चुकीचा दयाळुपणा दाखवण्यापासून सावध असा
१ यहोवाचे लोक त्यांच्या दयाळुपणासाठी आणि उदारतेसाठी प्रसिद्ध आहेत. येशूने त्याच्या हृदयस्पर्शी दाखल्यात सांगितलेल्या शेजारधर्म पाळलेल्या शमरोन्याचे अनुकरण आम्ही करतो तेव्हा, ते भौतिक मार्गाने प्रकट होते. (लूक १०:२९-३७) तरीसुद्धा, भौतिक मदतीसाठी पात्र नसलेले काही जण आपल्या दयाळुपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. यासाठी, इतरांसाठीची आपली प्रीती “ज्ञानाने व सर्व विवेकाने,” समतोल असण्यास हवी.—फिली. १:९, पं. रमाबाईं भाषांतर.
२ मंडळीत: उदाहरणार्थ, मदत घेण्यासाठी कोणी, बेकारीचे किंवा इतर कोणती कारणे सांगेल. कधीकधी असे लोक नोकरी शोधण्याचा एवढा प्रयत्न करत नाहीत, तर इतरांनी त्यांच्या जीवनाच्या आवश्यक गोष्टींना पुरवावे अशी त्यांची इच्छा असते. अशांबद्दल प्रेषित पौलाने सांगितले: “कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.”—२ थेस्स. ३:१०.
३ आम्ही सर्वच ‘कालवश व अनपेक्षित गोष्टींना वश’ आहोत, यासाठी आम्ही भौतिक गरजेत असलो व आम्हाला “आमची रोजची भाकर,” मिळत नसेल तर, त्यासाठी अती चिंतीत असण्याची गरज नाही, कारण यहोवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्यांना सर्व पुरवतो. (उप. ९:११; मत्त. ६:११, ३१, ३२) एखाद्या गरजवंताला कोणा वडिलांशी बोलणे फायदेकारक ठरेल. मदत पुरवण्यासाठी उभारलेल्या सरकारी कार्यक्रमांबद्दल वडील जाणून असतील आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची कामे पूर्ण करण्यात किंवा अशा कार्यक्रमांच्या आवश्यकता समजावून सांगण्यात मदत करू शकतील. कोणत्याही घटनेत, वडील मदत मागणाऱ्याच्या परिस्थितीची पाहणी करू शकतील आणि काय केले जाऊ शकते त्याबद्दल निर्णय घेऊ शकतील.—पडताळा १ तीमथ्य ५:३-१६.
४ प्रवासी भोंदू माणसे: प्रवासी भोंदू माणसांद्वारे मंडळीतील काहींना पैशांच्या आणि भौतिक गोष्टींच्या बाबतीत लुबाडण्याचे वृत्त संस्थेला मिळत राहतात. यामुळे आपण आश्चर्यचकित होऊ नये, कारण शास्त्रवचने ईशारा देतात की, “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीम. ३:१३) बहुधा ही भोंदू माणसे असा दावा करतात की, ते निराधार आहेत आणि घरी पुन्हा जाण्यासाठी वाहतुक व अन्नासाठी त्यांना पैशाची गरज आहे. ते प्रांजळ वाटत असले तरी, पुष्कळ घटनांमध्ये ते यहोवाचे साक्षीदार नसून केवळ तसे ढोंग करत असतात.
५ एखाद्या परकीय व्यक्तीने मदत मागितली तर, मंडळीतील कोणा वडिलांचा त्याबाबतीत सल्ला घेणे सुज्ञतेचे ठरेल की जेणेकरून, ती व्यक्ती आपला बांधव आहे किंवा नाही हे जाणण्यात ते पुढाकार घेऊ शकतील. त्याच्या मंडळीतील वडिलांना एखादा फोन करावा की, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या योग्यतेबद्दल खात्री मिळेल. अनेपक्षितपणे गरजवंत असणारे खरे बांधव आणि भगिणी हे समजून घेतील की, संबंधीत सर्व जणांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारची चौकशी केली जात आहे. दुसऱ्या बाजूस पाहता, अशा प्रकारच्या पूर्ण तपासणीद्वारे भोंदू माणसे उघडकीस येतील. आम्हाला अनोळखी असणाऱ्या सर्वांबद्दल कारण नसताना संशयास्पद असणे जरूरीचे नाही, परंतु दुष्ट भोंदू माणसांपासून आम्हाला सावध राहायचे आहे.
६ शलमोन राजाने सल्ला दिला: “ज्यांचे हित करणे योग्य आहे त्यांचे ते करणे तुझ्या हाताच्या आटोक्यात असेल तर ते त्यांच्यापासून आवरून धरू नको.” (नीती. ३:२७) आमच्या सुज्ञ समजदारीमुळे, चुकीचा दयाळुपणा दाखवण्यापासून सावध राहून देखील आपण कृपाळु राहू शकतो.