साध्या व प्रभावकारी पुनर्भेटी
१ तुम्ही नियमितपणे पुनर्भेटी करता का की, तुम्हाला बहुधा काय म्हणावे हे कळत नसल्याने ते कठीण वाटते? भयभीत होण्याची काही गरज नाही. तीन गोष्टी तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करतील: (१) चांगली तयारी; (२) काही थोडक्या पवित्र शास्त्रीय विषयांवरील एक किंवा दोन मुद्यांची चर्चा करण्याची क्षमता; आणि (३) घरमालकाचा दृष्टिकोन ऐकण्याची इच्छा.
२ पुनर्भेटीसाठी तयारी करताना, घरमालकासोबत चर्चिण्यासाठी कोणता विषय उचित असेल हे विचारात घ्या. तो एखादा विद्यार्थी आहे का? या महिन्यात, पुष्कळ विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा सुरू होण्याआधी तयारी करण्यासाठी सुटी असेल व त्यासाठी शाळेत असण्याऐवजी ते घरीच भेटतील. अशाप्रकारे, त्यांच्या अभ्यासातून मिळणाऱ्या विरंगुळ्याचा ते आनंद घेत असताना, तुम्ही त्यांच्याशी एखाद्या पवित्र शास्त्रीय विषयाची चर्चा करू शकता. तुम्हाला बहुतेक, राज्य संदेशाचा स्वीकार करणारे असे काही भेटतील. तुम्ही आधीच्या पुनर्भेटीच्या समाप्तीला एखादा प्रश्न समोर मांडला का, किंवा घरमालकाने एका विशिष्ट विषयात रस दाखवला का? तुमच्या नोंदींची उजळणी करा, आणि प्रभावकारी पुनर्भेट करण्यात आवश्यक असलेली माहिती शोधण्यासाठी युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकाचा वापर करा. तुम्ही भेट देता त्यावेळी, स्नेहपूर्ण व मैत्रिपूर्ण असा. घरमालकाला त्याच्या नावाने अभिवादन करा.
३ तुम्ही घरमालकाला टेहळणी बुरुज आणि अवेक! दिले असेल तर, तुमची पुनर्भेट एखाद्या नियतकालिकेतील एक किंवा दोन मुद्यांवर आधारित असू शकेल. तुम्ही पहिल्याच भेटीत एखादी पत्रिका दिली असेल तर, तुम्ही एकतर त्या पत्रिकेवरच विवेचन द्याल किंवा एखाद्या नियतकालिकेतील किंवा माहितीपत्रकातील उचित मुद्याचा संदर्भ देऊन, दिलेल्या प्रकाशनाचा मागोवा घ्याल.
४ चर्चेदरम्यान, घरमालक पुष्कळ चुकीच्या दृष्टिकोनांना व्यक्त करील. तो जे काही म्हणतो त्या सर्वांची चर्चा करण्याची गरज नाही. त्याउलट, चर्चिल्या जाणाऱ्या विषयाला धरून राहा. त्याच्या कोणत्याही अशास्त्रवचनीय कल्पनांना भविष्यातील पुनर्भेटींमध्ये सुधारता येईल.
५ या महिन्यात लोकांना भेटी देत असताना, त्यांना पुनः-पुन्हा मार्च २६ रोजी, ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मारक विधीसाठी आमंत्रित करण्याचे लक्षात ठेवा आणि स्मारक विधीच्या स्थानाची व वेळेची त्यांना आठवण करून द्या. त्यांच्यासोबत त्या घटनेच्या महत्त्वाची आणि उपस्थित राहण्याच्या आज्ञेचे पालन करण्याच्या गरजेची उजळणी करा. मार्च दरम्यान सर्व प्रकारे, साध्या व प्रभावकारी पुनर्भेटींद्वारे दाखवलेल्या कोणत्याही आस्थेचा मागोवा घेण्याचा निश्चय करा.