नवोदित आणि अनुभवी सेवकांच्या गरजा
१ स्तोत्रकर्त्या दाविदाने विचारले: “हे परमेश्वरा [यहोवा न्यू.व.] तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?” काही योग्य निवड केलेल्या शब्दांनी, दाविदाने उत्तर दिले: “जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो.” (स्तोत्र. १५:१, २) त्या गरजा आज बदललेल्या नाहीत. ख्रिस्ती मंडळीत भक्तीसाठी येणाऱ्या सर्वांनी, अनैतिक कृतींचा आणि दारूबाजीचा त्याग केला पाहिजे. भांडखोर, हिंसक वृत्तीचे किंवा दुतोंड्यांसाठी यहोवाच्या लोकांमध्ये कोणतेही स्थान नाही. नवोदित सेवक असोत किंवा अनुभवी जण असोत, देवाच्या वचनात दिलेल्या उच्च दर्जांना टिकवून ठेवण्यात आम्ही विश्वासू असण्याची गरज आहे.—गलती. ५:१९-२१.
२ पुष्कळ नवोदित यहोवाच्या संघटनेशी संबंध ठेवीत आहेत. युवक आणि वृद्ध अशा सर्वांनी देवाच्या गरजांनुरुप त्यांच्या जीवनाची पद्धत जुळवून घेण्यासाठी त्यांच्या विचारात बदल केला आहे. दक्षिण अमेरिकेत, एक युवक, पालकीय मार्गदर्शनाविना वाढला आणि नंतर त्याच्या व्यक्तिमत्वात गंभीर समस्या उद्भवल्या. तो १८ वर्षांचा होईपर्यंत मादक पदार्थांच्या व्यसनाधीन झाला होता आणि मादक पदार्थांचे सेवन करण्याच्या सवयीसाठी चोरी केल्यामुळे काही काळासाठी तरुंगात देखील होता. पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे, त्याने त्याच्या पूर्वीच्या सोबत्यांशी संबंध तोडले, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये त्याला नवे मित्र मिळाले, आणि कालांतराने त्याचे जीवन देवाला समर्पित केले.
३ त्याचप्रमाणे, आम्हीसुद्धा “खरे नीतिमत्व व निष्ठावंतपणा”ने आपल्या वर्तणूकीद्वारे देवाला प्रसन्न करण्यासाठी निश्चित असायला हवे. (इफि. ४:२४, न्यू.व.) आम्हावर “जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून” टाकण्याचे बंधन आहे, आणि देवाच्या पर्वतासमान संघटनेमध्ये आम्हाला टिकून राहायचे तर “जो नवा मनुष्य . . . नवा केला जात आहे, त्याला [आम्ही] धारण केले” पाहिजे.—कलस्सै. ३:९, १०.
४ देवाचे वचन, एक शक्तिशाली प्रभाव: पवित्र शास्त्रात आम्हाला प्रकट केल्याप्रमाणे यहोवाचे व्यक्तिमत्व आमच्या विचारसरणीवर आणि कृत्यांवर सकारात्मक पद्धतीने परिणाम करू शकते. (रोम. १२:२) त्याच्या वचनात मनाचे परिवर्तन करण्याचे आणि अंतकरणांचे परीक्षण करण्याचे सामर्थ्य आहे. (इब्री. ४:१२) प्रेरित शास्त्रवचने आम्हाला हे शिकवतात की यहोवाची इच्छा आम्हाकडून नैतिकरित्या सरळ जीवन जगण्याची, जाहीर साक्ष देण्यात पूर्ण सहभाग घेण्याची आणि ख्रिस्ती सभांकडे दुलर्क्ष न करण्याची अपेक्षा करते.
५ या कठीण काळात, एका ख्रिस्ती व्यक्तीवर देवाचे नियम तोडण्यासाठी वाढते दबाव, प्रभाव पाडतील. वैयक्तिक अभ्यास, कौटुंबिक अभ्यास, मंडळ्यांच्या सभा किंवा सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले तर, एकेकाळी दृढ असलेला ख्रिस्तीसुद्धा, विश्वासापासून दूर जाऊ शकतो, कदाचित चुकीच्या वर्तणूकीमध्ये देखील पडू शकतो. यास्तव, पौलाने तीमथ्याला असे लिहिले: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट [सतत, न्यू.व.] लक्ष ठेव” आणि, “मी जे सांगत आहे त्यावर सतत विचार कर.”—१ तीम. ४:१६; २ तीम. २:७ न्यू.व.
६ अलिकडेच संबंधात आलेले असलो किंवा, वर्षांच्या अनुभवाने प्रौढ झालेले असलो तरी, आम्ही देवाच्या गरजांना आमच्या दृष्टिपथात ठेवावयास हवे, सेवेत संपूर्णतः समतोल राखावयास हवा, आणि आपले जीवन वाचवायचे आहे तर आपली आशा दृढपणे टिकवून ठेवावयास हवी. (१ पेत्र १:१३-१६) दररोज देवाच्या नीतिमान गरजांचे पालन करणे खूपच जरूरीचे आहे.
७ या १९९३ च्या सेवा वर्षातील शेवटल्या महिन्यात क्षेत्र सेवेत जाण्यासाठी तुमचे ध्येय बनवा. इतरांना विश्वासात वाढ करण्यात मदत करण्यासाठी आणि क्षेत्र सेवेच्या उत्पादकतेची वाढ करण्यासाठी निश्चित असा. (रोम. १:१२) वैयक्तिक अभ्यास, कौटुंबिक अभ्यास आणि सभेची उपस्थिती यामध्ये नियमित राहून तुमच्या विचारांना योग्य गोष्टींवर ठेवा. (फिलि. ४:८) देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या गरजांनुरुप राहण्याच्या तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.—कलस्सै. ३:२३, २४.