१९९३ करिता ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेचा आराखडा
सूचना
१९९३ मध्ये ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा पुढील व्यवस्थेनुरुप चालविली जाईल.
क्रमिक पुस्तकेः पवित्र शास्त्र, “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” (१९९० ची आवृत्ती) [si], थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबूक [sg], द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड् [gt], बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन [td], ही प्रकाशने साहित्याच्या नेमणूका देण्यासाठी वापरली जातील.
शाळेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने सुरु होईल. त्यानंतर तो पुढील प्रकारे चालविला जाईलः
नेमणूक क्रमांक १: १५ मिनिटे. ही वडील किंवा प्रशिक्षित उपाध्य सेवकांकरवी हाताळली जावी. ही नेमणूक “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” किंवा थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबूक यावर आधारलेली असेल. ही नेमणूक १० ते १२ मिनिटाकरिता बोधप्रद भाषण या अर्थी सादर करावी व नंतर ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील प्रश्नांचा वापर करून तोंडी उजळणी घ्यावी. या मागील ध्येय केवळ साहित्य उरकावे हे नसावे तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीतील व्यावहारिक मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे व मंडळीस अत्यंत साहाय्यक ठरणारे मुद्दे ठळकपणे सामोरे मांडावे हे असावे. गरज आहे तेथे या साहित्याचे शिर्षक निवडावे. सर्वांना या साहित्याची काळजीपूर्वक पूर्वतयारी करण्याचे प्रोत्साहन दिले जाते की ज्याकरवी साहित्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकेल.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवाने वेळेमध्ये आपले भाषण संपविण्याची दक्षता घ्यावी. जरुरी भासल्यास या बांधवास खाजगी सूचना द्याव्या.
पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्देः ६ मिनिटे. हा भाग शाळा देखरेख्यांकरवी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या लायक वडीलांनी किंवा उपाध्य सेवकांनी हाताळावा. नेमून दिलेल्या वाचनाचा तो सारांश नसावा. नेमलेल्या अध्यायातील एकंदर त्रोटक दृष्टीकोण सांगितल्यावर त्यातील माहिती आम्हास का व कशी महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी सभागृहाला साहाय्य करावे. साहित्यातील ठळक मुद्यांसाठी टेहळणी बुरुज यातील साहित्याचा परामर्श घ्यावा. यानंतर शाळा देखरेखे विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवितील.
भाषण क्रमांक २: ५ मिनिटे. एका बंधूला नेमून दिलेल्या पवित्र शास्त्र भागाचे हे वाचन आहे. हे शाळेच्या मुख्य वर्गास तसेच उप वर्गास सुध्दा लागू आहे. सुरुवातीला त्रोटक विवेचन, व समाप्तीचे विचार यात काही मुद्दे विवेचीत करता येतील एवढी पुरेशी ही वाचनाची नेमणूक आहे. यात ऐतिहासिक पार्श्वभूमि, भविष्यवादित किंवा तात्विक विषयाची अर्थसूचकता व त्यांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व शास्त्रवचने मध्यंतरी न थांबता वाचली जावीत.
भाषण क्रमांक ३: ५ मिनिटे. हे भाषण भगिनींना नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड् या पुस्तकातून राहील. नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थिनीस वाचता आले पाहिजे. भाषण सादर करताना ही विद्यार्थिनी बसू शकते वा उभी राहू शकते. एक मदतनीस शाळा देखरेखे नेमून देतील पण अधिक मदतनीस वापरता येतील. भाषणातील दृश्य रचना क्षेत्र कार्य किंवा अनौपचारिक साक्षीकार्य याजशी संबंधित असावी. ही दृश्य रचना भाषण देणाऱ्याकरवी वा तिच्या मदतनीसाकरवी प्रस्तुत करता येईल. दृश्य रचना नव्हे तर साहित्याला प्राधान्य दिले जावे. विद्यार्थिनीने आराखड्यात दिलेल्या शिर्षकाचा वापर करावा.
भाषण क्रमांक ४: ५ मिनिटे. बंधूला किंवा भगिनीला नेमून देण्यात येईल. जेव्हा बंधूला नेमणूक देण्यात येईल तेव्हा त्याने सबंध सभागृहाला ते भाषण सादर करावे. राज्य सभागृहातील उपस्थितांना विचारात घेऊन त्या बांधवाने भाषणाची तयारी करावी हे बरे, म्हणजे जे ते ऐकतील ते त्यांना माहितीयुक्त व लाभदायक ठरेल. तथापि, एका दुसऱ्या व्यावहारिक व सभागृहास अनुलक्षून असणाऱ्या योग्य रचनेकडे साहित्याचा कल असेल तर तो बंधू त्या पध्दतीने त्या भाषणाची तयारी करू शकेल. विद्यार्थ्याने, नेमून दिलेल्या शिर्षकाप्रमाणे तयारी करावी.
हे भाषण भगिनीला नेमून दिल्यास ते तिने भाषण क्रमांक ३ च्या पध्दतीने सादर करावे.
सल्ला व शेराः प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर शाळा देखरेखे विशिष्ट प्रकारातील सल्ला देतील. याकरता कौन्सिल स्लीपवरील प्रगतिशील सूचनासंबंधाने दाखविण्यात आलेला अनुक्रम पाळण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात प्रगति करण्याची गरज आहे त्याकडे त्यांनी लक्ष देण्यास हवे. विद्यार्थी वक्ता “जी” या शेऱ्यास पात्र आहे व स्पीच कौन्सिलवर इतर कोणत्याहि गुणावर “आय” किंवा “डब्ल्यू” असा निर्देश नाही तर ज्या गुणावर पुढील भाषणाबाबत विद्यार्थ्याने तयारी करावी असे शाळा देखरेख्यास वाटते तेथील चौकोनावर त्याने आळे करावे. ही माहिती ते त्या विद्यार्थ्याला त्या सायंकाळी देतीलच व त्यासोबत पुढल्या वेळी विद्यार्थ्याला थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल असायन्मेंट स्लीप (एस–८९) वर जी नेमणूक ते देतील त्यावेळीही हाच गुण तयारीकरता दर्शवितील. भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली बैठक पहिल्या रांगेत घ्यावी. याद्वारे एकतर वेळ वाचेल व शाळा देखरेख्यांनाही त्यांना थेट सूचना देण्याचे सोईचे होईल. तोंडी सूचना देऊन झाल्यावर वेळ मुभा देईल त्याप्रमाणे सल्लागारास, विद्यार्थ्याने आपल्या भाषणात साहित्याच्या ज्या माहितीयुक्त व व्यावहारिक मुद्यांचा समावेश केला नव्हता त्यावर विवेचन मांडता येईल. प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर सल्ला व शेरा देण्यासाठी शाळा देखरेख्यांनी केवळ दोनच मिनिटे वापरण्याची दक्षता घ्यावी. पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्यात काही विशिष्ट असे सांगायचे राहून गेले असल्यास याविषयीची सूचना त्या बंधूस खाजगी रितीने देण्यात यावी.
भाषणाची तयारी: नेमणूक क्रमांक १ लाभलेल्या बांधवाने शक्य आहे तेथे एक विषय निवडावा. दुसरे भाषण मिळालेल्या विद्यार्थ्याने असा विषय निवडावा की ज्याकरवी नेमलेल्या साहित्याचा एकंदर उरक त्यामध्ये येऊ शकेल. तिसऱ्या व चवथ्या भाषणाची नेमणूक मिळालेल्या विद्यार्थ्याने दाखविलेल्या विषयाचा वापर करावा. भाषण देण्याआधी विद्यार्थ्याने, तो ज्या भाषणशैलीच्या गुणावर काम करीत आहे त्याविषयी स्कूल गाईड पुस्तकामध्ये असलेले साहित्य वाचलेले असावयास हवे.
वेळ: कोणतेही भाषण वेळेबाहेर जाऊ देऊ नये. तसेच सल्लागाराने दिलेला सल्ला व शेराही वेळेच्या आत असावा. भाषण क्रमांक २ ते ४ ची वेळ झाली म्हणजे ते कुशलतेने थांबवावे. ज्या बांधवाला “थांबण्याचा संकेत” करण्यासाठी नेमले आहे त्यानेहि तो तत्परतेने करावा. नेमणूक क्रमांक १ चे बांधव वेळेबाहेर गेल्यास त्यांना खाजगी सूचना देण्यात यावी. सर्वांनी वेळेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. सबंध कार्यक्रम, गीत व प्रार्थना वगळता ४५ मिनिटांचा आहे.
लेखी चाचणी: वेळोवेळी लेखी चाचणी घेण्यात येईल. याच्या तयारीसाठी नेमिलेल्या साहित्याची व नियुक्त केलेल्या पवित्र शास्त्र वाचन विभागाची उजळणी करावी. २५ मिनिटांच्या चाचणीत फक्त पवित्र शास्त्र वापरता येईल. राहिलेल्या वेळात प्रश्नोत्तराच्या रुपाने चर्चा होईल. प्रत्येक विद्यार्थी आपली उत्तर पत्रिका तपासील. शाळा देखरेखे सर्व उत्तरे वाचून दाखवतील. यात कठीण प्रश्नावर अधिक लक्ष देऊन त्यांची उत्तरे सर्वांना स्पष्टपणे समजावून देण्याचे सहाय्य करतील. स्थानिक परिस्थितीच्या अपरिहार्य कारणामुळे ही लेखी चाचणी नियुक्त केलेल्या तारखेच्या एका आठवड्यानंतर घेता येईल.
मोठ्या व लहान मंडळ्या: ज्या मंडळीतील शाळेत ५० वा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पटावर असतील तेथे नियोजित भाषणे देण्यासाठी विद्यार्थ्यांची गट रचना करता येईल व त्यांची भाषणे दुसऱ्या सल्लागारांच्या समक्ष ऐकविता येतील. अर्थातच, समर्पण न झालेल्या पण ख्रिस्ती तत्त्वानुरूप जीवन व्यतित करणाऱ्यांना शाळेत आपले नाव दाखल करून नेमणूका प्राप्त करता येतील.
अनुपस्थितीः दर आठवडी शाळेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून, आपणाला दिलेल्या नेमणूकांची चांगली तयारी करून आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात भाग घेऊन सर्वांनी ह्या शाळेबद्दल रसिकता दाखवावी. सर्व विद्यार्थी, आपणास मिळालेल्या नेमणूका जाणीवपूर्वकतेने पूर्ण करतील अशी आम्ही आशा करतो. नेमलेला विद्यार्थी गैरहजर असल्यास एखादा स्वयंसेवक ती नेमणूक आपल्या परीने जे करता येईल त्याद्वारे हाताळील. किंवा शाळा देखरेखे त्या साहित्याची चर्चा सभागृहासोबत करू शकतील.
आराखडा
मार्च १ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल २५ ते २७
गीत क्र. ६२ (३४)
नं. १: sg पृ. ८४-८ परि. १-९
नं. २: १ शमुवेल २६:७-२५
नं. ३: दया दाखवण्याबद्दल धडा. gt धडा ४०
नं. ४: td ३सी मृतासाठी बाप्तिस्मा अशास्त्रीय आहे का?
मार्च ८ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल २८ ते ३१
गीत क्र. ५९ (३१)
नं. १: १ शमुवेल—हितकारक का आहे? (si पृ. ५७-८ परि. २७-३५)
नं. २: १ शमुवेल ३०:७-२५
नं. ३: येशू—मतभेदाचा केंद्रबिंदू. gt धडा. ४१
नं. ४: td ४ए देवाचे वचन प्रेरित आहे का?
मार्च १५ पवित्र शास्त्र वाचन: २ शमुवेल १ ते ४
गीत क्र. ४३ (१०)
नं. १: २ शमुवेल ची प्रस्तावना (si पृ. ५९ परि. १-५)
नं. २: २ शमुवेल १:१-४, १७-२७
नं. ३: येशू परूशांची कानउघडणी करतो (gt धडा. ४२)
नं. ४: td ४बी पवित्र शास्त्र समजण्यासाठी आम्हास मदतीची गरज आहे.
मार्च २२ पवित्र शास्त्र वाचन: २ शमुवेल ५ ते ८
गीत क्र. ४२ (२२)
नं. १: sg पृ. ८८-९० परि. १०-१५
नं. २: २ शमुवेल ६:१-१९
नं. ३: मचव्यात बसून पाच दाखले शिकवणे. (gt धडा. ४३ परि. १-८)
नं. ४: td ४सी पवित्र शास्त्र आमच्या दिवसासाठी व्यवहारी मार्गदर्शक आहे का?
मार्च २९ पवित्र शास्त्र वाचन: २ शमुवेल ९ ते १२
गीत क्र. ४० (२८)
नं. १: sg पृ. ९०-२ परि. १-७
नं. २: २ शमुवेल १०:१-१४
नं. ३: शिष्य येशूच्या दृष्टांतांपासून कसा फायदा घेतात (gt धडा. ४३ परि. ९-१९)
नं. ४: td ४डी विविध शास्त्रवचने अवतरीत करणे यास शास्त्रवचनीय पाठींबा आहे.
एप्रिल ५ पवित्र शास्त्र वाचन: २ शमुवेल १३ ते १५
गीत क्र. ९१ (९)
नं. १: sg पृ. ९२-५ परि. ८-१८
नं. २: २ शमुवेल १५:१-१७
नं. ३: येशूच्या शिष्यांनां अधिक शिक्षणाचे वरदान लाभते (gt धडा. ४३ परि. २०-३१)
नं. ४: td ४इ इतर “पवित्र पुस्तके” प्रेरित नाहीत
एप्रिल १२ पवित्र शास्त्र वाचन: २ शमुवेल १६ ते १८
गीत क्र. ३८ (६५)
नं. १: sg पृ. ९६-९ परि. १-१०
नं. २: २ शमुवेल १८:१-१७
नं. ३: येशू भीतीदायक वादळ शांत करतो. (gt धडा. ४४)
नं. ४: td ४एफ पवित्र शास्त्र सर्व राष्ट्राच्या व वंशाच्या लोकांसाठी मदत देऊ शकते का?
एप्रिल १९ पवित्र शास्त्र वाचन: २ शमुवेल १९ ते २१
गीत क्र. २९ (११)
नं. १: sg पृ. १००-१०२ परि. १-१२
नं. २: २ शमुवेल १९:१-१४
नं. ३: एक भूतग्रस्त माणूस शिष्य बनतो. (gt धडा. ४५)
नं. ४: td ४जी “जुना” व “नवा” करार दोन्ही महत्वाचे
एप्रिल २६ पवित्र शास्त्र वाचन: २ शमुवेल २२ ते २४
गीत क्र. ८२ (४४)
नं. १: २ शमुवेल—हितकारक का आहे? (si पृ ६३ परि. २८-३१)
नं. २: २ शमुवेल २२:१-४, २४-३६
नं. ३: तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला (gt धडा. ४६)
नं. ४: td ४एच पवित्र शास्त्र पुस्तकांची सुसंगतता अंतर्गत पुराव्यांनी सिध्द करता येते
मे ३ पवित्र शास्त्र वाचन: १ राजे १ व २
गीत क्र. ८५ (१६)
नं. १: १ राजे ची प्रस्तावना (si पृ. ६४-५ परि. १-५)
नं. २: १ राजे १:३२-४८
नं. ३: अश्रुंचे परमानंदात रुपांतर झाले. (gt धडा. ४७)
नं. ४: td ५ए ख्रिस्तीजन रक्त संक्रमण का स्वीकारत नाहीत?
मे १० पवित्र शास्त्र वाचन: १ राजे ३ ते ६
गीत क्र. २५ (५८)
नं. १: sg पृ. १०३-८ परि. १३-२१
नं. २: १ राजे ३:१०-२८
नं. ३: त्याचे चमत्कार पाहूनही येशूस नाकारले जाते. (gt धडा. ४८)
नं. ४: td ५बी एखाद्याचे जीवन कोणत्याही किंमतीवर वाचवण्यास हवे का?
मे १७ पवित्र शास्त्र वाचन: १ राजे ७ व ८
गीत क्र. १०७ (५७)
नं. १: sg पृ. १०८-१२ परि. १-२०
नं. २: १ राजे ८:५४-६६
नं. ३: गालीलात प्रचाराचा तिसरा दौरा. (gt धडा. ४९)
नं. ४: td ६ए १९१४ मध्ये विदेश्यांच्या काळाची समाप्ती झाली हे कशावरुन आम्ही समजू शकतो?
मे २४ पवित्र शास्त्र वाचन: १ राजे ९ ते ११
गीत क्र. १७४ (५१)
नं. १: sg पृ. ११३-१६ परि. १-१६
नं. २: १ राजे १०:१-१३
नं. ३: छळाला तोंड देण्यायाठी शिष्यांना तयार करणे (gt धडा. ५०)
नं. ४: td ६बी मशीहाच्या पहिल्या येण्याच्या काळाबद्दलचा भविष्यवाद भाकीत केला होता का?
मे ३१ पवित्र शास्त्र वाचन: १ राजे १२ ते १४
गीत क्र. १७० (९५)
नं. १: sg पृ. ११६-१८ परि. १-१२
नं. २: १ राजे १२:१-१५
नं. ३: वाढ दिवसाच्या मेजवानीत खून (gt धडा. ५१)
नं. ४: td ६सी येशूच्या जन्माची तारीख इ. स. पू. २ ही आहे का?
जून ७ पवित्र शास्त्र वाचन: १ राजे १५ ते १७
गीत क्र. ६ (४)
नं. १: sg पृ. ११९-२१ परि. १३-२८
नं. २: १ राजे १७:१-१६
नं. ३: येशू अद्भूतरित्या हजारोंना जेवू घालतो (gt धडा. ५२)
नं. ४: td ६डी ख्रिस्ताचे उपाध्यपण ३१/२ वर्षाचे
जून १४ पवित्र शास्त्र वाचन: १ राजे १८ ते २०
गीत क्र. १७५ (१०४)
नं. १: sg पृ. १२२-५ परि. १-२१
नं. २: १ राजे १८:२५-४०
नं. ३: येशू जेव्हा पाण्यावर चालतो (gt धडा. ५३)
नं. ४: td ६ई उत्पत्तीचे दिवस केवढ्या अवधीचे होते?
जून २१ लेखी चाचणी. संपूर्ण १ शमुवेल २५ ते १ राजे २०
गीत क्र. ८ (५०)
जून २८ पवित्र शास्त्र वाचन: १ राजे २१ व २२
गीत क्र. १५० (८३)
नं. १: १ राजे—हितकारक का आहे? (si पृ. ६८-९ परि. २३-२६)
नं. २: १ राजे २१:१५-२९
नं. ३: “स्वर्गातून येणारी भाकर”—कोणाची देणगी? (gt धडा. ५४)
नं. ४: td ७ए पवित्र शास्त्र “चर्च”चा कोणता अर्थ देते?
जुलै ५ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे १ ते ३
गीत क्र. ५० (२३)
नं. १: २ राजे ची प्रस्तावना (si पृ ६९ परि. १-४)
नं. २: २ राजे २:१-१४
नं. ३: अनेक शिष्य येशूला सोडून का जातात? (gt धडा. ५५)
नं. ४: td ७बी येशूची मंडळी किंवा चर्च १४४,००० पुरते मर्यादित आहे
जुलै १२ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे ४ ते ६
गीत क्र. १३२ (७०)
नं. १: sg परि. १२६-९ परि. १-२२
नं. २: २ राजे ५:१-१४
नं. ३: मनुष्य कशाने अशुध्द होतो? (gt धडा ५६)
नं. ४: td ७सी घरी अथवा इमारतीत एकत्र येणे योग्य आहे.
जुलै १९ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे ७ ते ९
गीत क्र. १८ (१०६)
नं. १: sg पृ. १३०-३ परि. १-२०
नं. २: २ राजे ९:१-१४
नं. ३: पीडितांबद्दल येशूची सहानुभूती (gt धडा. ५७)
नं. ४: td ७डी ख्रिस्ती मंडळी पेत्रावर उभारण्यात आली नाही.
जुलै २६ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे १० ते १२
गीत क्र. ११९ (१११)
नं. १: sg पृ. १३३-५ परि. १-८
नं. २: २ राजे १०:१५-३०
नं. ३: ख्रिस्त गैरसमजूत दूर करतो (gt धडा. ५८)
नं. ४: td ७ई ख्रिस्ताने वारसदार या नात्याने कोणा पोपची प्रस्थापना केली नाही.
ऑगस्ट. २ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे १३ ते १५
गीत क्र. १६८ (८४)
नं. १: sg पृ. १३५-८ परि. ९-२१
नं. २: २ राजे १३:१४-२५
नं. ३: येशू खराखर कोण आहे? (gt धडा. ५९)
नं. ४: td ८ए पवित्र शास्त्राचे नैतिक दर्जे उंचावून धरले पाहिजेत
ऑगस्ट. ९ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे १६ ते १८
गीत क्र. १८१ (१०३)
नं. १: sg पृ. १३८-४१ परि. १-१९
नं. २: २ राजे १७:१-१५
नं. ३: ख्रिस्ताचे राज्यवैभवाचे आगाऊ दर्शन (gt धडा. ६०)
नं. ४: td ८बी खरा अलंकार अंत:करणाचा असतो
ऑगस्ट. १६ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे १९ ते २२
गीत क्र. १४४ (७८)
नं. १: sg पृ. १४२-५ परि. १-१५
नं. २: २ राजे १९:१४-२८, ३५
नं. ३: विश्वासाची शक्ति (gt धडा. ६१)
नं. ४: td ९ए उत्पत्तीकार्ये शाबीत झालेल्या विज्ञानासोबत का उत्क्रांतीवादासोबत सहमत आहे?
ऑगस्ट. २३ पवित्र शास्त्र वाचन: २ राजे २३ ते २५
गीत क्र. २१३ (५५)
नं. १: २ राजे—हितकारक का आहे? (si पृ ७४ परि. ३३-३६)
नं. २: २ राजे २३:१-१५
नं. ३: नम्रतेचा धडा (gt धडा. ६२)
नं. ४: td ९बी उत्पत्तीच्या दिवसाचा अवधी २४ तासांचा आहे का?)
ऑगस्ट. ३० पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास १ ते ३
गीत क्र. १०५ (४६)
नं. १: १ इतिहासा ची प्रस्तावना (si पृ. ७५-६ परि. १-७)
नं. २: १ इतिहास ३:१-१६
नं. ३: दुसऱ्यांना अडखळण होईल यापासून सांभाळा (gt धडा. ६३)
नं. ४: td १०ए येशूला क्रुसावर टांगले होते का?
सप्टेबर ६ पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास ४ ते ६
गीत क्र. ११० (५६)
नं. १: sg पृ. १४५-८ परि. १६-३४
नं. २: १ इतिहास ५:१-१७
नं. ३: क्षमेविषयी धडा (gt धडा. ६४)
नं. ४: td १०बी ख्रिश्चनांनी क्रुसाची भक्ति करावी का?
सप्टेबर १३ पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास ७ ते १०
गीत क्र. १५१ (२५)
नं. १: sg पृ. १४९-५० परि. १-८
नं. २: १ इतिहास ७:१-१२
नं. ३: यरूशलेमला गुप्त प्रवास (gt धडा. ६५)
नं. ४: td ११ए संपूर्ण मनुष्यजातीवर मृत्यु येण्याचे कारण काय?
सप्टेबर २० पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास ११ ते १४
गीत क्र. १५५ (१०७)
नं. १: sg पृ. १५०-३ परि. ९-२१
नं. २: १ इतिहास १३:१-१४
नं. ३: मंडपाच्या सणाच्या वेळी धोका (gt धडा. ६६)
नं. ४: td ११बी मृतांची परिस्थिती काय आहे?
सप्टेबर २७ पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास १५ ते १८
गीत क्र. १५६ (९)
नं. १: sg पृ. १५३-६ परि. १-१४
नं. २: १ इतिहास १७:१-१५
नं. ३: येशूला धरण्यात अधिकारी अपयशी का ठरतात? (gt धडा. ६७)
नं. ४: td ११सी मृतांसोबत जीवित संभाषण करु शकतात का?
ऑक्टोबर ४ पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास १९ ते २२
गीत क्र. २ (७९)
नं. १: sg पृ. १५६-८ परि. १५-२४
नं. २: १ इतिहास २२:६-१९
नं. ३: येशूचा ईश्वरी उगम व स्वर्गामध्ये त्याचे भवितव्य (gt धडा. ६८ परि. १-११)
नं. ४: td ११डी मृतांचा सन्मान करणे चुकीचे आहे
ऑक्टोबर ११ पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास २३ ते २६
गीत क्र. १२१ (१००)
नं. १: sg पृ. १५८-६० परि. १-९
नं. २: १ इतिहास २३:१-५, २४-३२
नं. ३: सत्य जे लोकांस बंधनमुक्त करते (gt धडा. ६८ परि. १२-१६)
नं. ४: td १२ए जीवनासाठी यहोवास समर्पण करणे जरूरीचे आहे
ऑक्टोबर १८ पवित्र शास्त्र वाचन: १ इतिहास २७ ते २९
गीत क्र. ८८ (२२)
नं. १: १ इतिहास—हितकारक का आहे? (si पृ. ७८-९ परि. २२-२५)
नं. २: १ इतिहास २७:२३-३४
नं. ३: पितृत्वाचा प्रश्न (gt धडा. ६९)
नं. ४: td १३ए युवकांच्या गुन्हेगारीच्या समस्येविषयी पवित्र शास्त्राचे उत्तर
ऑक्टोबर २५ लेखी चाचणी. संपूर्ण १ राजे २१ ते १ इतिहास २९
गीत क्र. २१७ (११२)
नोव्हेंबर १ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास १ ते ५
गीत क्र. १९१ (९१)
नं. १: २ इतिहासाची प्रस्तावना (si पृ. ७९-८० परि. १-६)
नं. २: २ इतिहास ५:१-१४
नं. ३: जन्मांध माणसाला बरे करणे (gt धडा. ७०)
नं. ४: td १४ए सैतान खरोखर एक व्यक्ति आहे का?
नोव्हेंबर ८ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास ६ ते ८
गीत क्र. ४७ (२१)
नं. १: sg पृ. १६०-३ परि. १०-२४
नं. २: २ इतिहास ७:१-१६
नं. ३: एक भिकारी परुशांना गोंधळात टाकतो (gt धडा. ७१)
नं. ४: td १४बी ह्या जगाचा खरा अधिपती कोण आहे?
नोव्हेंबर १५ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास ९ ते १२
गीत क्र. २०१ (८२)
नं. १: sg पृ. १६३-५ परि. १-९
नं. २: २ इतिहास ९:१-१४
नं. ३: येशू ७० जणांना पाठवतो (gt धडा. ७२)
नं. ४: td १४सी जगातील दुख:मय परिस्थितीस सैतान कारणीभूत आहे
नोव्हेंबर २२ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास १३ ते १७
गीत क्र. २०२ (८०)
नं. १: sg पृ. १६५-७ परि. १०-२१
नं. २: २ इतिहास १३:८-२२
नं. ३: आपला खरा शेजारी कोण आहे? (gt धडा. ७३)
नं. ४: td १४डी दुरात्म्यांचा उगम कोठून झाला?
नोव्हेंबर २९ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास १८ ते २१
गीत क्र. १७२ (९२)
नं. १: sg पृ. १६८-७० परि. १-१४
नं. २: २ इतिहास १९:१-११
नं. ३: येशूचा मार्थेला सल्ला (gt धडा. ७४ परि. १-५)
नं. ४: td १५ए बहिष्कृतपणाविषयीचा शास्त्रवचनीय आधार
डिसेंबर ६ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास २२ ते २५
गीत क्र. १६१ (८७)
नं. १: sg पृ. १७०-१ परि. १५-२२
नं. २: २ इतिहास २३:१-१५
नं. ३: प्रार्थनेत तत्पर असण्याची गरज (gt धडा. ७४ परि. ६-९)
नं. ४: td १५बी बहिष्कृतपणाची कारणे
डिसेंबर १३ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास २६ ते २८
गीत क्र. २२२ (११९)
नं. १: sg पृ. १७२-५ परि. १-१३
नं. २: २ इतिहास २६:११-२३
नं. ३: येशूच्या चमत्कारांना योग्य प्रतिसाद (gt धडा. ७५)
नं. ४: td १५सी ईश्वरी क्षमेसाठी पश्चाताप जरूरीचा आहे
डिसेंबर २० पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास २९ व ३०
गीत क्र. ३४ (८)
नं. १: sg पृ. १७५-७ परि. १-१४
नं. २: २ इतिहास ३०:१-१२
नं. ३: येशू परूशांच्या व शास्त्रींच्या ढोंगीपणास उघड करतो (gt धडा. ७६)
नं. ४: td १६ए ख्रिश्चन व्यसनाधीन होण्याचे टाळतात
डिसेंबर २७ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास ३१ ते ३३
गीत क्र. २१५ (११७)
नं. १: sg पृ. १७७-८० परि. १५-२९
नं. २: २ इतिहास ३२:१०-२२
नं. ३: वारशाच्या प्रश्नाला येशू हाताळतो (gt धडा. ७७)
नं. ४: td १७ए पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे?
जानेवारी ३ पवित्र शास्त्र वाचन: २ इतिहास ३४ ते ३६
गीत क्र. २११ (१०९)
नं. १: २ इतिहास—हितकारक का आहे? (si पृ ८४ परि. ३४-३६)
नं. २: २ इतिहास ३४:२२-३३
नं. ३: येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या पुनरागमनाविषयी सज्ज राहण्यास आर्जवितो (gt धडा. ७८)
नं. ४: td १७बी नंदनवन गमावण्यापासून ते नंदनवन पुन:प्राप्तिपर्यंत
जानेवारी १० पवित्र शास्त्र वाचन: एज्रा १ ते ३
गीत क्र. १९५ (१०५)
नं. १: एज्रा ची प्रस्तावना (si पृ ८५ परि. १-७)
नं. २: एज्रा ३:१-१३
नं. ३: एक राष्ट्र गमावले, पण सर्वच नव्हे (gt धडा. ७९ परि. १-५)
नं. ४: td १७सी पृथ्वीवर नेहमीच लोकवस्ती राहील का?)
जानेवारी १७ पवित्र शास्त्र वाचन: एज्रा ४ ते ७
गीत क्र. १७७ (४८)
नं. १: sg पृ. १८१-३ परि. १-१४
नं. २: एज्रा ६:१-१३
नं. ३: शब्बाथ दिवशी बरे करण्यास विरोध करणाऱ्यांचे खंडण करणे (gt धडा. ७९ परि. ६-९)
नं. ४: td १७डी मनुष्ये पृथ्वीचा नाश करण्यास असमर्थ आहेत
जानेवारी २४ पवित्र शास्त्र वाचन: एज्रा ८ ते १०
गीत क्र. १४८ (१६)
नं. १: एज्रा—हितकारक का आहे? (si पृ ८७ परि. १४-१८)
नं. २: एज्रा ९:१-९, १५
नं. ३: मेंढवाडे व उत्तम मेंढपाळ (gt धडा. ८०)
नं. ४: td १८ए उत्क्रांती अशास्त्रीय आहे
जानेवारी ३१ पवित्र शास्त्र वाचन: नहेम्या १ ते ३
गीत क्र. ५३ (२७)
नं. १: नहेम्या ची प्रस्तावना (si पृ ८८ परि. १-५)
नं. २: नहेम्या ३:१-१४
नं. ३: येशूला ठार मारण्याचा ते प्रयत्न का करतात? (gt धडा. ८१)
नं. ४: td १९ए आमच्या काळातील खोटे संदेष्टे कोण आहेत?
फेब्रवारी ७ पवित्र शास्त्र वाचन: नहेम्या ४ ते ६
गीत क्र. १४३ (७६)
नं. १: sg पृ. १८४-७ परि. १५-३४
नं. २: नहेम्या ६:१-१३
नं. ३: कोण वाचविले जाणार नाहीत? (gt धडा. ८२ परि. १-६)
नं. ४: td २०ए ख्रिश्चनांचा जागतिक सरकारांसोबतचा नातेसंबंध
फेब्रवारी १४ पवित्र शास्त्र वाचन: नहेम्या ७ व ८
गीत क्र. १२३ (६३)
नं. १: sg पृ. १८८-९१ परि. १-१३
नं. २: नहेम्या ८:१-१२
नं. ३: यरूशलेमला जाताना केलेली कार्ये (gt धडा. ८२ परि. ७-११)
नं. ४: td २०बी ख्रिश्चनांची पहिली जबाबदारी देवाविषयीची आहे
फेब्रवारी २१ लेखी चाचणी. संपूर्ण २ इतिहास १ ते नहेम्या ८
गीत क्र. १११ (१९)