वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९४ पृ. ६
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९४
आमची राज्य सेवा—१९९४
km ४/९४ पृ. ६

घोषणा

▪ साहित्य सादरता

एप्रिल व मे: टेहळणी बुरुज किंवा अवेकची! एका वर्षाची वर्गणी ६०.०० रुपयांना. सहा महिन्यांच्या वर्गण्या आणि मासिक आवृत्तींच्या एका वर्षाच्या वर्गण्या ३०.०० रुपयांना आहेत. (मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.)

अलिकडेच, पुष्कळ नियतकालिकांच्या भारतीय भाषेतील आवृत्तींच्या काळात बदल झाल्यामुळे, आम्ही तुम्हाला पुन्हा विनंती करतो की कृपया हे लक्षात ठेवा:

वॉचटावर आता कन्‍नड, मल्याळम, मराठी, तामिळ व तेलगू भाषेत पाक्षिक आहे; ते बंगाली, गुजराती, हिंदी, नेपाळी व उर्दू भाषेत मासिक आहे.

अवेक! आता मल्याळम व तामिळमध्ये पाक्षिक आहे; ते गुजराती, कन्‍नड व तेलगू भाषेत मासिक आहे.

जून: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक ४०.०० रुपयांना. जेथे हे स्वीकारले जात नाही तेथे, कोणत्याही १९२-पानी पुस्तकाची, १२.०० रुपयांच्या नियमित दरात सादरता केली जाऊ शकते. इंग्रजीतील, जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? हे पुस्तक देखील ४०.०० रुपयांना सादर केले जाऊ शकते.

जुलै: कोणत्याही तीन ३२-पानी पुस्तिकांना मिळून ३.०० रूपये. आमच्याकडे खालील पुस्तिकांचा भरपूर साठा उपलब्ध आहे: इंग्रजी, मराठी आणि तामिळ यामध्ये सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल; इंग्रजी, मराठी आणि पंजाबी यामध्ये कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव; इंग्रजी मध्ये पित्याच्या शोधात (इंग्रजी) (बुद्ध लोकांसाठी); इंग्रजी, गुजराती, हिंदी, कोंकणी (कन्‍नड व गोअन), मनीपुरी, मल्याळम, पंजाबी, आणि तामिळ यामध्ये काळजी वाहणारा देव आहे का?; इंग्रजी, लुशाय, मल्याळम आणि तामिळ यामध्ये मुक्‍तीकडे निरवणारा ईश्‍वरी सत्याचा मार्ग; इंग्रजी, हिंदी, लुशाय, मराठी, पंजाबी आणि तामिळ यामध्ये जीवनात आणखीन पुष्कळसे आहे!; इंग्रजी, गुजराती, खासी, कोंकणी (कन्‍नड आणि गोअन), लुशाय, मनीपुरी, मराठी, मल्याळम आणि तामिळ यामध्ये “राज्याची ही सुवार्ता”; इंग्रजी, हिंदी, नेपाळी, पंजाबी आणि तामिळ यामध्ये मरणावर विजय—ते तुम्हाकरता शक्य आहे का? (इंग्रजी). तुमच्या भाषेत कोणत्याच पुस्तिका नसतील तर, शाळा (इंग्रजी) माहितीपत्रकाला सोडून कोणतेही माहितीपत्रक प्रत्येकी ४.०० रुपयांना सादर करा. कृपया नोंद घ्या: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-14) यावर पाठवावी.

▪ व्यावहारिक असेल तेथे, वडिलांनी, दिवस मोठा होतो तसे संध्याकाळच्या साक्षकार्यात मंडळीला सहभाग घेण्यासाठी योजना करावी.

▪ मंडळ्या आतापासून १९९४ “ईश्‍वरी भय” अधिवेशनासाठी इंग्रजी, मल्याळम आणि तामिळ यामध्ये बॅज कार्ड तसेच बॅज कार्ड होल्डरसाठी त्यांच्या पूर्ण गरजेनुसार मागणी पाठवण्यास सुरवात करू शकतात कारण, ती मागितल्याविना पाठविण्यात येणार नाहीत. त्यांची मागणी, नियमित लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-14) यावर पाठवावी. कृपया नोंद घ्या: केवळ प्लास्टिक बॅज कार्ड होल्डर (किंवा वैद्यकीय अधिकृत सूचना यांचे होल्डर) पाठविल्यास ते बहुधा पोस्टात हरवले जातात. यास्तव, कृपया केवळ याच गोष्टींना एका लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर मागवू नये. पुष्कळ गोष्टी असलेल्या फॉर्मवर ती दाखवून द्यावीत. यामुळे इतर साहित्यासोबत एकाच पेटीत ती बांधून देता येतील. गरज भासल्यास, केवळ बॅज कार्डची मागणी केली जाऊ शकते कारण ती टपालात हरवली जात नाहीत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा