देवाच्या वचनाचे सामर्थ्य
१ देवाचे वचन सामर्थ्यवान आहे. (इब्री ४:१२) आज याचा पुरावा , लाखोंनी पवित्र शास्त्रातींल सत्य शिकून व्यक्तिगत जीवनात, लागू केल्यामुळे जो बदल घडला गेला ह्यात आम्ही पाहू शकतो. ही गोष्ट पहिल्या शतकातही जेव्हा येशूच्या शिष्यांनी देवाच्या वचनांच्या ज्ञानाची सहभागिता इतरांसोबत केली तेव्हा खरी होती.—रोम १२:२.
२ पवित्र शास्त्राच्या शिकवणींचा फायदा मिळवण्यासाठी लोकांनी पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे हे ओळखले पाहिजे व ते पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. (१ थेस्स २:१३) डिसेंबर महिन्यात आम्ही लोकांना पवित्र शास्त्राच्या मूल्याचे शिक्षण घेण्याची संधी पुरवणार आहोत व तुम्ही पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकातून अचूक ज्ञान मिळविण्यास त्यांना मदत करणार आहोत.
३ अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकातील काही चित्तवेधक विषयांची उजळणी का करू नये बरे? यातील अनुक्रमणिका, तुम्हाला यहोवा देवाच्या व येशूच्या भूमिकेची चर्चा, मृत्युच्या मूळ शिकवणी, नरक, दुष्टात्मे, पुनरुत्थान व देवाचे राज्य या विषयांची देखील चर्चा केली आहे अशा धड्यांची माहिती देईल. ह्या पुस्तकात खूप फोटो व चित्रे आहेत. ह्या विषयांमुळे आपण हे पुस्तक खऱ्या आवेशाने सादर करू शकू, व असा दृढ विश्वास ठेवू की आमच्या क्षेत्रातील लोकांना यात सांगितलेली सुर्वाता ऐकण्याची गरज आहे. परिणामी, ह्या पुस्तकाच्या आपल्या आवेशामुळे, घरमालक आपल्या राज्य संदेशास व आपल्या सादरतेस नक्कीच प्रतिसाद देईल.
४ जेव्हा आपण अशा घरमालकास भेटतो की ज्याला, भवितव्यात मानवजातीसाठी कोणती आशा आहे हे जाणण्याची खरोखर आस्था आहे, त्याला हे पुस्तक दाखवण्यासाठी कसे वापरू शकाल. आपण पहिल्या धड्याच्या पृष्ठ १२ व १३ वर सांगितलेल्या पृथ्वीबद्दल व मनुष्यजातीकरता देवाचा काय उद्देश आहे, व हे सर्व भव्य आशीर्वाद फार नजीक आहेत हे दाखवू शकू. १५५-१५८ पानावरील चित्राकडे त्यांचे लक्ष केंद्रित करू शकतो. चित्रांजवळील वचने वाचून दाखवल्यावर, घरमालकास समाधान वाटेल की आपली चर्चा पवित्र शास्त्रावर आधारीत आहे.
५ ख्रिस्ती धर्म जगताच्या वागणूकीमुळे पुष्कळ लोक पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे असा विश्वास धरण्यास नाकारतात. अशावेळेस २२वा धडा, “खऱ्या धर्मास ओळखणे” याचा उपयोग करून, आम्ही त्यांना यहोवाच्या साक्षीदारांनी व इतर धर्मांनी उत्पन्न केलेली फलप्राप्ती यांजमधील फरक दाखवून देऊ शकतो.
६ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या इंग्रजी भाषेतील पवित्र शास्त्रामधून जर आम्ही त्यांना वचन वाचून दाखवले तर, ह्या पवित्र शास्त्राच्या स्पष्ट भाषेचे कदाचित घरमालक कौतुक करेल. किंवा असे होईल की घरमालकाने आपल्या संदेशाबद्दल रसिकता दाखवली पण त्याच्याकडे पवित्र शास्त्र नसेल. तर अशा वेळेस आपण जे पवित्र शास्त्र वापरत आहोत त्याच्या अद्वितीय लक्षणांचे व त्याचा उपयोग इतरांसोबत आपण का करतो याचे कारण सांगू शकतो. ह्या व्यतिरिक्त पवित्र शास्त्राच्या मागील बाजूस दिलेल्या इन्डेक्स व चर्चेसाठी “पवित्र शास्त्रीय विषय” त्यांना दाखवू शकतो. ह्यामुळे घरमालकास न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ची एक प्रत सादर करण्याची संधी आम्हास मिळेल, व जर त्याचक्षणी आमच्याकडे नसेल, तर दुसऱ्या वेळेस येऊन ते देण्याची संधी मिळेल.
७ पवित्र शास्त्राकरवीच, यहोवा देवाने मनुष्यजातीसोबत त्याचे व्यवहार व त्यांच्या विस्मयकारक व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख करून दिली आहे. आपण न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन व अनंतकाळ जगू शकाल यांचा उपयोग करून, इतरांना यहोवाबद्दल अधिक शिकण्यास व त्याच्या वचनाचे सामर्थ्य समजण्यास मदत करू या!—२ करिंथ. १०:४.