वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९४ पृ. ७
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९६
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९८
  • देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km १/९४ पृ. ७

खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम

१सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य याच्या अभ्यासाने, येशू ख्रिस्ताविषयीची आमची गुणग्राहकता वाढवली आहे. म्हणूनच, फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्‍या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचे अगदी उचितपणे, “आमच्या थोर उदाहरणकर्त्याचे जवळून अनुकरण करणे,” हे शिर्षक असेल व त्याचे अनुकरण करण्याचा काय अर्थ होतो ते पूर्णपणे समजण्यात मदत करील.

२ तुमचे वय काहीही असले किंवा तुम्ही सत्यात कितीही वर्षांपासून असला तरी, संमेलनाला उपस्थित राहणाऱ्‍या सर्वांना अधिककरून ख्रिस्तासारखे व्हावयास प्रोत्साहन दिले जाईल. कार्यक्रमाचा काही भाग विशेषकरून युवकांसाठी सल्ला प्रस्तुत करील. शिक्षण, करमणूक आणि भौतिकता या संबंधाने आव्हानांना तोंड देण्यासाठी ते त्यांना सुसज्ज करील. जगाच्या प्रभावाला कसे नाकारावे आणि ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे या गोष्टींना ठळकपणे दाखवणारी भाषणे, अनुभव आणि प्रात्यक्षिके असतील.—१ पेत्र २:२१.

३ नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्‍तींना, बाप्तिस्मा घेण्याद्वारे ते ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, ही जाहीरपणे घोषणा करण्यास संधी मिळेल. बाप्तिस्मा विधीच्या आधी त्या विषयावर एक उत्तेजक शास्त्रीय चर्चा केली जाईल. खास संमेलन दिवशी बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्‍यांनी पुरेशा वेळेआधीच अध्यक्षीय पर्यवेक्षकांना कळवावे की जेणेकरून बाप्तिस्म्याच्या सदस्यांसाठी नेमून दिलेले प्रश्‍न विचारण्यासाठी ते वडिलांची व्यवस्था करू शकतील.

४ “आमच्या थोर उदाहरणकर्त्याचे जवळून अनुकरण करणे—आम्हास कोठे निरवते?” या शिर्षकाचे मुख्य भाषण एक आमंत्रित वक्‍ता देतील. या प्रोत्साहनदायक आणि विश्‍वास बळकट करणाऱ्‍या कार्यक्रमास सर्व आस्थेवाईक लोकांना नक्की आमंत्रण द्या. आमच्या थोर उदाहरणकर्त्याचे, येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याशिवाय, कोणताही मोठा किंवा अधिक फलदायी मार्ग नसेल.—मत्त. १९:२७-२९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा