वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९३ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९३
आमची राज्य सेवा—१९९३
km ८/९३ पृ. ७

घोषणा

▪ प्रकाशन देणगी:

ऑगस्ट व सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकाराचे ४०.०० रु आणि लहान आकाराचे २०.०० रु.

ऑक्टोबर: अवेक! किंवा द वॉचटावरची वर्गणी. पंधरवड्याला येणाऱ्‍या मासिकांची एक वर्षाची वर्गणी ६०.०० रु. पंधरवड्याला येणाऱ्‍या मासिकांची सहा महिन्यांची वर्गणी आणि महिन्याला येणाऱ्‍या मासिकांची एका वर्षाची वर्गणी ३०.०० रु. महिन्याला येणाऱ्‍या मासिकांसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणीची सादरता जेथे नाकारली जाते तेथे मासिकांचे दोन अंक प्रत्येकी ३.०० रुपयाला सादर केले जाऊ शकतात. उचित असल्यास मॅनकाईन्डस्‌ सर्च फॉर गॉड हे पुस्तक देखील ३०.०० रु. सादर केले जाऊ शकते.

नोव्हेंबर: द बायबल—गॉड्‌स वर्ड ऑर मॅन्स्‌? यासोबत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स ७२.०० रु किंवा १२.०० रु आणि ६०.०० रु असे वेगवेगळे सादर करू शकता. जेथे हे स्वीकारले जात नाही किंवा जेथे त्या भाषांमध्ये ते उपलब्ध नसेल, तेथे जुन्या १९२-पानी पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ६.०० रु अशी केली जाऊ शकते. आमच्याकडे याप्रकारे खालील पुस्तके उपलब्ध आहेत: इंग्रजी: डीड मॅन गेट हियर बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? आणि इज धीस लाईफ ऑल देअर इज? गुजराती: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी, “लेट युवर किंग्डम कम” आणि द ट्रुथ दॅट लीड्‌स टू इटरनल लाईफ; हिंदी: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी आणि “लेट युवर किंग्डम कम;” कन्‍नड: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी आणि “लेट युवर किंग्डम कम;” आणि “थिंग्स इन व्हीच इट इज इंम्पॉसीबल फॉर गॉड टू लाय;” मराठी: “तुझे राज्य येवो,” थोर शिक्षकाचे ऐका आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; तामिळ: इज धीस लाईफ ऑल देअर इज? आणि “लेट युवर किंग्डम कम;” तेलगु: इज धीस लाईफ ऑल देअर इज? बंगाली किंवा नेपाळी बोलत असणाऱ्‍या लोकांना आमच्या समस्या पत्रिका आणि पंजाबी माहीत असणाऱ्‍या लोकांना “पहा” पत्रिका सादर केली जाऊ शकते. मल्याळममध्ये युवर युथ—गेटींग द बेस्ट आऊट ऑफ इट हे पुस्तक १२.०० रु सादर केले जाऊ शकते. कृपया याची नोंद घ्या की हे पुस्तक खास किंमतीत सादर करायचे नाही.

सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्यापपर्यंत वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठविली नाही ते त्यांच्या पुढील लिटरेचर ऑडर्र फॉर्मवर (S-14) पाठवू शकतात.

▪ ज्या मंडळ्यांनी अद्यापपर्यंत १९९४ कॅलेंडर ऑफ जेहोवाज विटनेसेस, १९९४ इअर बुक ऑफ जेहोवाज विटनेसेस किंवा एग्झॅमिनींग द स्क्रिपचर्स डेली—१९९४, हे मागवले नाहीत, त्यांनी त्यासाठी ताबडतोब मागणी करावी. एग्झॅमिनींग—१९९४ बंगाली, इंग्रजी, कन्‍नड, मल्याळम, तामिळ आणि तेलगु मध्ये उपलब्ध असेल. कृपया तुमच्या मागण्या नेहमीच्या लिटरेचर ऑडर्र फॉर्मवर (S-AB-14) करावयास ध्यानात ठेवा. इंग्रजीतल्या एग्झॅमिनींग—१९९४ च्या मागण्या फॉर्मच्या पुढच्या बाजूस व इतर भाषेतल्या एग्झॅमिनींग—१९९४ च्या मागण्या फॉर्मच्या मागच्या बाजूस कोणत्या भाषेत हवे आहे ते स्पष्टपणे सांगावे. ह्‍या तीन गोष्टींऐवजी त्या फॉर्मवर इतर कोणत्याही गोष्टींची मागणी करू नये.

▪ कधीकधी आम्ही मंडळ्यांना त्यांच्या नियमित मागणी पेक्षा जास्त मासिकांचे बंडल पाठवतो. त्या मासिकांवर असलेल्या लेबलवर “EXTRA” हा शब्द असतो ज्यामुळे मंडळ्यांना ही मासिके का मिळत आहेत ते कळेल. त्या मासिकांसाठी मंडळ्यांकडून किंमत घेतली जात नाही. त्यांचे वितरण मंडळ्या नेहमीच्या वितरण प्रतींप्रमाणे करु शकतात आणि मिळालेले पैसे त्यांच्या मासिक जमाखर्च अहवालात जमवू शकतात.

▪ मंडळ्यांशी संघटीत असलेल्या सर्वांनी त्यांच्या द वॉचटावर आणि अवेक! च्या नवीन आणि नूतनीकरण केलेल्या वर्गण्या त्याचप्रमाणे वैयक्‍तिक वर्गण्या मंडळीतर्फे पाठवाव्यात.

▪ वैयक्‍तिक प्रचारकांनी मागणी केलेल्या साहित्यांची संस्था पूर्ति करत नाही. दिलेली गोष्ट हवी असल्यास त्यांनी लागलीच प्रकाशन सेवकाला सांगावे व तो लगेचच प्रकाशनांसाठी मंडळीच्या माहिन्याच्या मागणी मध्ये त्याचा समावेश करील. प्रकाशनांसाठी मंडळीची महिन्याची मागणी पाठवण्याआधी अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी त्याच्या घोषणेसाठी व्यवस्था करावी जेणेकरून ज्यांना वैयक्‍तिक साहित्याच्या गोष्टी पाहिजेत ते प्रकाशन हाताळणाऱ्‍या बांधवाला सांगू शकतील.

▪ सप्टेंबर १, १९९३ पासून जे प्रचारक नियमित पायनियर सेवा करू इच्छितात त्यांनी विलंब न करता त्यासाठी अर्ज करावा. ऑगस्टच्या महिना अखेरी आधी संस्थेला सर्व अर्ज पोस्टाने पाठवावे. कृपया ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवा मधील पुरवणीच्या २१ ते २६ परिच्छेदांचे पुनरावलोकन करा.

▪ मंडळीच्या सचिवांनी ऑगस्टच्या सुरवातीला प्रकाशन सेवकाशी भेट घ्यावी आणि महिन्याच्या अखेरीस मंडळीच्या प्रकाशनांच्या साठ्याची यादी करण्यासाठी तारीख ठरवावी. साठा असलेल्या सर्व प्रकाशनांची मोजणी करावी, आणि त्याची एकूण संख्या लिटरेचर इंव्हेंटरी फॉर्मवर (S-18) लिहावी. प्रत्येक मंडळीला असे तीन फॉर्म पाठविण्यात येतील. कृपया त्यांना पूर्णपणे भरा आणि त्याची मूळ प्रत आम्हाला सप्टेंबर ६, १९९३ आधीच पाठवून द्या. तुमच्या फाईलमध्ये ठेवण्यासाठी त्याची कार्बन कॉपी ठेवा. तिसऱ्‍या प्रतीला कच्ची प्रत म्हणून वापरू शकता. यादी करताना सचिवांनी देखरेख केली पाहिजे आणि पूर्ण केलेल्या फॉर्मला अध्यक्षीय पर्यवक्षकांनी तपासले आणि सही केली पाहिजे. उपलब्ध असलेली एकूण मासिक संख्या मासिक सेवकाकडून घ्यावी.

▪ मंडळीचे सचिव, सेवा अहवालांना एकत्र करुन रचतील आणि काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्मवर (S-10) त्यांची नोंद करतील. अहवाल एकत्र करुन रचण्यात मदत करणाऱ्‍या वडिल किंवा सेवा सेवकाला ते काळजीपूर्वकतेने सूचना देतील. ह्‍यामुळे काँग्रीगेशन्‌स पब्लिशर रेकॉर्ड कार्ड्‌समधून (S-21) हव्या असलेल्या माहितीची अचूक मोजणी केली आहे याची खात्री होईल. काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्म (S-10) अचूकतेने अणि नीटपणे भरला पाहिजे आणि सेवा कमीटी तर्फे त्याची काळजीपूर्वकतेने तपासणी केली गेली पाहिजे.

▪ तामिळनाडूमध्ये, जून १, १९९३ पासून TN-5 हा एक नवीन विभाग सुरू करण्यात आला आहे. त्या भागातल्या वाढत्या मंडळींमुळे ते आवश्‍यक झाले. त्याहून अधिक म्हणजे, आंध्र प्रदेशातल्या वाढत्या मंडळ्यांमुळे अंदमान बेटांवरील मंडळ्या AP-2 विभागाचा भाग होण्याऐवजी त्यांचा परत एक स्वतंत्र विभाग बनवण्यात आला आहे. म्हणून भारतामध्ये आता २२ विभाग आहेत, ज्यामधील तीन विभागांना ‘अ’ आणि ‘ब’ भाग आहेत. त्या सर्वांमध्ये २२ पूर्ण-वेळचे विभागीय पर्यवेक्षक काम करीत आहेत.

▪ पुन्हा उपलब्ध असणारी प्रकाशने:

मराठी: सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल. तामिळ: “सिंगींग ॲन्ड ॲकंपनींग युवरसेल्व्स व्हीथ म्युसिक इन युवर हार्टस्‌” (जुने गायनाचे पुस्तक).

▪ पोस्टाने उपलब्ध असणाऱ्‍या अवेक! मासिकांच्या आवृत्तींच्या मासिक यादीत तेलगू भाषेचा समावेश झाला आहे. याप्रकारे तेलगू भाषेत आता अवेक! मासिकाची एक वर्षाची वर्गणी ३०.०० रुपयावर प्राप्त करता येऊ शकते. तेलगू अवेक! मासिकासाठी M-202 याचा उपयोग करून मंडळ्यांनी आम्हाला त्यांच्या वितरण मागण्या पाठवाव्यात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा