लोक अनंतकाळ कसे जगू शकतील हे शिकण्यास त्यांची मदत करण्यासाठी परत जा
१ अनंतकाल जगू शकाल पुस्तक प्रकाशित झाल्यापासून, ११५ भाषांमध्ये त्याच्या ६ कोटी ५० लाख पेक्षा अधिक प्रती उत्पन्न केल्या गेल्या आहेत. आता यहोवाचे सेवक असणाऱ्या पुष्कळ जणांनी ह्या उत्तम साधनाद्वारे पवित्र शास्त्राचे मूळ सत्य शिकले आहे. या आणि त्याच्या पुढील महिन्यात आपण लोकांना हे पवित्र शास्त्रीय मार्गदर्शक सादर करणार आहोत, किंवा क्षेत्रात हे पुस्तक असलेल्या लोकांना भेटी देऊ.
२ पुस्तक असलेल्यांना परत भेटी देणे: आस्थेवाईक व्यक्तीचे अनुक्रमणिकेकडे लक्ष आकर्षित करून त्याला जो विषय विशेष आस्थेचा वाटतो तो विचारल्यामुळे काही प्रचारकांना चांगले परिणाम मिळाले आहेत. घरमालकाने विषय निवडल्यावर, पुस्तकातला तो अध्याय पुढच्या भेटी आधी वाचून ठेवण्यासाठी त्याला सुचवा.
३ शक्यतो, परत भेट देण्यासाठी आपण निश्चित भेटण्याची वेळ ठरवली पाहिजे. परत भेट देण्याआधी घरमालकाने निवडलेल्या अध्यायातील काही परिच्छेदांची चर्चा करण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. त्याची काही विशेष पसंती नसल्यास, आपण अध्याय १ ची चर्चा करण्यास सुरू करू शकतो. काही परिच्छेद विचारात घेतल्यावर, पुढील काही परिच्छेदांमध्ये घेतल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल आपण एक प्रश्न उभा केला पाहिजे. ते आणखी एका भेटीसाठी पायरी ठरेल, ज्यामुळे आपण अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाचा अभ्यास पुढे चालू ठेवू.
४ अर्थात, घरमालकाला प्रश्न असल्यास प्रथम ते विचारात घेणे चांगले असेल. बहुधा, त्याच्या प्रश्नांचे उत्तर पुस्तकातच असेल. पुस्तकातल्या गोष्टींशी परिचित असल्यामुळे आपण त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी योग्य परिच्छेदांकडे वळू शकू आणि त्या साहित्याचा उपयोग करू शकू.
५ पत्रिका दिलेल्या लोकांना भेटी देणे: आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा कदाचित घरमालक व्यग्र असल्यामुळे आपण त्याच्याकरता शांतिदायक नवीन जगातील ह्या पत्रिकेची एक प्रत ठेवून आलो होतो. परत भेट देते वेळी, पत्रिकेच्या पहिल्या परिच्छेदांची चर्चा आपण करू शकतो.
स्तोत्रसंहिता ३७:२९ हे शास्त्रवचन दिलेल्या पान ३ वरच्या पहिल्या परिच्छेदाच्या शेवटाला जेव्हा आपण येतो, तेव्हा आपण असे म्हणू शकतो:
▪“तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल या प्रकाशनात चर्चिलेल्या गोष्टींना ते शब्द ठळकपणे दाखवून देतात. ‘आम्हास विश्वास वाटण्याचे कारण’ या शीर्षकाखाली दिलेल्या अध्याय १ च्या ३ ऱ्या परिच्छेदातल्या विचाराकडे नीट लक्ष द्या.” आम्ही ३ रा परिच्छेद वाचून, त्यावरील छापील प्रश्न विचारू शकतो, आणि त्याचप्रमाणे ४ आणि ५ परिच्छेदांना देखील पाहू शकतो. मग आम्ही असे म्हणू शकतो: “आता परिस्थिती देवाच्या उद्देशांच्या एकमतात का नाही?” पुढील काही परिच्छेद त्याचे उत्तर देतात, आणि पुढच्या आठवडी ह्याचवेळी येऊन त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मला आवडेल.” मग, ह्या क्षणी आपण पुस्तक सादर करू शकतो.
६ “अनंतकाल जगू शकाल” ह्या पुस्तकाला सादर करण्यासाठी आपण असे म्हणू शकतो:
▪“तुम्हाला ह्या प्रकाशनाची स्वतःची प्रत असण्यास आवडेल याची मला खात्री आहे. मग तुम्ही आपल्या पुढच्या चर्चेआधीच वाचू शकाल आणि आपल्या चर्चेमधून तुम्हाला अधिक ज्ञान मिळेल. आम्ही लोकांना हे पुस्तक २०.०० रुपयांना देतो.” (मोठ्या आकारासाठी ४०.०० रु.)
७ लोक अनंतकाळ कसे जगू शकतील हे शिकण्यास त्यांची मदत करण्यासाठी परत भेट देणे फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या गोष्टी इतरांना शिकवण्यासाठी सूचना दिली. अधिक कामगार पाठविण्यासाठी आम्ही यहोवाकडे प्रार्थना करतो. तर, आस्थेवाईक लोकांना शोधून काढण्यात आणि कापणीच्या कामात सह कामकरी होण्यास त्यांना शिकवण्यासाठी आपण आपली भूमिका पार पाडू.—मत्त. ९:३७; २८:१९, २०.