आस्था दाखविलेल्या सर्वांना मदत करणे
१ राज्य संदेशास आस्था दाखविलेल्या सर्वांना, मार्च मध्ये मदत करण्यासाठी तसेच स्मारकविधीचे निमंत्रण देण्यासाठी आम्हाला आमचा विश्वास तसेच आमचे प्रेम प्रवृत्त करो. येशूच्या यज्ञार्पणावर केंद्रित असलेल्या यहोवाकडील तारणाच्या तरतुदीकडे अशांना निरविण्याची गरज आहे.—इब्री. ९:२८.
२ स्मारकविधीला तुम्ही ज्यांना निमंत्रण देऊ इच्छिता अशांची यादी करणे ही चांगली कल्पना आहे. यात, जे नियमितपणे सभांना उपस्थित राहतात तसेच ज्यांनी पूर्वी अभ्यास केला व इतर मार्गांनी आस्था दाखविली त्यांचाही समावेश करा. ख्रिस्ती विश्वासात नसलेले सोबती व इतर कौटुंबिक सदस्यांना विसरू नका. तुमची यादी तयार केल्यावर, प्रत्येकास निमंत्रण देण्याचा खास प्रयत्न करा. काही भेटी घेण्यासाठी तुम्ही वडिलांची मदत मागू शकता.
३ भेटीत तुम्ही काय म्हणू शकता?
प्रेमळ अभिवादन केल्यावर, तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “गत काळात, तुम्ही आध्यात्मिक गोष्टीत आस्था दाखविली होती, आणि मी असा विचार केला की, या खास घटनेच्या निमंत्रणाची तुम्ही गुणग्राहकता बाळगणार. [स्मारकविधीचे छापील निमंत्रण घरमालकाला द्या.] ख्रिस्ताचा मृत्यू हीच केवळ एक घटना आहे जी त्याच्या अनुयायांनी साजरी करण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली होती. त्याच्या मृत्यूद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने काय साध्य केले आणि याद्वारे आम्हाला कशारितीने सार्वकालिक जीवन मिळू शकते. याचे पुनरावलोकन करण्याचे आम्ही अपेक्षितो. गत वर्षात, खास सभेला १ कोटी १४ लाख लोक उपस्थित होते. या वर्षी माझ्याबरोबर उपस्थित राहिल्यास मला फार आवडेल.” स्मारकविधी साजरा करण्याचा तुमच्या मंडळीचा पत्ता व वेळ लिहिण्याची खात्री करा. जरूरी भासल्यास वाहतुकीची योजना करा.
४ नवोदित प्रथमतःच स्मारकविधीला उपस्थित होतात तेव्हा त्यांचे स्वागत करा. स्थानिय प्रचारकासोबत परिचित होण्यास आणि त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या एखाद्या आस्थेवाईक व्यक्तिसोबत त्यांची ओळख करून द्या. त्यांच्या शेजारी राहणारे बरेच लोक सत्याविषयी आस्था दाखवीत आहेत यामुळे त्याला उत्तेजन मिळेल. शक्य असल्यास स्मारकविधीच्या सणाच्या प्रसंगी तुमच्या कुटुंबासोबत त्यांना बसण्याचे निमंत्रण द्या.
५ निश्चितच, फक्त स्मारकविधीला उपस्थित राहिल्याने त्यांना तारण मिळेल याची शाश्वती मिळत नाही. परंतु अनेकांना निमंत्रण दिल्याने, येशूच्या ओतलेल्या रक्तावर विश्वास ठेवण्याचे त्यांचे ते पहिले पाऊल असेल. सभा संपल्यावर घरी जाताना, भेट देणाऱ्यास तुम्ही, जाहीर सभा आणि वॉचटावर अभ्यासाला येणाऱ्या रविवारी उपस्थित राहण्यास त्यांना आवडेल का हे विचारा. प्रेमळ आणि सामावून घेणारे असा. तुम्ही कोणत्याही रितीने त्यांना मदत करु इच्छिता हे त्यांना कळू द्या. लवकरच नियमीतरित्या तो आमच्याबरोबर संगत ठेवील तसे त्याची आध्यात्मिक प्रगती नेटाने होऊ शकते. “मोठ्या संकटा”तून आम्ही मदत केलेल्या इतर अनेकांसोबत बचाव होणे किती आनंदाचे आणि समाधानकारक आहे!—प्रकटी. ७:९, १४.