यहोवाच्या ज्येष्ठ पुत्राचा जयजयकार करा!
१ रविवारी, निसान ९, सा.यु. ३३ रोजी, एका मोठ्या लोकसमुदायाने, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, “प्रभूच्या [यहोवा, न्यूव] नावाने येणारा राजा,” असा यहोवाच्या ज्येष्ठ पुत्राचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जयजयकार केला. (लूक १९:३८; इब्री. १:६) सोमवारी आणि मंगळवारी, निसान १० आणि ११ रोजी, येशूच्या पार्थिव जीवनातील त्या शेवटल्या दिवसांना सर्वात व्यग्र बनवून, तो त्याच्या जनसेवेत खूपच व्यापलेला होता.
२ आज, हातात लाक्षणिक खजुरीच्या झावळ्या घेतलेला त्याहून अधिक मोठा लोकसमुदाय उच्च स्वराने असे म्हणतो: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.” (प्रकटी. ७:९, १०) मार्च, २६ रोजी, आपण ख्रिस्ताच्या मृत्युचा स्मारक विधी साजरा करण्यास एकत्रित येणार आहोत. ती तारीख जवळ येत असता, सेवेतील आपले परिश्रम अधिक वाढवून आपण या जागतिक स्तुतीच्या स्वरात अधिक भर घालू शकतो का?
३ क्षेत्र कार्य वाढवा: मार्च दरम्यान साहाय्यक पायनियरींग करण्यास आधीच पुष्कळ प्रचारकांनी त्यांची नावे दिली आहेत. तुम्हालाही त्यांच्यासोबत सहभागी व्हायला आवडेल का? असे असेल तर, तुमचा अर्ज विलंब न करता लगेचच द्या. कार्याबद्दल तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास, एखाद्या वडिलांना त्यांची उत्तरे देण्यास आवडेल.
४ तुम्ही साहाय्यक पायनियर या नात्याने सेवा करू शकाल किंवा नाही, तरीसुद्धा मार्च दरम्यान सेवेत पूर्ण सहभाग घेण्यास तुम्हाला आवडेल. त्या महिन्यात मंडळी दररोज, गटाच्या साक्षकार्याची व्यवस्था करू शकेल. त्या उद्देशास्तव, पुरेसे क्षेत्र राखून ठेवले पाहिजे.
५ शनिवारी, मार्च २६ रोजी, सर्व मंडळ्यांनी क्षेत्र सेवेच्या खास सभेसाठी व्यवस्था करावी. स्मारक विधीसाठी पुष्कळ तयारी करण्याची गरज असली तरी, जमेल त्या सर्वांनी, शनिवारी सकाळी क्षेत्र सेवेत भाग घ्यावा अशी शिफारस केली जाते. घरोघरी कार्य करण्यासोबतच, तुम्ही निमंत्रित केलेल्यांना येण्या-जाण्याची सोय आहे आणि त्यांना सभेची वेळ तसेच जागा व्यवस्थित माहीत आहे याची खात्री करा.
६ इतरांना आमंत्रण आणि उत्तेजन द्या: येशूने त्याच्या अनुयायांना आज्ञापिले: “माझ्या स्मणार्थ हे करा.” (१ करिं. ११:२४) येशूच्या पावलांचे अनुकरण करणारे अभिषिक्त त्या आज्ञेचे पालन करतात तसेच, यहोवाच्या प्रत्येक सेवकाला स्मारक विधीसाठी उपस्थित राहण्यास व तो साजरा करण्यास आमंत्रण दिले जाते. इतरांपैकी, पवित्र शास्त्र विद्यार्थी, नातलग, तुम्ही ज्यांच्यासोबत पवित्र शास्त्र चर्चा केली असे लोक, विश्वासात नसणारे सोबती, आणि व्यापारातील परिचित लोक, अशांना तुम्ही आमंत्रित केले पाहिजे. एखादी यादी बनवा की जेणेकडून, कोणाकडेही दुर्लक्ष होणार नाही.
७ स्मारक विधीच्या वेळीच, आस्थेवाईक लोकांना उत्तेजन देण्यास अधिक सुसंध्या असतील. लवकर येण्याची खात्री करा की जेणेकडून, पहिल्यांदाच येणाऱ्या नवोदितांना तुम्ही अभिवादन करू शकाल. तुमचे पुष्कळ पवित्र शास्त्र विद्यार्थी आले असतील तर, सभेच्या दरम्यान दुसऱ्या एका प्रचारकाला त्यांच्यासोबत बसायला सांगणे व्यवहार्य असेल. नवोदितांना मंडळीच्या नियमित जाहीर भाषण सभेला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण द्या. जाहीर भाषण सादर करण्यास निवडलेल्या वडिलांनी उत्तेजक भाषण देण्यासाठी चांगल्या तयारीत असावे.
८ स्मारक विधी सोहळ्याच्या समारोपास, “हेल जेहोवाज फर्स्टबॉर्न!,” हे १०५ क्रमांकाचे गीत गाण्यात जसे आम्ही सर्व आमचे स्वर मिळवू तसे, यहोवाच्या स्तुतीसाठी ईश्वरशासित कार्याच्या आवेशी महिन्याकडे आम्हाला समाधानकारकतेने मागे पाहता आले पाहिजे!