घरमालकाच्या गरजांना साजेसे साहित्य सादर करा
आम्ही, या महिन्यात शक्य असेल त्या सर्व ठिकाणी तरुण लोक विचारतात (इंग्रजी) हे पुस्तक सादर करणार आहोत तरी, अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक, अधिक उचित असेल त्या ठिकाणी सादर केले जाऊ शकते. जर घरमालकास एकच भाषा माहीत असेल ज्या भाषेत तरुण लोक विचारतात (इंग्रजी) हे पुस्तक उपलब्ध नसेल व गत्यंतर नसेल तर, एखादे छोट्या आकाराचे पुस्तक सादर केले जाऊ शकते. तरुण लोक विचारतात (इंग्रजी) हे पुस्तक कोणालाही—आजोबा अगर आजी, तरुण किंवा कुमारावस्थेतील मुले असणाऱ्या पालकाला किंवा स्वतः तरुण लोकांना, सादर केले जाऊ शकते, कारण पुष्कळ युवक, तरुण लोकांना गोंधळवून टाकणाऱ्या समस्यांबद्दल चिंतीत आहेत.
२ तुम्हाला असे काही म्हणण्यास उचित वाटेल:
▪“या त्रस्त काळात वाढणे इतके सोपे नाही. तरुण, पुष्कळ नवीन परिस्थितींचा सामना करतात ज्यांच्यासाठी त्यांना महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. ‘मी मद्यपान करावे का? मादक पदार्थांचे सेवन करावे का? विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत कोणते आचरण उचित आहे?’ जेव्हा तरुण लोक अशा मूलभूत विषयांबद्दल विचारतात तेव्हा, बहुधा त्यांच्यावर विरोधात्मक उत्तरांचा भडिमार होतो. तुम्हाला काय वाटते, पुष्कळ जण सल्ल्यासाठी कोठे वळतात? [विवेचनांसाठी वाव द्या.] तरुण लोक विचारतात ते प्रश्न—उपयोगी पडणारी उत्तरे, हे पुस्तक मदतदायी माहिती पुरवते. [अनुक्रमणिकेकडे लक्ष वेधवा व त्यात दिलेले विविध विषय दाखवा.] युवकांना समजण्यास सोपी आणि वास्तविक उत्तरे हवी असतात. या पुस्तकातील उत्तरे, पवित्र शास्त्राला काय सांगायचे आहे, यावर आधारित आहेत.”
३ तुम्ही उपयोगात आणू शकता अशी आणखी एक सादरता येथे आहे:
▪“तरुण लोक आज पुष्कळ दबावाखाली आहेत. त्यांना, यशस्वीरित्या मात करण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यांची मदत करण्यात होईल तितके करण्यास प्रयत्न करत असताना, व्यावहारिक मार्गदर्शन पुरवणाऱ्या गोष्टीसाठी आम्ही पाहात नाही का? [विवेचनासाठी वाव द्या.] सर्वात तीव्र दबाव इतर युवकांकडून म्हणजेच त्यांच्या समवयस्कांकडून येतात. या पुस्तकातील, पाने ७६ आणि ७७ वर दिलेल्या चित्रांकडे लक्ष द्या. [या चित्रांच्या मथळ्यांकडे आणि पान ७७ वर, तिरप्या अक्षरातील परिच्छेदांकडे लक्ष वेधवा.] या अध्यायातील पुढील पानांवर प्रामाणिक, व्यावहारिक उत्तरे दिली आहेत.”
४ हे, विशेषकरून युवकांसाठी, निश्चितच “कठीण दिवस” आहेत. (२ तीम. ३:१) तरुण लोक विचारतात हे पुस्तक एखाद्या तरुण व्यक्तीला आजच्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यात खरोखरीच मदत करू शकते. त्यातील ३९ अध्यायात पुष्कळ चित्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, आणि त्यातील लेख वास्तविक व व्यावहारिक आहेत. म्हणून जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा, या उत्तम प्रकाशनाचा उपयोग करण्यास दक्ष असा.
५ जेथे तुम्हाला वाटते की, एखादा घरमालक आपल्या संदेशाच्या आध्यात्मिक पैलूत आस्था दाखवण्याची शक्यता आहे, विशेषतः जेव्हा ते पवित्र शास्त्राची काही पार्श्वभूमी असणारी व्यक्ती आहेत तेव्हा, अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सादर करण्यास दक्ष असा. हे पुस्तक पवित्र शास्त्राच्या मूलभूत शिकवणींचे स्पष्टीकरण देण्यासाठी शास्त्रवचनीय अवतरणांनी कसे युक्त आहे ते दाखवा, आणि त्याचवेळी त्यांच्यासोबत त्याचा नियमितपणे अभ्यास करण्यास सादर करा. तुमच्या सादरतेत योहान १७:३ वाचा आणि हे पुस्तक त्यांना तारणासाठी अत्यावश्यक असलेले अचूक ज्ञान मिळवण्यात मदत करील ते दाखवा. आस्था दाखवणाऱ्या कोणालाही, मार्च २६ रोजी स्मारक विधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्याची खात्री करा.
६ तुम्हाला आपली छोट्या आकाराची विविध पुस्तके घेऊन जाणे देखील लाभदायक वाटेल की जेणेकरून, दरवाजावर सुरू झालेल्या विषयावरून ओळखल्या जाऊ शकणाऱ्या घरमालकाच्या वैयक्तिक गरजांना साजेसे साहित्य तुम्ही सादर करू शकाल. मृत जणांची स्थिती, पवित्र शास्त्राची अचूकता, खरी शांती व सुरक्षितता पाहण्याची आमची आशा, कौटुंबिक जीवन, आनंद मिळवण्याचा मार्ग, इत्यादि विषय नेहमीच उद्भवतात आणि या प्रत्येक विषयावरील उत्तम प्रकाशनांनी आम्ही आशीर्वादित आहोत.
७ यासाठी महिन्याची सादरता असलेले प्रकाशन सादर करत असताना सकारात्मक असा, परंतु तुम्हासोबत विविध प्रकाशने घेऊन जा कारण, आम्हाला पवित्र शास्त्र संदेशाकडे ‘सर्व माणसांना आकर्षित’ करावयाचे आहे आणि त्यांना सत्याच्या जीवनदायी पाण्यातून प्यावयास लावायचे आहे.—१ तीम. २:४; प्रकटी. ७:१७.