घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रॉन्सलेशन ऑफ द होली स्क्रीपचरस् सोबत द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्ज? हे पुस्तक ६० रुपयांना. बंगाली व नेपाळी: आवर प्रॉब्लमस् ब्रोशर. इतर भाषांमध्ये जिथे गॉडस् वर्ड ऑर मॅन्ज हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे लीव्ह फॉरएव्हर हे पुस्तक सादर करु शकता.
जानेवारी १९९३: जुन्या पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी रुपये ६. यामध्ये सर्व १९२ पृष्ठांची पुस्तके. मल्याळम व तामीळ: ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी—फ्रॉम व्हॉट सोर्स? (जुनी आवृत्ती) व युनायटेड इन वर्शिप ऑफ द ओन्ली ट्रु गॉड. गुजराती: द ट्रुथ दॅट लिड्स टू इटरनल लाइफ व इज धिस लाइफ ऑल देअर इज? हिंदी व कन्नड: गुड न्यूज टू मेक यू हॅपी व लेट युवर किंग्डम कम. तेलगु: इज धिस लाइफ ऑल देअर इज? मराठी: लिसनिंग टू द ग्रेट टिचर व इज धिस लाइफ ऑल देअर इज? बंगाली व नेपाळी: आवर प्रॉब्लम माहितीपत्रक.
फेब्रुवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना)
मार्च: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपयांना. इतर भाषांमध्ये जिथे उपलब्ध नसेल तिथे लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना)
सूचना: प्रकाशन सादरतेत थोडासा बदल केला आहे. याचे कारण हे की ‘भारतासाठी’ असलेल्या आमची राज्य सेवा यात फेरबदल करण्यात आला आहे व त्याचे स्पष्टीकरण खाली दिले आहे. ज्या मंडळ्यांनी वर उल्लेखित असणाऱ्या मोहीम प्रकाशनांची अद्याप मागणी केलेली नसेल तर ते आपल्या पुढच्या लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (s−14) करु शकतात.
▪ आमच्या पुढील अंकापासून, म्हणजे जानेवारी १९९३ पासून, ‘भारतासाठी’ आमची राज्य सेवा, ‘युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकासाठी’ च्या राज्य सेवेच्या समीकरणाची असेल. आज पर्यंत, कोणत्या तरी विषयाच्या माहितीकरता तुम्ही संस्थेच्या इन्डेक्स मध्ये पाहिल्यावर ‘भारतासाठी’ आमच्या राज्य सेवेत तुम्हाला कदाचित हवा असणारा विषय इन्डेक्स मध्ये नमूद केलेल्या महिन्याच्या पुढच्या महिन्यात मिळाला असेल. पण जानेवारी १९९३ पासून तुम्हाला हवा असणारा विषय इन्डेक्स मध्ये सांगितलेल्या आमच्या राज्य सेवेमध्येच मिळू शकेल. अशा प्रकारे संपूर्ण जगभरातील आमच्या बांधवांसोबत आम्हाला देखील एकाच वेळी माहिती व शिक्षण मिळेल. विविध शाखांमध्ये काही बदल झाल्यामुळे असे शक्य झाले. आम्ही यहोवाचे फार आभार मानतो की आम्ही इंग्रजी व ज्या इतर भाषा शाखा दप्तर हाताळत आहे त्या भाषांमध्ये आध्यात्मिक अन्न एकाच वेळी पुरविण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.—फिलिपै २:२.
▪ डिसेंबर महिन्यात सर्व मंडळ्यांना त्यांच्या फॉर्म्सचा वर्षाचा साठा मिळेल व त्याचा आकार तुमच्या डिसेंबर स्टेटमेंटवर लावला जाईल. पाठवलेल्या साठ्यासोबत सर्व सचिवांना एक यादी दिली जाईल की ज्यामुळे वितरण करणाऱ्या बांधवांना उचित फॉर्मचे वितरण करता येईल. ज्या फॉर्मवर यादीनुसार दाखवलेली तारीख नसेल असे सर्व जुने फॉर्म नष्ट करावेत. त्यात मेमोरियल निमंत्रणाच्या फॉर्म्सचा देखील समावेश आहे.
▪ ब्रुकलिन वरून वार्षिक अहवाल पुस्तक पाठवले असून, ते तुमच्या मंडळीच्या त्याच पत्यावर येतील की जेथून तुम्ही ती मागवली होती. त्यानंतर जर तुमच्या मंडळीचा पत्ता बदलला असेल तर कृपा करुन तुमचा नवीन पत्ता जुन्या पोस्ट ऑफिसात जाऊन दाखवा की जेणे करुन तुम्हाला तुमची दिलेली ऑर्डर मिळू शकेल.
▪ डिसेंबर ७ ने सुरू होणाऱ्या सप्ताहापासून आम्ही पहिल्यांदा मुक्तिकडे नेणारा ईश्वरी सत्याचा मार्ग, व त्यानंतर कुरूक्षेत्र ते आरमगिदोन—आणि तुमचा बचाव या पुस्तिकांची योजना आखली आहे. ती बंगाली, गुजराती, हिंदी, नेपाळी, व तेलगू या भाषांमध्ये आमची राज्य सेवा यात दिसेल. जो पुस्तक अभ्यास गट यातील कोणतीही भाषा वापरत असेल तर त्यांनी त्या पुस्तिकांचा अभ्यास आखल्यानुसार करावा. इतर गटांनी प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! याच पुस्तकाचा अभ्यास चालू ठेवावा.
▪ अध्यक्षीय देखरेखा किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणीतरी मंडळीचा हिशोब डिसेंबर १ किंवा शक्यतो लवकर तपासावा. तो पूर्ण झाल्यावर मंडळीत घोषणा करावी.
▪ १९९३चे वार्षिक वचन असेल “हे यहोवा, तुझा मार्ग मला दाखीव. . . तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.”—स्तोत्र ८६:११. मंडळ्यांनी जर त्यांच्या वार्षिक वचनाचा नवा फलक तयार केला तर तो जानेवारी १, १९९३ला किंवा नंतर लागलीच मंडळीत लावू शकता.
▪ नवी प्रकाशने उपलब्ध:
सिंधी: “लुक! आय ॲम मेकींग ऑल थिंग्ज् न्यू” (माहितीपत्रक)