वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९५ पृ. ५
  • ईश्‍वारशासित सेवा प्राशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वारशासित सेवा प्राशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९५
आमची राज्य सेवा—१९९५
km १२/९५ पृ. ५

ईश्‍वारशासित सेवा प्राशालेची चाचणी

ईश्‍वारशासित सेवा प्राशालेत सप्टेंबर ४ ते डिसेंबर १८, १९९५ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्राश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्राश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्राश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या संदर्भात प्रात्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:

१. यशया ६६:७ येथे दिलेला “पुत्र,” १९१४ मधील मशीही राज्याच्या जन्माचे प्रातिनिधीत्व करत नाही, तर १९१९ मधील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या आध्यात्मिक राष्ट्राच्या जन्माचे प्रातिनिधीत्व करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९० ५/१ पृ. १५.]

२. प्रामाणिकपणे केलेल्या विनवण्या यहोवाने ज्या गोष्टी अन्यथा केल्या नसत्या अशा गोष्टी करण्यासाठी त्याला प्रावृत्त करू शकतात हे समजण्यास यशया ३८:५ आपली मदत करते. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९५ ४/१ पृ. १४.]

३. पृथ्वीवरील क्षुद्र माणूस विश्‍वाच्या सृष्टिकर्त्याला खेदीत किंवा आनंदी करू शकतो. (यश. ६३:१०) [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९३ ६/१ पृ. २५.]

४. गर्भधारणेच्या वेळी सुरू होणाऱ्‍या जीवनाविषयी बायबल जे काही दाखविते त्यास यिर्मया १:५ पुष्टी देते. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८९ ६/१५ पृ. २९.]

५. यशया ५३:५, १२ ने भाकीत केले की, येशू ख्रिस्त इतरांची पापे झाकण्याकरता खंडणी बलिदान म्हणून मरण पावेल. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९३ ४/१ पृ. ८.]

६. यशया ४८:१७, आपल्याला प्रात्यक्षात देव वचनाचा अवलंब आपल्या जीवनात करण्यास व त्यात आढळणारी तत्त्वे खरोखर यशाकडे नेतात हे स्वतःहून पाहण्यास सांगते. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९५ ३/१ पृ. १२.]

७. यहोवाचे साक्षीदार राजकीय कार्यहालचालींमध्ये कोणत्याही प्राकारचा भाग घेत नसले, तरी एखाद्या राजकीय पक्षात प्रावेश करण्याबाबत, एखाद्या पदासाठी उभे राहण्याबाबत वा निवडणुकीत मतदान करण्याबाबत इतरांच्या कामात ते लुडबुड करत नाहीत. [uw-MR पृ. १६६ परि. १२]

८. ख्रिस्ताच्या काळाआधीच्या देवाच्या विश्‍वासू सेवकांना, आपल्याला ज्याची आशा आहे त्या नवीन जगाविषयी काहीच ज्ञान नव्हते. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९५ २/१५ पृ. ११.]

९. कोरेशवर खरोखरचे तेल ओतल्याचा काही पुरावा नसला, तरी तो यहोवाचा “अभिषिक्‍त” बनला. (यश. ४५:१) [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९३ २/१ पृ. ३१.]

१०. पूर्ण भक्‍तीने देवाची सेवा करण्यासाठी, ख्रिश्‍चनांना, सैतानाच्या पार्थिव व्यवस्थीकरणावर यहोवा न्यायदंड कधी बजावेल तो दिवस व ती घटका ठाऊक असली पाहिजे. [uw-MR पृ. १७६ परि. २]

पुढील प्राश्‍नांची उत्तरे द्या:

११. रक्‍त वर्ज्य करण्याच्या आपल्या निर्णयाविषयी एका ख्रिश्‍चनाने आपल्या डॉक्टरांना कधी सांगावे? [uw-MR पृ. १५८ परि. ९]

१२. कोणत्या अर्थाने येशू या जगाचा भाग नव्हता? [uw-MR पृ. १६१ परि. २]

१३. देवाचे वचन धैर्याने सांगावे याचा अर्थ काय होत नाही? [uw-MR पृ. १७५ परि. १३]

१४. आपण खरोखर सुवार्तेचा स्वीकार केल्यास, आपल्यावर कोणती जबाबदारी येते? [uw-MR पृ. १६९ परि. २]

१५. पृथ्वीच्या सर्व राष्ट्रांमध्ये, देवाप्राती “सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र” कोणते आहे, व त्या राष्ट्रात आणखी कोणाची भर पडत आहे? (यश. २६:२, १५) [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९५ १/१ पृ. १०-११.]

१६. यशया ३२:१, २ नुसार, वडिलांची प्रामुख भूमिका काय आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९३ ४/१ पृ. ३०.]

१७. जगभरात यहोवाच्या साक्षीदारांमध्ये ईश्‍वारी शिक्षणाचा कोणता दृश्‍य परिणाम स्पष्टपणे झाला आहे? (यश. ५४:१३) [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९४ ३/१ पृ. १७.]

१८. तीन शुभवर्तमान, ‘ह्‍या युगाच्या समाप्तीची’ ओळख घडवणाऱ्‍या संमिश्र चिन्हाबद्दलची बारीकसारीक माहिती कोणत्या पुस्तकांमध्ये व अध्यायांमध्ये पुरवतात? [uw-MR पृ. १७८ परि. ५]

१९. यहूदातील लाखीशच्या किल्ल्याचा कब्जा मिळाला त्या वेळी सन्हेरीबने बढाई मारली तशी जेरूसलेम या यहूदाच्या राजधानीवर कब्जा केल्यावर आपल्या ऐतिहासिक अहवालात तो त्याविषयी बढाई का मारू शकला नाही? (यश. ३७:३६) [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९३ ६/१, पृ. ६.]

२०. यशया २७:१ मधील “लिव्याथान” कोणाला व कशाला सूचित करतो? [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८६ ८/१५, पृ. ३१.]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. एक ख्रिश्‍चन इस्पितळात दाखल होतो त्या वेळी, रक्‍त न वापरण्याची ________________________ विनंती त्याने करावी, व त्याची केस हाताळणाऱ्‍या डॉक्टरांशी त्याने व्यक्‍तिगतरित्या ________________________ [uw-MR पृ. १५८ परि. ९]

२२. आपण यहोवावर विसंबून आहोत हे दाखवण्याचे दोन मार्ग म्हणजे, नियमितपणे _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ उपस्थित राहणे व नियमितपणे त्याला _________________________ करणे होय. [uw-MR पृ. १७०-१ परि. ५-७]

२३. यहुद्यांकरता येशू, ________________________ दगड होता, परंतु यशया ८:१४ व २८:१६ च्या पूर्णतेत यहोवा आपले आध्यात्मिक मंदिर ज्यावर बांधतो ती पाया असलेली ________________________ येशू बनला. [si पृ. १२३ परि. ३६]

२४. इफिसकर १:९, १० मध्ये दिलेली योजना ________________________ यावर केंद्रित आहे, आणि त्याच्याद्वारे मानवांना देवासन्मुख एका ________________________ स्थितीत आणले जाते, यातील काहींना ________________________ तर इतरांना ________________________ आशा आहे. [uw-MR पृ. १८६ परि. ६]

२५. रोमकर ८:१९-२१ येथे सांगितलेले ‘देवाचे पुत्र,’ आत्म्याने अभिषिक्‍त झालेले ख्रिश्‍चन आहेत, ज्यांनी आपले ________________________ प्रातिफळ प्राप्त केले व ते क्रियाशील झाले आहेत, ख्रिस्तासोबत या दुष्ट व्यवस्थीकरणाचा ________________________ करण्यात भाग घेत असल्याचा पुरावा ________________________ मानव पाहतील त्या वेळी ते प्राकट होतील. [uw-MR पृ. १८८ परि. ११]

पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:

२६. आरंभीच्या ख्रिश्‍चनांना माणूसघाणे म्हणून त्यांचा तिरस्कार केला जाई कारण ते/त्यांनी (ख्रिस्ती विश्‍वासात नसलेल्यांशी बोलत नव्हते; मूर्तींची उपासना केली नाही; हिंसक व अनैतिक मनोरंजन टाळले). [uw-MR पृ. १६३ परि. ७]

२७. मत्तय १३:३६-४३ मधील येशूच्या दाखल्यात, गहू (प्राचीन काळच्या विश्‍वासू लोकांचे; मोठ्या समुदायाचे; अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे) प्रातिनिधीत्व करतात, तर निदण (सर्व गैर-विश्‍वासू; नकली ख्रिस्ती; शास्त्री व परूशी) यांचे प्रातिनिधीत्व करतात. [uw-MR पृ. १७९ परि. ७]

२८. राजनैतिक शासकांनी खोट्या धर्माचा नाश केल्यावर, ते उद्धटपणे (वाणिज्य व्यवस्थेच्या; संयुक्‍त राष्ट्रांच्या; यहोवाच्या सार्वभौमत्वाला उंचावून धरणाऱ्‍यांच्या) विरोधात उठतील. [uw-MR पृ. १८२ परि. १३]

२९. सन १९१४ मध्ये, जवळजवळ (१,१००; ५,१००; १०,१००) जण सक्रियपणे प्राचार करत होते. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९४ ९/१ पृ. १६.]

३०. आपल्याजवळ इतर कोणत्याही प्राचीन संदेष्ट्यांपेक्षा (दानीएल; यशया; मोशे) शिवाय यिर्मयाचे संपूर्ण जीवनचरित्र आहे. [si पृ. १२४ परि. ५]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

लेवी. १७:११, १२; यश. ४३:१०; यिर्म. ७:३१; योहा. ८:४१, ४४, ४७; प्रो. कृत्ये ४:१३

३१. मर्यादित ऐहिक शिक्षण एखाद्याला सुवार्तेचा धीट घोषक होण्यासाठी अपात्र ठरवत नाही. [uw-MR पृ. १७२ परि. ८]

३२. रक्‍ताच्या एकमेव शास्त्रवचनीय उपयोगाने त्याची पवित्रता दाखवली जाते व ख्रिस्ताच्या बलिदानाच्या मूल्यावर जोर दिला जातो. [uw-MR पृ. १५९ परि. ११]

३३. एका व्यक्‍तीचा आध्यात्मिक पिता कोण आहे हे तिच्या शब्दांपेक्षा कृत्यांवरून व वृत्तीवरून अधिक स्पष्टपणे प्राकट होते. [uw-MR पृ. १८६ परि. ५]

३४. यहोवाचा कोणी पूर्वज नाही; त्याच्याआधी कोणताही देव अस्तित्वात नव्हता, व त्याच्यानंतरही कोणी नसेल कारण तो अनंत, सर्वश्रेष्ठ सार्वभौम आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९२ १/१५ पृ. २२.]

३५. अनेक प्रौढ आज आपल्या मुलांचा बळी मूर्तींना देण्याचा विचारही करणार नाहीत, तरीही अगणित बालकांचा गर्भपाताद्वारे मुद्दामहून नाश केला जातो व लाखो युवकांना युद्धाच्या वेदीवर अर्पिले गेले आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८८ १/१५ पृ. ३१.]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा