ईश्वरशासित वृत्त
कंबोडिया: फेब्रुवारी ८, १९९३ रोजी आपल्या कामासाठी एक दप्तर स्थापन करण्यास एक अधिकृत दस्त-ऐवज मिळाले ज्यामुळे त्या देशात मिशनऱ्यांना प्रवेश करण्यासाठी मार्ग खुला झाला. आम्हाला याचा आंनद होतो की २५ पेक्षा जास्त वर्षांनंतर, कंबोडियामध्ये परत एकदा सुवार्तेचा प्रचार मोकळेपणाने केला जात आहे.
सायप्रस: मार्चमध्ये १,४६२ प्रचारकांच्या नवीन उच्चांकाशिवाय तास, पुनर्भेटी आणि पवित्र शास्त्राभ्यासामधील उच्चांकांचा देखील शाखेने अहवाल दिला.
लायबेरिया: मार्चमध्ये संस्थेच्या शाखा दप्तराला लागून असलेल्या जागेवर बांधवांना “ज्योती वाहक” हे प्रांतिय अधिवेशन घेता आले. तेथील उपस्थितीचा उच्चांक २,७११ होता आणि ७८ जणांचा बाप्तिस्मा झाला.
जपान: मार्चमध्ये त्यांच्या प्रचारकांचा नवा उच्चांक १,७७,५९१ इतका होता.
फिलिपीन्स्: मार्चमध्ये १,१५,०४४ प्रचारकांचा नवीन उच्चांक गाठला गेला.