जीवन बचावणाऱ्या आमच्या कार्यात यशस्वी सहभाग घेणे
१ “सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे,” यासाठी प्रेषित पौलाने त्याची सुवार्तेची सादरता साजेसी बनविली. (१ करिंथ. ९:१९-२३) त्याचप्रमाणे, घरमालकाची आस्था सावधानपूर्वक ओळखल्यास व त्याच्या गरजांशी अनुरुप अशी आपल्या चर्चेची तयारी केल्यास आपणही आपल्या सेवेत यशस्वी होऊ शकतो. यामुळे वॉचटावर व अवेक! यांची वर्गणी सादर करणे कठीण होणार नाही.
२ स्वतःची ओळख करुन दिल्यानंतर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात असे म्हणून सुरुवात करु शकताः
▪“आमच्या दिवसातील समस्यांचा व्यवहार्य तोडगा पुरविण्यास जगीक सरकार असमर्थ आहे हे स्पष्ट असल्याने पुष्कळ लोक निराश झाले आहेत. काहीजण तर त्यांच्या समस्यांचा दोष सरकारला देत आहेत. आमच्या सर्व गरजांची पुरेशी काळजी घेईल असे सरकार असू शकेल याचा तुम्ही कधी विचार केला का? [उत्तरासाठी वेळ द्या.] आम्ही तोंड देऊन आहोत त्या सर्व समस्यांना खात्रीने काढून टाकेल अशा एका सरकारचे विश्वसनीय अभिवचन आम्हाला आहे हे तुम्हाला माहीत आहे का?” घरमालकाचे उत्तर काळजीपूर्वक ऐका. तो जे सांगेल त्या आधारे काही निरनिराळ्या सादरतेतील एखादी सादरता करण्यास तयार असा.
३ जर घरमालक ख्रिस्ती आहे अशी काही चिन्हे दिसून येत असतील तर, आपण विचारु शकतो की तो “आमच्या पित्या,” किंवा प्रभूची प्रार्थना करतो का. जर त्याने होकारार्थी उत्तर दिले, तर आपण या नमुनेदार प्रार्थनेतील अनुक्रमाने या मुद्यापर्यंत सांगू शकतो जेथे म्हटले आहे, “तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्त. ६:९, १०) यावरुन हे सिद्ध होते की एके दिवशी यहोवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण होणार आहे. त्यानंतर वॉचटावर किंवा अवेक! मधील योग्य लेखाचा संदर्भ देऊन वर्गणी सादर करु शकता. घरमालकाने सादरता नाकारल्यास, या विचाराचा मागोवा घेणारे असे माहितीपत्रक, जसे नंदनवन आणविणारे सरकार यातील पान ३ हे दाखवू शकता.
४ जर घरमालक हिंदू असेल तर तुम्ही दानीएल २:४४ चा संदर्भ घेऊन चालू मासिकातील मुद्याशी जुळवून घेऊ शकता. परत एकदा, वर्गणी नाकारण्यात आल्यास आमच्या समस्या—त्या सोडविण्यास कोण आमची मदत करील? या माहितीपत्रकातील पान ८ वर तुम्ही येऊ शकता. ४ थ्या परिच्छेदात उल्लेखिलेल्या सर्वसामान्य विश्वासाकडे लक्ष वेधवा व त्यानंतर यहोवा देव आमच्या समस्या लवकरच कशा सोडविणार आहे ते देखील दाखवून द्या. दोन मासिकांसोबत हे माहितीपत्रक सादर करु शकता.
५ घरमालक जर त्याच्या जीवनात समाधानी आहे असे दिसत असेल तर, तुम्ही हा प्रश्न विचारु शकता:
▪“पवित्र शास्त्र सरकारच्या भवितव्याविषयी जे सांगते त्याचा आम्ही गांभीर्याने का विचार करावा?” नंतर रिझनिंग पुस्तकातील १५४ आणि १५५, पानावर आठपेक्षा अधिक कारणांपैकी एक किंवा अधिक कारणाचा थोडक्यात उल्लेख करा. तुमच्याजवळ असलेल्या मासिकातील योग्य मुद्यासोबत तुमचे बोलणे जुळवा. घरमालकाने जर वर्गणी स्विकारली नाही तर पुढील संभाषणाकरता नवीन जगातील शांतीमय जीवन या पत्रिकेचा उपयोग करा.
६ घरमालकाला आणखीन भेटीची ओढ लागण्याचे जोपर्यंत तुम्ही उत्तेजन देत नाही तोपर्यंत तुमची पहिली भेट पूर्णपणे यशस्वी झाली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे, एखादा आस्थेवाईक प्रश्न विचारा आणि परत तुम्ही याल त्यावेळी त्याचे उत्तर देण्याचे अभिवचन देण्याची खात्री बाळगा.
७ वरील साहित्यांपैकी, कोणते तुम्हाला सांगण्यास सहज वाटते ते निवडा. यातील सूचना तुमच्या क्षेत्राशी साजेशा बनवा. माहितीपत्रक, पत्रिका, आणि मासिक जे तुम्ही सादर करण्याकरता वापरणार आहात त्यातील लेखांशी परिचित होण्याद्वारे घरमालकाच्या गरजेसोबत लगेच तुमचे संभाषण तुम्हाला साजेसे बनविता येईल. “सर्व काही सुवार्तेकरीता” करण्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या सादरतेची परिश्रमपूर्वक तयारी करु आणि यारितीने या जीवन बचावणाऱ्या सेवेत यशस्वी सहभाग घेऊ.—१ करिंथ ९:२३.