तुमच्या मंडळीच्या जाहीर भाषण सभेच्या कार्यक्रमास संपूर्ण पाठिंबा द्या
१ काही वर्षांपूर्वी एका तरुणाला, स्थानिक मंडळीच्या सभांची जाहिरात करणारी हस्तपत्रिका मिळाली. तो सत्याच्या शोधात असल्याकारणाने, त्याच रविवारी जाहीर भाषण सभेला उपस्थित राहण्याचे ठरवून तो सभागृहात वेळेच्या आधीच आला. एका प्रचारकाने उत्साहाने त्याचे स्वागत केले आणि चर्चेच्या दरम्यान त्याला पवित्र शास्त्र अभ्यास सादर केला, परंतु त्याने नकार दिला. तथापि, चांगल्या तयारी केलेल्या जाहीर भाषणाने तो इतका प्रभावीत झाला की, त्याने त्याचे मन बदलले आणि सभा संपल्यावर अभ्यास स्वीकारला. या तरुणाने जलद प्रगती केली आणि काही महिन्यांनंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. या अनुभवावरुन आम्ही निदान तीन मदतदायी धडे शिकू शकतो.
२ पहिला, जाहीर भाषण सभेची जाहिरात केली होती. तुमच्या मंडळीच्या सभेच्या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी तुम्ही छापील हस्तपत्रिकांचा वापर करता का? पुढील आठवडी देण्यात येणाऱ्या जाहीर भाषणाच्या विषयाची, अध्यक्ष घोषणा करतात तेव्हा, आमचे साहित्य सध्या वाचणारे असोत किंवा नसोत पण, आमच्या क्षेत्रात, त्या विषयावर विशेषकरून आस्था राखणाऱ्यांबद्दल विचार करा. काही लोकांना वाचण्याची आवड नसते किंवा त्यांना वाचायला कठीण जात असेल परंतु, शास्त्रवचनीय विषयावरील भाषण ऐकण्याची त्यांची इच्छा असेल.
३ दुसरा, नवोदिताचे उत्साहपूर्ण स्वागत केले गेले. तुम्ही सभागृहात होईल तितक्या लवकर येण्याची योजना कराल तर, तुमच्या बंधू व भगिणींना तसेच आस्थेवाईक जणांना अभिवादन करू शकता. (इब्री. १०:२४) एखादी नवोदित व्यक्ती पहिल्यांदाच उपस्थित राहात असेल तर, कशाची अपेक्षा करावी हे तिला कळणार नाही. आमच्या सभा, गीत आणि प्रार्थनेद्वारे सुरू होतात हे त्यास समजावून सांगा आणि सभा कशी चालवली जाते ते सुद्धा सांगा. योग्य असल्यास, त्याला तुमच्यासोबत बसायला आमंत्रण द्या, की जेणेकडून तुम्ही, तुमचे पवित्र शास्त्र आणि गीताचे पुस्तक त्याला दाखवू शकता. त्याचे काही प्रश्न असल्यास, सभा संपल्यावर तुमच्यासोबत त्यांची चर्चा करण्यासाठी त्याला आमंत्रित करा.
४ तिसरा, भाषणाची चांगली तयारी केली होती. जाहीर वक्ता या नात्याने, मंडळीचे प्रतिनिधीत्व करण्यास ज्यांना सुसंधी आहे ते, श्रोत्यांना अधिक प्रीती आणि सत्कर्मे करण्यास उत्तेजित करण्यासाठी साहित्याची तयारी आणि सराव करण्यात पुष्कळ तास खर्ची घालतात. आम्ही सर्वजण आज तणावाखाली आहोत आणि देव वचनातील तजेला देणारी सत्येच आम्हाला टिकून राहण्यासाठी आवश्यक मदत आहेत. अर्थात, जाहीर भाषण कितीही माहितीकारक असले तरी, जे सांगितले जाते त्याकडे आपण व्यक्तिगतरित्या जोपर्यंत नीट लक्ष देत नाही तोपर्यंत त्याचे काही महत्त्वच नसेल. भाषणाच्या दरम्यान बहुतेक समयी, मन एकाग्र करण्यास तुम्हाला जड जाते का? आम्ही अनेकदा आमच्या अधिवेशनांमध्ये करतो त्याप्रमाणे, संक्षिप्त टिपण घेणे मदतदायी असेल. प्रत्येक शास्त्रवचन वाचले आणि स्पष्ट केले जाते तसे, त्याचवेळी तुमच्या पवित्र शास्त्रात ते पाहण्यास निश्चित असा.
५ संस्थेने विविध प्रकारच्या शास्त्रवचनीय विषयांवर जाहीर भाषणे पुरवली आहेत. अध्यक्षीय पर्यवेक्षक किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाद्वारे काम केल्याने, वडील वर्ग मंडळीच्या जाहीर सभेच्या कार्यक्रमाची व्यवस्थित मांडणी करतात. चालू स्थानिक गरजांवर भाषण देण्यासाठी संस्थेने दिलेले विषय निवडले जातात. यापैकीची कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती चुकवू नका आणि तुमच्या मंडळीच्या साप्ताहिक जाहीर भाषण सभेस संपूर्ण पाठिंबा द्या.