वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९४ पृ. २
  • मार्चसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्चसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • उपशिर्षक
  • मार्च ७ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च १४ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च २१ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च २८ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९४
km ३/९४ पृ. २

मार्चसाठी सेवा सभा

मार्च ७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०० (१०८)

१० मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यातील काही निवडक घोषणा.

१५ मि:“तुमच्या आशेच्या जाहीर घोषणेला डगमगू न देता घट्ट धरून ठेवा.” टेहळणी बुरुज अभ्यास चालकांकडून प्रश्‍नोत्तराने पूर्ण करणे. सभांमध्ये विवेचन देण्याच्या भीतीवर मात केलेल्यांकडून विवेचन घ्या. आगाऊ तयारीच्या गरजेवर जोर द्या. प्रत्येक आठवडी मंडळीच्या टेहळणी बुरुज अभ्यासात पूर्ण सहभाग घेण्याची तयारी करण्यासाठी मंडळीला उत्तेजन द्या.

२० मि:“घरमालकाच्या गरजांना साजेसे साहित्य सादर करा.” श्रोत्यांशी चर्चा. चांगली तयारी केलेल्या प्रचारकांना परिच्छेद २ आणि ३ मधील सादरतेचे प्रात्यक्षिक करण्यास सांगा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, श्रोत्यांनी सादरतेमधून काय शिकून घेतले त्यावर त्यांचे विवेचन घ्या. सर्वांना या महिन्यात तरुण लोक विचारतात (इंग्रजी) हे पुस्तक सादर करण्यात सहभाग घेण्यासाठी उत्तेजन द्या.

गीत २२५ (१८) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च १४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०५ (११८)

१० मि:स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त. या आठवडी क्षेत्र सेवेत वापरता येतील अशा चालू नियतकालिकांतील विशिष्ट मुद्यांकडे लक्ष आकर्षित करा. प्रचारकांना त्यांच्या सर्व पवित्र शास्त्राभ्यासांना, आस्थेवाईक व्यक्‍तींना आणि परिचित असणाऱ्‍यांना या आठवडी भेटी देण्यास व त्यांना स्मारक विधीसाठी आमंत्रित करण्यास आठवण करून द्या.

१५ मि:“तुम्ही एप्रिलमध्ये यहोवाची स्तुती अधिक वाढवू शकता का?” प्रश्‍नोत्तराने पूर्ण करणे. भूतकाळात साहाय्यक पायनियरींग केलेल्यांकडून विवेचन घ्या. या विशेषाधिकाराचा फायदा घेण्यासाठी त्यांनी त्यांची कामे कशाप्रकारे जुळवून घेतली ते स्पष्ट करण्यास सांगा. एप्रिलमध्ये साहाय्यक पायनियरींग करण्याची योजना करणाऱ्‍या सर्वांना त्यांचे अर्ज लवकरात लवकर देण्यास उत्तेजन द्या.

२० मि:“स्मारक विधीसाठी त्यांचे स्वागत आहे असे त्यांना वाटू द्या.” प्रश्‍नोत्तराने पूर्ण करणे. परिच्छेद ३ नंतर, सेवा सेवक नवोदिताचे स्मारक विधीसाठी स्वागत करत असल्याचे छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १५० (८३) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च २१ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १४३ (७६)

१० मि:स्थानिक घोषणा व त्यात जमाखर्च अहवाल आणि देणगीच्या पोचपावतीचा समावेश करा. “यथाकाळी मिळणारे अन्‍न,” या पेटीची चर्चा करा. आस्थेवाईक व्यक्‍तींना, एप्रिल १० रोजी देण्यात येणाऱ्‍या खास भाषणासाठी आमंत्रण देण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. स्मारक विधी सोहळ्याच्या व्यवस्थेची उजळणी करा.

२० मि:“यहोवाच्या सेवेत आनंद मिळवणे.” श्रोत्यांशी पुरवणीच्या परिच्छेद १-११ ची चर्चा. एप्रिलमध्ये साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी, स्थानिक प्रचारक त्यांचे आराखडे कसे जुळवून घेऊ शकतात याचे व्यावहारिक मार्ग दाखवा. या कार्यात होईल तितक्या जणांना सहभाग घेण्यास उत्तेजन द्या.

१५ मि:“साध्या व प्रभावकारी पुनर्भेटी.” श्रोत्यांशी चर्चा करा. पुनर्भेटीच्या वेळी संभाषण कसे सुरू करावे हे दाखवणारे प्रात्यक्षिक सादर करा. एखादे चांगले, संपूर्ण माहितीयुक्‍त घरोघरच्या कार्याचे नोंदपत्रक राखण्याच्या गरजेबद्दल श्रोत्यांना आठवण करून द्या.

गीत ८७ (४७) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च २८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ११२ (५९)

१० मि:स्थानिक घोषणा. एप्रिलच्या सादरतेला घेऊन, स्थानिक क्षेत्रात साक्षकार्य करण्याच्या उचित मार्गांची चर्चा करा आणि प्रात्यक्षिक दाखवा. काही प्रचारकांनी वर्गण्या कशा प्राप्त केल्या आहेत ते दाखवणाऱ्‍या अनुभवांचे कथन करा.

१५ मि:“यहोवाच्या सेवेत आनंद मिळवणे.” श्रोत्यांशी पुरवणीच्या १२-२० परिच्छेदांची चर्चा. लोकांना सत्याप्रत निरवण्यासाठी पवित्र शास्त्राभ्यास चालवण्याचे महत्त्व दाखवा, आणि एप्रिल दरम्यान प्रत्येक प्रचारकांनी किमान एकतरी अभ्यास मिळवण्याचा प्रयत्न करावा हा सल्ला द्या. एप्रिल १६ रोजी खास नियतकालिक दिवसासाठी आवेश निर्माण करा. त्या दिवसाच्या क्षेत्र कार्य व्यवस्थेची घोषणा करा आणि सर्वांना सहभाग घेण्यासाठी उत्तेजन द्या.

२० मि:“ईश्‍वरी शिक्षण शक्‍तिशाली प्रभाव पाडते.” लेखाला प्रश्‍नोत्तराने पूर्ण करणे. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे परिच्छेद आणि उल्लेखिलेली शास्त्रवचने वाचा. अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने आणि अधिवेशनातील नव्या प्रकाशनांचा उपयोग केल्याने मिळालेल्या फायद्यांची वैयक्‍तिक गुणग्राहकता व्यक्‍त करणाऱ्‍या संक्षिप्त विवेचनांना वाव द्या.

गीत १५ (११९) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा