अचूक ज्ञानाची सहभागिता करा
डिसेंबर दरम्यान, आपल्या क्षेत्र सेवेत आपण सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करणार आहोत. समयोचित बायबलची चर्चा सुरू करण्याकरता तुम्ही काय म्हणाल आणि हे उत्कृष्ट प्राकाशन तुम्ही कसे सादर कराल?
२ आपल्या पत्रिकांचा उपयोग करणे: इतर साहित्य सादर करण्याआधीच एखाद्या व्यक्तीमध्ये आस्था जागृत करण्यास पत्रिकांचा उपयोग केल्याने काही प्राचारकांना यश प्राप्त झाले आहे. हे साध्य करण्यास आपल्याला कशी मदत मिळू शकेल? या जगाचा बचाव होईल का? ही पत्रिका सादर करून.
एखाद्या व्यक्तीचा बायबलवर विश्वास असल्यास, तुम्ही असे म्हणू शकाल:
▪ “येशू ख्रिस्त हा सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य होता याजशी लोक सहमत होतील का असे आम्ही त्यांना विचारत आहोत. [उत्तरासाठी वेळ द्या.] अर्थात, अनेक लोकांनी मानवी कारभारांच्या पद्धतीवर प्राभाव पाडला आहे, आणि काहींनी मानवजातीच्या प्रागतीसाठी हातभारही लावला आहे, परंतु येशू ख्रिस्त इतरांपेक्षा कशामुळे वेगळा आहे याची नोंद घ्या. [योहान १७:३ वाचा.] मानवजातीला सार्वकालिक जीवन देण्याचे सामर्थ्य कोणाजवळही नाही. [पत्रिकाचे पृष्ठ ३ काढा.] येशू या पृथ्वीवर होता तेव्हा, जगाच्या समाप्तीच्या आधी ज्या घटना घडतील त्यांचे वर्णन त्याने केले. परंतु, त्याने त्याच्या शिष्यांना आनंद करण्यासही उत्तेजन दिले कारण मुक्ती समीप येत होती असा या घटनांचा अर्थ होणार होता.” ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या चिन्हाच्या काही वैशिष्ट्यांची चर्चा संक्षिप्त रूपात केल्यानंतर, मागील पानावर लक्ष आकर्षित करा ज्यामध्ये त्याच्या राज्य शासनाचे काही आशीर्वाद दाखवले आहेत.
३ एखादा तरुण किंवा नवोदित वा अननुभवी असलेला प्राचारक प्रास्तावना म्हणून कदाचित पत्रिकेतील चित्रे सादर करील.
बायबलवर विश्वास नसलेल्या व्यक्तीशी बोलत असताना, एखादा प्राचारक “या जगाचा बचाव होईल का?” या पत्रिकेतील ३ आणि ४ पृष्ठे काढून असे म्हणू शकतो:
▪ “ही दोन चित्रे पाहा, एक म्हणजे युद्धाच्या वेळी विमान बॉम्ब पाडत असल्याचे आणि दुसरे एका उपाशी मुलाचे. [पृष्ठ ५ काढा.] भूकंप आणि इस्पितळात खाटेवरील एका आजारी व्यक्तीच्या चित्रांकडे पाहा. [अंमळ थांबा.] अशा भयानक गोष्टींचा लवकरच अंत होईल असे बायबल दाखवते.”
४ त्यानंतर, तुम्ही प्राकटीकरण २१:३, ४ हे वचन थेट बायबलमधून किंवा पत्रिकेच्या पृष्ठ ६ वर उद्धृत केले आहे तेथून वाचून दाखवू शकता. दाखवलेल्या आस्थेप्रामाणे, तुम्ही अधिक माहिती ठळकपणे मांडू शकता. सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा अनंतकाल जगू शकाल यातील जे योग्य वाटेल ते पुस्तक सादर करा. अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठे १५०-१५३ आणि १५६-१६२ वरील चित्रे दाखवून तुम्ही सध्याच्या परिस्थितींची तुलना देवाच्या राज्यातील भवितव्याच्या परिस्थितींशी करू शकता.
५ भवितव्यातील भेटीसाठी पाया घालणे: आपण एखादी पत्रिका, सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक किंवा इतर कोणतेही साहित्य दिले असले किंवा चांगले संभाषण केले असले, तरी आपण असे म्हणू शकतो: “पुढील वेळी मी येईन तेव्हा, देवाचे राज्य लवकरच जो बदल घडवून आणणार आहे त्यासंबंधी तुम्हाला एखादी मनोवेधक वस्तुस्थिती सांगण्यास मला आवडेल.” त्या भेटीची आणि दाखवलेल्या आस्थेची काळजीपूर्वक नोंद निश्चित करा.
६ मानवजातीला केवळ देवाचे राज्य खरी आशा देते. आपण ज्या सर्वांना भेटतो त्यांना “देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्याचे पूर्ण ज्ञान” सांगण्यास आपण उत्कट इच्छा दाखवू या.—कलस्सै. २:२.