लक्ष देऊन ऐकणाऱ्या लोकांना मिळवण्यास झटा
१ आम्हाला घरोघरच्या सेवेत भेटणाऱ्या पुष्कळ लोकांचे मन आध्यात्मिक गोष्टींवर नसते. ते कौटुंबिक सदस्य, आर्थिक समस्या किंवा वैयक्तिक समस्यांमध्ये गुंतलेले असतील. संभाषण सुरू करण्यास, शेजारी असलेल्या सर्वांच्या आवडीच्या गोष्टी बोलणे बहुतेक उत्तम असते. आस्थेला उत्तेजन देण्यासाठी प्रश्नांचा उपयोग करता येईल कारण त्यामध्ये घरमालकास संभाषणामध्ये समाविष्ट करता येते. लोकांना पेचात न पाडणारी दृष्टिकोनात्मक प्रश्ने अधिक प्रभावकारी आहेत.
२ काहीशी अशी प्रस्तुती वापरल्याने तुम्हाला लक्ष देऊन ऐकणारे लोक मिळू शकतील:
▪“नमस्ते. माझे नाव . . . आहे. मी शेजारी राहतो. मी आज सकाळी ज्यांच्याशी बोललो ते सर्व [परिसरातील अलिकडील बातमीचा किंवा सर्वसामान्य चिंतेच्या बाबीचा उल्लेख करा] बद्दल चिंतीत आहेत. जग असे असण्याचा देवाचा हेतू होता असे तुम्हाला वाटते का?” प्रत्युत्तरासाठी वाव द्या. या क्षणी शांतिदायक नवीन जगातील जीवन ही पत्रिका दाखवा. संक्षिप्तपणे वेळ अनुमती देईल तसे पान १ वरचे चित्र आणि परिच्छेद १-३ मध्ये दिलेली माहिती विचारात घ्या, व नंतर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सादर करा. किंवा अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक थेटपणे प्रस्तुत केले जाऊ शकते. पान १५७ वर दिलेल्या स्तोत्रसंहिता ३७:९, १० या वचनाकडे तुम्ही लक्ष वेधवू शकता आणि ते पुस्तकातून वाचून दाखवू शकता. पान १५६-७ वर दर्शवलेल्या चित्रांचा उपयोग करून, दुष्टाईचा अंत झाल्यावर पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या नीतिमान परिस्थितींचे वर्णन करा.
३ पुस्तकाची सादरता नाकारण्यात आल्यास किंवा घरमालक व्यग्र असल्यास, वॉचटावर आणि अवेक! सादर करण्यास सदा तयारीत असा. नीतितत्त्वे ढासळल्यामुळे सगळीकडे लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली आहे. ऑगस्ट ८ च्या अवेक!ची इंग्रजी आवृत्ती वाचत असता, तुमच्या क्षेत्रातल्या लोकांमध्ये तुम्हाला आस्था निर्माण करतील अशा वाटणाऱ्या मुद्यांना निवडा. सध्याच्या वाईट गोष्टींना अधिक न लांबवता, अवेक!च्या ह्या आवृत्तीच्या “द परफेक्ट मॉरल गाईड” या लेखाकडे घरमालकाचे लक्ष वेधवा आणि देवाच्या वचनाच्या सल्ल्याला चिटकून राहण्याच्या लाभांबद्दल सकारात्मकरित्या बोला. त्या महिन्यात नंतर, ऑगस्ट २२ च्या अवेक!ची इंग्रजी आवृत्ती प्रस्तुत करताना “व्हेन ऑल रेसेस लीव्ह टूगेदर इन पीस” या लेखाकडे लक्ष वेधवा. वेगवेगळ्या जातीच्या लोकांमध्ये शांतीपूर्ण संबंध मिळवण्यासाठी पवित्र शास्त्रीय सल्ल्याला ठळकपणे दर्शवा. ऑगस्ट ८ च्या प्रादेशिक भाषांच्या अवेक! आवृत्तींमध्ये पहिल्या लेखाचे शीर्षक पुष्कळ लोक विचारत असलेला प्रश्न विचारतो: “डज गॉड टेक साइड्स इन वॉर?” त्या अंकाच्या “व्हॉट होप फॉर ॲन एन्ड टू वॉर?” या दुसऱ्या लेखात चर्चीलेल्या सुंदर भविष्यातल्या आशेकडे तुम्ही घरमालकाचे लक्ष वेधवू शकता. द वॉचटावर आणि अवेक!च्या अलिकडील तसेच जुन्या अंकांना, मासिक सादर करण्याच्या विशेष दिवसांसोबत इतर कोणत्याही वेळा सादर केले जाऊ शकते.
४ आमचा हेतू राज्य संदेशात आस्था वाढविण्याचा आहे हे लक्षात ठेवा. लक्ष देऊन ऐकणाऱ्या लोकांना मिळविण्यासाठी, आम्ही प्रथम घरमालकाचे लक्ष केंद्रित करायला आणि त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीला उत्तेजन द्यायला हवे. यामुळे, “यहोवा जे काही बोलेल ते ऐकून” घेण्यासाठी मेंढरासमान लोक इच्छितील.—स्तोत्र. ८५:८ न्यू.व.