साहित्यांची गुणग्राहकता प्रदर्शित करणे
१ “ग्रंथरचनेला काही अंत नाही.” (उप. १२:१२) कागदांवर छापली जाणारी अनेक पुस्तके योग्य स्वरुपाची नसतात. तथापि, वॉचटावर संस्थेद्वारे प्रकाशित होणाऱ्या साहित्यांबाबतीत असे नाही. ते बहुमूल्य आहेत कारण त्यामध्ये जीवन बचावणारे आध्यात्मिक अन्न सामावलेले आहे. ते आस्थेवाईक लोकांस यहोवाला ओळखण्यास मदत करतात तसेच जे यहोवाचे समर्पित साक्षीदार आहेत अशांचा विश्वास मजबूत करण्यास साहाय्य करतात.
२ आम्ही आपले साहित्य इतरांच्या फायद्याचे आहे म्हणून त्यांना सादर करण्याची इच्छा बाळगून असतो. प्रकाशित करण्यात व वितरण करण्यात बराच खर्च होतो. त्यामुळे, आम्ही प्रकाशनांना सारासार विचार न करता देत नाही. आम्ही सादर करत असलेले वेगवेगळे साहित्य जे तसेच, वॉचटावर व अवेक! याची प्रत्येकी वर्गणी याला योग्य किंमत आकारली जाते. जे कोणी प्रकाशने स्वीकारतात त्या प्रत्येकांची आपण परत भेट घ्यावी. जर एखाद्या व्यक्तीने आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रकाशन स्वीकारले नाही पण आमच्या संदेशात आस्था दाखविली तरीही आपण खात्रीने परत भेट घ्यावी. कदाचित पुढील भेटीत साहित्य किंवा मासिक सादर करणे ठीक होईल, ज्यामुळे तुमच्या भेटींच्या दरम्यान ती व्यक्ती त्या प्रकाशनाला वाचू व अभ्यास करु शकेल.
३ काहीजण घरमालकाला प्रकाशनाची किती किंमत आहे हे सांगण्यास घुटमळतात. यामुळे अनिश्चितता निर्माण होते व साहित्य फुकटच देत आहेत असे घरमालक विचार करू शकेल. जेव्हा आम्ही प्रकाशन सादर करतो तेव्हा त्याच्या किंमतीचा उल्लेख स्पष्टपणे करावा, आणि एखाद्या प्रसंगी हे सांगणे देखील चांगले ठरेल की आमचे काम हे व्यापारी दृष्टिचे नाही, तर ती वर्गणी आणखी साहित्य प्रकाशित करण्यास उपयोगात आणली जाते. आमचे ध्येय हे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे व शिष्य बनविणे हे आहे ही वस्तुस्थिती नेहमी समोर ठेवा. घरमालक साहित्य स्वीकारतो याद्वारे खरी आस्था ओळखण्यास आम्हास मदत होते. लोक अनेकदा तंबाकू घेण्यास व इतर जगीक साहित्य घेण्यास पैसे खर्च करतात. तुम्ही जे काही त्यांना सांगितले त्यात जर त्यांना प्रामाणिक आस्था असेल तर, चांगले साहित्य घेण्यासाठी किंमत द्यावी लागते याचा तर्क ते करु शकतील.
४ किंमतीची बाब योग्य रितीने मांडण्यात आल्यास, घरमालकाला हे कळून येईल की आम्ही प्रकाशने विकण्याकरता आलो नाही तर प्रकाशित करण्यासाठी लागणारी किंमत स्वीकारत आहोत. लोक साहित्य स्वीकारोत अगर नकोत पण आमची इच्छा ही आहे की राज्याची सुवार्ता त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहचावी आणि यहोवाच्या सुंदर उद्देशांबद्दल त्यांनी शिकून घेण्यास त्यांच्यामध्ये आस्था निर्माण व्हावी.