तुमच्या आशेच्या जाहीर घोषणेला डगमगू न देता घट्ट धरून ठेवा
१ टेहळणी बुरुज अभ्यास, देवाच्या लोकांना आज, ‘यथाकाळी आध्यात्मिक अन्न’ पुरवण्याचे प्राथमिक माध्यम आहे. (मत्त. २४:४५) आम्ही या महत्त्वपूर्ण सभेला दोन मुख्य हेतूंसाठी उपस्थित राहतो: आध्यात्मिकरित्या उभारणी होण्यासाठी, आणि इतरांना आमच्या आशेची जाहीर घोषणा करण्यासाठी.—इब्री. १०:२३-२५.
२ स्वतःला लाभ करून घेणे: असा अंदाज केला जातो की, बहुतेक सर्वच मंडळ्यांमध्ये, श्रोत्यांचा केवळ एक तृतीयांश भागच धड्याचा आगाऊ अभ्यास करून येतो. त्याचप्रमाणे, जवळजवळ तेवढेच लोक विवेचन देण्यात भाग घेतात. टेहळणी बुरुज अभ्यासात पुरवलेले जड आध्यात्मिक अन्न, सभेच्या दरम्यानच पूर्णपणे पचवले जाऊ शकत नाही. तुम्हाला त्या साहित्याचा आगाऊ अभ्यास करण्यासाठी वेळ राखून ठेवण्याची गरज आहे.
३ अभ्यासाची तयारी करतेवेळी, तुम्हाला पहिल्यांदा लेखाच्या समाप्तीजवळ दिलेले पेटीतील प्रश्न वाचणे आणि त्यावर विचार करणे, मदतदायी असल्याचे दिसेल. हे, धड्यामध्ये विचारात घेतल्या जाणाऱ्या मुख्य मुद्यांवर तुमचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करील.
४ अभ्यासाच्या दरम्यान काय म्हटले जाते ते काळजीपूर्वकतेने ऐका. चालकांनी सुरवातीला केलेल्या उल्लेखाकडे लक्ष द्या; अशी विवेचने अभ्यासाची पुढची तयारी करणारी अशी असतात. ते तीनचार प्रश्न समोर मांडतील ज्यांची उत्तरे दिली जातील, किंवा जर या सप्ताहाचा धडा मागील सप्ताहाच्या विषयाचा पुढचा भाग असेल तर, ते मागील सप्ताहाच्या धड्यातील काही ठळक मुद्यांची उजळणी करतील. जर एखाद्या पवित्र शास्त्रीय भविष्यवादाच्या किंवा शास्त्रवचनीय तत्त्वाच्या आमच्या समजेमध्ये काही बदल करावयाचा असेल तर, ते आपले लक्ष त्याकडे वेधतील. अर्थात, चालकांचे विवेचन संक्षिप्त असावे, कारण अभ्यासाचा एक हेतू, मंडळीला तिची आशा व्यक्त करण्यास संधी देणे, हा आहे. काय शिकलेत याबद्दल इतर विवेचन देत असताना त्यांचे काळजीपूर्वक ऐका; हे तुमचा विश्वास बळकट करण्यास मदत करील.
५ तुमच्या आशेची घोषणा करा: तुम्ही अभ्यासात नियमितपणे विवेचने सादर करता का? संक्षिप्त, स्पष्ट उल्लेखयुक्त विवेचने अधिक चांगली असतील. (पडताळा लूक २१:१-४.) अंतःकरणातून दिलेल्या साध्या विवेचनाची सर्वजण गुणग्राहकता बाळगतील. बहुधा, प्रश्नाचे पहिले उत्तर संक्षिप्त आणि सरळ असावे. यामुळे इतरांना एखादे शास्त्रवचन सांगण्यास किंवा परिच्छेदातील एखाद्या माहितीकडे लक्ष वेधण्यास मुभा मिळते. अशाप्रकारे पुष्कळांना त्यांच्या आशेची जाहीर घोषणा करण्यास वाव मिळतो. विवेचने नेहमी सकारात्मक आणि उभारणीकारक असली पाहिजेत.
६ तुम्ही नुकतेच अभ्यासाला उपस्थित राहण्यास सुरवात केली असेल किंवा विवेचन देण्यास भीत असाल तर, तुम्ही चालकांकडून मदत घेण्याची इच्छा बाळगाल. एखाद्या विशिष्ट परिच्छेदाचा विचार करीत असताना, त्यांना तुमच्या उंचावलेल्या हाताकडे लक्ष देण्यास सांगा. कदाचित तुम्ही, दिलेले शास्त्रवचन वाचण्यास आणि त्याच्या अर्थाचा संक्षिप्त अवलंब करण्यास स्वतःला सादर करू शकता. विवेचन देतेवेळी तुम्हाला काय म्हणायचे आहे याची आठवण करून देण्यासाठी, तुम्ही समासात काही नोंदी करू शकता. तुम्ही युवक आहात तर, हे लक्षात ठेवा की, तुमची विवेचने स्वागतार्ह आहेत आणि त्यांची गुणग्राहकता बाळगली जाते.—मत्त. २१:१६.
७ आम्ही आमचा विश्वास व्यक्त करावा हे महत्त्वपूर्ण आहे, आणि टेहळणी बुरुज अभ्यास आम्हाला तसे करण्यास उत्तम संधी पुरवतो. सेवक होण्यास योग्य झालेले (इंग्रजी) या पुस्तकाने अशाप्रकारे व्यक्त केले: “समस्या कोणतीही असो, तिच्यावर मात करा आणि एक तरी उत्तर देण्यास स्वतःला तयार करा. तुमचा हातभार सभेला मिळेल, आणि तुम्हाला त्याबद्दल समाधान वाटेल.” (पृष्ठ ९९) तर मग, अगदी पुढच्याच टेहळणी बुरुज अभ्यासात, निदान एक तरी विवेचन देण्याची योजना का करू नये?—नीती. १५:२३.