ३१:१ मधील त्याचे समर्थनाचे शब्द, येशूने मत्तय ५:२७, २८ मध्ये जे शिकवले त्याच्याशी सुसंगत आहेत. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w७८ १२/१५ पृ. ३२.]

४. ख्रिस्ताच्या १,५०० वर्षांपेक्षा अधिक वर्षांआधी, ईयोबाने पुनरुत्थानाबद्दल आशा प्रकट केली होती. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा ईयोब १४:१३ आणि w९३ ४/१५ पृ. ११.]

५. परुशी आणि शास्त्री, आपल्या पायाखालच्या चिखलासारखे वागवत असणाऱ्‍या, सामान्य लोकांना सूचित करण्यासाठी, ‘अम्‌ह.’आʹरेटस्‌ म्हणजे “धरतीचे [मातीचे] लोक,” या इब्री भाषेतील शब्दाचा उपयोग करत होते. [gt अध्याय ८५]

६. एस्तेर १:१०-१२ मधील अहवाल एखाद्या समजूतदार व्यक्‍तिला याची गुणग्राहकता बाळगण्यास मदत करतो की, सौंदर्यापेक्षा अधीनता आणि आज्ञाधारकता अधिक मोलाची आहे. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w७९ ३/१५ पृ. १४.]

७. यहोवाबद्दल आणि त्याच्या मार्गांबद्दल गुणग्राहकता बाळगल्यामुळे, ईश्‍वरी भक्‍ती, त्याच्याबरोबर प्रेमपूर्ण जवळीक असल्याचे प्रकट करते. [uw पृ. १९ परि. १५]

८. लूक १६:१९-३१ मधील श्रीमंत मनुष्य आणि लाजर यांचा पवित्र शास्त्र अहवाल एक सत्य जीवन कथा आहे. [gt अध्याय ८८]

९. येशूने लूक १६:९ मध्ये ‘अनीतीकारक धनाचा’ उल्लेख केला तेव्हा तो बेकायदेशीररित्या मिळवलेल्या संपत्तीबद्दल बोलत होता. [gt अध्याय ८७]

१०. लूक १७:३४, ३५ मध्ये “घेतला जाईल,” याचा अर्थ नाश होय. [gt अध्याय ९३]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. ईयोबाचे पुस्तक कोणते दोन महत्त्वपूर्ण प्रश्‍न समोर मांडते? [si पृ. ९५ परि. १]

१२. ईयोबाच्या परीक्षेचा काळ ठरवण्यासाठी, ईयोब १:८ मधील विधान आमची कशी मदत करते? [si पृ. ९५ परि. ४]

१३. येशूच्या शिष्यांनी त्यांच्या नातलगांचा “द्वेष” करावा असे तो म्हणाला, तेव्हा त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता? (लूक १४:२६) [gt अध्याय ८४]

१४. योहान ११:२६ मधील येशूचे शब्द कधी आणि कोणाच्या संदर्भात खऱ्‍या अर्थाने सत्य ठरतील? [gt अध्याय ९०]

१५. मेलेल्यातून लाजराला उठवणे हा सदुक्यांना जोरदार टोला का होता? [gt अध्याय ९१]

१६. “देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे,” या येशूने सदुक्यांना दिलेल्या उत्तराला आम्ही कसे समजावे? (लूक १७:२१) [gt अध्याय ९३]

१७. लूक १८:११, १२ मध्ये प्रकट केलेल्या परुश्‍यांच्या कोणत्या मनोवृत्तीस ख्रिश्‍चनांनी टाळावे? [gt अध्याय ९४]

१८. येशू हा कधीही पाप न केलेला परिपूर्ण मनुष्य होता, तरीदेखील तरूण श्रीमंत अधिकाऱ्‍याने त्याला “उत्तम” म्हटल्यावर त्याने आक्षेप का घेतला? (मार्क १०:१७, १८) [gt अध्याय ९६]

१९. ख्रिस्ती ऐक्याला हातभार लावणारे दोन महत्त्वाचे घटक कोणते आहेत? [uw पृ. ८ परि. ८]

२०. जर एखाद्या व्यक्‍तिने ती त्रैक्यामध्ये विश्‍वास करत असल्याचे सांगितले तर, त्रैक्य खोटे असल्याचे सिद्ध करण्याआधी त्या विषयाबद्दल तिला तिचे मत व्यक्‍त करण्यासाठी आमंत्रण देणे सुज्ञतेचे का आहे? [uw पृ. १६ परि. १०]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. ईयोब ३:१४ मध्ये उल्लेखिलेली “ओसाड स्थाने” [पं.र.भाषांतर] ---------------------- यांना सूचित करतात. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w७९ ४/१५ पृ. ३१.]

२२. एस्तेरच्या दिवसातील यहुद्यांप्रमाणे यहोवाचे साक्षीदार शत्रुंपासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्यरितीने ---------------------- यांच्याकडे मागणी करतात. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w८६ ३/१५ पृ. २५.]

२३. सुमारे ---------------------- मानवी “लेखनिक” पवित्र शास्त्राची नोंद करण्यास उपयोगात आणले गेले असले तरी, ---------------------- स्वतः त्याचा लेखक आहे. [uw पृ. २० परि. २]

२४. स्वातंत्र्याच्या आत्म्याचा उगम ---------------------- याच्याकडून झाला. [uw पृ. १० परि. १०]

२५. ---------------------- या सरळ व नम्र विनंतीसह नहेम्या त्याच्या पुस्तकाची समाप्ती करतो. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन]

पुढील विधानांतून अचूक उत्तरे निवडा:

२६. येशूचे शिष्य पृथ्वीचे मीठ आहेत म्हणजे, (त्यांनी छळ सहन केला पाहिजे; ते सौम्यतेने बोलतात; लोकांवर त्यांचा टिकवण्याचा प्रभाव आहे). [gt अध्याय ८४]

२७. योहान १:१ मधील वचन (एका; दोन; तीन) व्यक्‍तिला/व्यर्क्‍तिना सूचित करते. [uw पृ. १६ परि. ११ (३)]

२८. स्तोत्रसंहिता ९:१० नुसार, देवाचे नाव माहीत असणे म्हणजे (केवळ यहोवा हे नाम जाणणे; त्याच्या उद्देशांविषयी काही माहिती असणे; त्याच्या अधिकाराबद्दल आदर राखणे व त्याच्या आज्ञांचे पालन करणे). [uw पृ. १८ परि. १४]

२९. लाजर, मार्था आणि मरीया हे (यरुशलेम; बेथलेहेम; बेथानी) येथे राहात होते. [gt अध्याय ८९]

३०. उत्पत्ती १:१ आणि १:२६ मध्ये “देव” यासाठी भाषांतरीत केलेला इब्री शब्द (’ॲद․नायʹ; ’ए․लो․हिमʹ; शाड्‌․डायʹ) आहे. [uw पृ. १७ परि. ११ (४)]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

नहे. १३:२३-२७; एस्तेर १:१७-२०; ईयोब १४:१४, १५; २६:७; नीती. ३:५, ६

३१. पृथ्वीला तिच्या जागेवर स्थिर ठेवण्यास कोणताही दृश्‍य आधार नाही. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w९२ ५/१५ पृ. ५.]

३२. सोबती शोधणाऱ्‍या खऱ्‍या देवाच्या उपासकांनी, केवळ यहोवासोबत समर्पित नातेसंबंधात असणाऱ्‍या सहविश्‍वासू बरोबरच विवाह केला पाहिजे. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w८९ ६/१ पृ. १४.]

३३. यहोवाला मृत लोकांचे पुनरुत्थान करण्याची मनःपूर्वक इच्छा आहे. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR९१ १२/१ पृ. ७.]

३४. आमचे विचार आणि आमचे हेतू देवाकडून मार्गदर्शित असल्याचे आमच्या संपूर्ण जीवन-पद्धतीवरून दिसून आले पाहिजे. [uw पृ. १० परि. ११]

३५. योग्य अधिकाराला अनादर दाखवण्यामुळे इतरांवर त्याचा वाईट प्रभाव पडू शकतो. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w७९ ३/१५ पृ. १४.]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा