पवित्र शास्त्र अभ्यासांसाठी आस्थेने शोध घ्या
१ या जुन्या जगाची वेळ निघून जात आहे ह्यासाठी वाढत्या प्रमाणावर पुरावा आहे. (२ तीम. ३:१-५) त्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होतो की लोकांचे जीव धोक्यात आहेत. तरीसुद्धा, काहींना वाचण्यासाठी मदत देणे हे आपल्या हाती आहे. (नीती. ३:२७) ह्या उद्देशास्तव, पवित्र शास्त्राभ्यास सुरू करण्यास आणि चालविण्यास आपण आस्थेने प्रयत्न करायला हवा.
२ आपल्या पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या साहित्यांच्या वितरणामुळे पुष्कळ चांगल्या गोष्टी साध्य झाल्या आहेत. लोकांना, नियमित गृह पवित्र शास्त्राभ्यासाद्वारे वैयक्तिक मदतीची अधिक गरज आहे. त्याचे गुणग्रहण करण्यास आम्ही त्यांची कशी मदत करू शकतो?
३ लोकांना चिंतीत करणाऱ्या प्रश्नांना आम्ही विचारू शकतो. नीतितत्त्वे एवढ्या परिणामकारकतेने का ढासळली आहेत, कौटुंबिक जीवन इतके अस्थिर का आहे, हिंसा आणि गुन्हेगारी इतका धोका का आहेत, या सध्याच्या परिस्थितींना एक प्रेमळ देव का अनुमती देतो, वगैरे गोष्टींसंबंधाने असणारे हे प्रश्न प्रकाश टाकू शकतील. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांच्या विशेष आस्थेच्या विषयांबद्दल आणि घटनांबद्दल जागरूक असा. ह्या प्रश्नांच्या स्पष्ट पवित्र शास्त्रीय उतरांकडे निर्देश करा. त्यांना दाखवून द्या की आम्ही ज्या साहित्याचे वितरण करतो ते या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी ज्या आम्हा सर्वांवर परिणाम करतात अशांबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते ते शिकण्यास त्यांना मदत करील.
४ घरमालकाला संभाषणात सहभागी करणे फार महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या चिंतेच्या गोष्टींसंबंधाने जाणून घेण्यास जागरूक असा. त्याच्या आस्थेच्या आणि चिंतेच्या गोष्टींबद्दल तुमचे संभाषण उभारा. मनुष्यजातीच्या समस्यांसाठी पवित्र शास्त्रीय उपायांबद्दल स्पष्टीकरण देणारे एखादे पुस्तक, माहितीपत्रक, मासिक, किंवा पत्रिकेकडे लक्ष वेधवा. जाण्याआधी, असा एखादा प्रश्न मांडा ज्याबद्दल तुम्हाला वाटते की तो तुमच्या पुढच्या भेटीसाठी त्याची अपेक्षा वाढवील. तुम्ही परत जाल तेव्हा, ह्या प्रश्नांची आठवण नक्की करून द्या, आणि त्याला पवित्र शास्त्रीय उत्तरे शोधण्यात मदत करण्यासाठी साहित्याचा उपयोग करा.
५ पवित्र शास्त्राभ्यास सुरू करणे आणि त्यांना नियमितरित्या चालवणे हे लोकांच्या जीवनाला बदलवू शकते. क्षेत्रात किंवा अनौपचारिक स्थितींमध्ये भेटणाऱ्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये आम्ही खरी आस्था प्रकट करावयास हवी. त्यांच्या आस्थेला प्रगतीशीलरीत्या उत्तेजन देण्यासाठी चांगल्या तयारीची गरज आहे. एका नियमित आध्यात्मिक भरवणुकीच्या पद्धतीमध्ये आणण्यासाठी त्यांना वारंवार भेट देत राहण्यास सहनशीलतेची आवश्यकता आहे. लोकांमध्येच प्रेमळ आस्था राखण्याची गरज आहे. येणाऱ्या नाशापासून त्यांना वाचवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे त्यांची मदत करण्याची इच्छा बाळगली पाहिजे. आपल्या पवित्र शास्त्र अभ्यासाचे काम नियमित आणि मनःपूर्वक प्रार्थनेची एक बाब करायला हवी.—१ थेस्सलनी. ५:१७.
६ गेल्या तीन वर्षात जवळजवळ एक दशलक्ष लोक बाप्तिस्मा प्राप्त शिष्य झालेत हे पाहण्यास किती उत्तेजनदायक आहे. (मत्त. २८:१९, २०) आम्ही आता प्रत्येक महिन्यात जवळजवळ पंचेचाळीस लाख पवित्र शास्त्र अभ्यास चालवत आहोत, आणि हे इतरांच्या जीवनाबद्दल असणाऱ्या आमच्या काळजीला दर्शवते. तुमच्याबद्दल काय? गृह पवित्र शास्त्राभ्यासाच्या कामात भाग घेण्यासाठी तुम्ही मनःपूर्वक परिश्रम घेता का? हे लक्षात ठेवा की, ह्या बाबतीत आपले आणि इतरांचे जीवन आपल्या विश्वसनीयतेवर आधारित आहे.—यहे. ३:१७-१९.