समजबुद्धीने आस्थेचा मागोवा घ्या
डिसेंबर असा महिना आहे जेव्हा आपल्या संदेशाबद्दल आस्था दाखवलेले सुटीच्या कार्यहालचालींमध्ये व्यग्र असतील. आणखी इतर त्यांच्या दररोजच्या कार्यहालचालींमध्ये नेहमीच व्यग्र असल्यासारखे दिसतात. यास्तव, आस्थेचा मागोवा घेताना, आपण सूक्ष्मदृष्टीचे असले पाहिजे व शक्य असल्यास लवकर मुद्यावर येण्यास तयार असले पाहिजे, अर्थात घरमालक दीर्घ संभाषण करण्याची इच्छा दाखवत असल्यास ती दुसरी गोष्ट आहे.
२ आपण जे काही म्हणू त्याचा आधीच विचार करा: आपल्याला जे म्हणायचे आहे ते आपल्या मनात सुस्पष्ट असले पाहिजे. यासाठी पहिल्या भेटीच्या नोंदी पाहणे आणि संभाषणात चर्चा झालेले मुद्दे व घरमालकाला उत्तर दिले नाही असा विचारलेला एखादा प्राश्न पुन्हा एकदा लक्षात आणण्याची गरज आहे.
३ येशूवर विश्वास असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला भेट देताना आपण असे म्हणू शकतो:
▪ “वर्षाच्या या कालावधीत पुष्कळ लोक ख्रिस्ताच्या जन्माचा विचार करत आहेत. मागील वेळी आपण बोललो तेव्हा, येशू ख्रिस्त इतरांपेक्षा वेगळा असलेला अद्वितीय मनुष्य आहे असे मी सांगितले होते. येशूचा जन्म बेथलेहेममध्ये होणार होता असे बायबलने ७०० वर्षांआधीच भाकीत केले होते हे तुम्हाला माहीत आहे का?” प्रातिसादासाठी वाव द्या. मग, मीखा ५:२ वाचल्यानंतर तुम्ही म्हणू शकता: “ती एक आश्चर्यकारक भविष्यवाणी आहे, नाही का? ही बायबलची एक मनोरंजक वस्तुस्थिती आहे, तरी बायबल भविष्यवाण्या आपल्या दिवसातही खऱ्या ठरत आहेत हे तुम्हाला माहीत होते का?” त्या व्यक्तीजवळ वेळ असल्यास, आपण संभाषण चालू ठेवू शकतो, किंवा ती व्यग्र असल्यास, पुन्हा येऊन तिच्यासोबत याविषयी अधिक चर्चा करण्याबद्दल आपण विचारू शकतो.
४ बायबलचे ज्ञान नसलेल्या व्यक्तीला “या जगाचा बचाव होईल का?” ही पत्रिका दिलेली असल्यास, आपण पुढीलप्रामाणे म्हणू शकतो:
▪ “येथे पृष्ठ ४ वर ‘चिन्ह’ या उपशीर्षकाखाली काय म्हटले आहे ते पाहा. येशूने सांगितल्याप्रामाणे, सद्य जगाच्या शेवटल्या काळाला चिन्हांकित करणाऱ्या भविष्यवाण्यासंबंधी ते सांगते. [घरमालकासोबत दोन किंवा तीन भविष्यवाण्यांचा विचार करा.] या भविष्यवाण्या आपल्या दिवसात पूर्ण होत आहेत याचा काही पुरावा आहे असे तुम्ही म्हणाल का?” त्यानंतर घरमालकाने अनंतकाल जगू शकाल किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक घ्यावे असे तुम्ही सुचवू शकता. अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील १८ वा अध्याय किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील १११ वा अध्याय येशूने दिलेल्या चिन्हाविषयी अधिक माहिती कसा देतो हे दाखवा.
५ गृह बायबल अभ्यास सादर करणे: आपण घरमालकाला सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाची एक प्रात दिल्यास किंवा त्याच्याजवळ आधीच त्याची एखादी प्रात असल्यास, अध्याय १११ चा उपयोग करून गृह बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवणे बरे ठरेल. मंडळीच्या पुस्तक अभ्यासात उपयोगात आणल्याप्रामाणे एखादी पद्धत आपण वापरू शकतो. अभ्यास करणारी व्यक्ती प्रागती करू लागल्यास, आपण एखाद्या माहितीपत्रकातून किंवा थेट अनंतकाल जगू शकाल पुस्तकातून अभ्यास करू शकतो.
६ सर्व आस्थेचा मागोवा घेण्यास आपण सर्वजण नेहमी तयार असू या. आपण सूक्ष्मदृष्टीचे असले पाहिजे आणि प्रात्येक संभाषणाच्या समाप्तीला मनोरंजक प्राश्न विचारून पुढील भेटीसाठी मार्ग तयार करण्याचा नेहमी प्रायत्न केला पाहिजे. हे आपल्याला “प्रात्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होण्यास मदत करील.—२ तीम. ३:१७.