तुमच्या मुलांना रक्ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे
१ “पाहा, संतति ही परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] दिलेले धन आहे.” (स्तोत्र १२७:३) तुम्हाला यहोवाकडून असा हा मोलवान ठेवा मिळाला असल्यास तुम्ही खरेच आनंदी पालक आहात, पण यासोबत तुम्हावर तुमच्या मुलांची काळजी, संगोपन व संरक्षण करण्याची गहन जबाबदारी देखील आहे. तुम्ही तुमच्या मुलांना रक्त संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्याची व्यवहार्य पावले उचलली आहेत का? संक्रमणाची स्थिती पुढे उभी राहिल्यास तुमची मुले त्याला कसे तोंड देतील? आणिबाणीची स्थिती संभवते आणि संक्रमण घ्यायलाच हवे अशी दहशत भरली जाते तेव्हा येथे कशी प्रभावीपणे हाताळणी करता येईल याबद्दल तुम्ही कुटुंब या नात्याने बसून विचार केला आहे का?
२ आपल्या कुटुंबाची अशा परिस्थितीसाठी तयारी करणे हे काळजी किंवा अवास्तव चिंता करण्याचे कारण नाही. जीवनात येऊ शकणाऱ्या प्रत्येक घटनांबद्दल तुम्हाला अपेक्षा धरता व तयारी करता येणे शक्य नाही. तरीपण, तुम्ही पालक या नात्याने आपल्या मुलांना रक्त संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अगाऊपणे काहीतरी करू शकता. याकडे दुर्लक्ष केल्यास मुलाला रक्त संक्रमण दिले जाण्याचा धोका असू शकतो. तेव्हा काय करता येण्याजोगे आहे?
३ दृढ निर्धार महत्त्वाचा: देवाने रक्ताबद्दल दिलेल्या कायद्याविषयी स्वतःचा केवढा दृढ निश्चय आहे हे प्रथमतः तुम्ही स्वतः गंभीरपणे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही मुलांना जसे प्रामाणिकता, नैतिकता, तटस्थता, आणि जीवनाच्या इतर गुणांबद्दलचे शिक्षण देता, त्याप्रमाणेच या बाबतीत देखील त्यांनी यहोवाच्या आज्ञेचे पालन करावे म्हणून शिकवता का? अनुवाद १२:२३ मध्ये जे म्हटले आहे तसेच आपल्याला वाटते का की, “रक्त अगदी सेवन करू नये”? २५वे वचन पुढे म्हणतेः “तू ते सेवन करू नये; परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे ते केल्याने तुझे व तुझ्या संततीचे कल्याण होईल.” तुमच्या आजारी मुलास रक्त दिल्याने ‘त्याचे बरे होईल’ असे कदाचित डॉक्टर तुम्हाला म्हणतील, पण ही अशी तातडीची परिस्थिती येण्याआधीच तुम्ही स्वतःसाठी व आपल्या मुलांसाठी रक्त न स्वीकारण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ही गोष्ट तुमचे यहोवाशी असणारे नाते अधिक श्रेष्ठ असून ते, त्याच्या नियमांचा भंग केल्यामुळे जरी जीवन वाचविले जाते असा दावा करण्यात येतो त्यापेक्षाही महत्त्वपूर्ण आहे हे मानण्यावर अवलंबून असते. यावर देवाची सध्याला मर्जी संपादणे आणि भविष्यात सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होणे हे आधारलेले आहे.
४ यहोवाचे साक्षीदार हे जीवनाच्या उगमाकडे असणारे आहेत. त्यांची मरण्याची इच्छा नाही. आपण जगावे व यहोवाची स्तुती करावी आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करावे ही त्यांची इच्छा आहे. या कारणामुळेच ते इस्पितळात जाऊन स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी इलाज घेत असतात. ते डॉक्टरांकडे इलाजाची माहिती घेतात, आणि रक्त हा दर्जेदार इलाज आहे असे सांगण्यात येते तेव्हा ते रक्तहीन अशा पर्यायी इलाजाची माहिती विचारुन घेतात. रक्ताला आता बरेच पर्याय आहेत. अनुभवी डॉक्टर्स त्यांचा उपयोग करीत आहेत. असे हे पर्याय औषधांची भपकेबाजी नसून ते वैद्यकीयदृष्ट्या सबळ उपचार आहेत व याबद्दल अग्रगण्य वैद्यकीय मासिकात माहितीही प्रसिद्ध झाली आहे. साक्षीदार मुलांवर रक्ताशिवाय इलाज करणारा कोणी वैद्य मिळतो का हे शोधून काढणे कधी कधी समस्येचे दिसत असले तरी रक्ताच्या वापराशिवाय चांगली वैद्यकीय सेवा देण्यात आज जगभर हजारो वैद्य आम्हाला सहकार्य देत आहेत.
५ सहकार्य देणारा वैद्य शोधणे: रुग्णांवर उपचार करताना वैद्यांना अनेक चिंता येतात; आणि जेव्हा आपण आमच्या मुलाला रक्ताशिवाय असणारा इलाज करा असे म्हणतो तेव्हा त्यांच्यापुढील आव्हान वाढत असते. काही वैद्य प्रौढांच्या इच्छेला मान्यता दाखवून, यांनी जर त्यांना काही जबाबदारींतून मुक्त करण्याचा फॉर्म भरुन दिला तर हा रक्ताविनाचा इलाज करण्यासाठी तयारी दाखवतात. याचप्रमाणे काही वैद्य प्रौढपणा दाखवणाऱ्या बालकांवर इलाज करण्याची संमती दाखवतील, कारण अशा प्रौढपणा दाखवणाऱ्या बालकांना स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क आहे असे काही न्यायालयांनी संमत केले आहे. (प्रौढपणा दाखवणाऱ्या बालकांच्या चर्चेबद्दल जून १५, १९९१ चा द वॉचटावर, पृ. १६, १७ पहा.) तथापि, तरुण मुले व खासपणे बालकांना, रक्त संक्रमणाच्या आज्ञेशिवाय उपचार करण्याची वैद्य संमती देणार नाही. मुलांवर इलाज करताना रक्ताचा कोणत्याही परिस्थितीत वापर केला जाणार नाही अशी १०० टक्के खात्री केवळ थोडेच वैद्य देतील. तथापि, वैद्यकीय व न्यायालयीन कायद्यामुळे आपणाला अशी खात्री देता येत नाही असे बहुतेक वैद्यांना वाटते. असे असले तरीही, रक्ताबद्दल आपल्या इच्छांचा आदर करुन जेवढे करता येणे शक्य आहे तेवढा यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांवर इलाज करण्याची तयारी वाढत्या संख्येचे वैद्य दाखवीत आहेत.
६ हे लक्षात घेता, समजा, तुम्ही आपल्या मुलासाठी अशा डॉक्टरचा शोध घेत आहात, ज्याने यहोवाच्या साक्षीदारांना चांगले सहकार्य दिल्याचा अहवाल आहे आणि इतर साक्षीदारांसाठीही त्याने रक्तहीन पद्धतींचा इलाज अवलंबिला आहे, तो मिळाला; पण आता त्याला वाटते की, रक्त वापरले जाणार नाही अशी संपूर्ण खात्री देण्याला कायदा संमती देत नाही, तर काय? तथापि, तो म्हणतो की, या खेपेला काही समस्या येणार नाही. त्यामुळे तुम्हाला वाटेल की, हा चांगला मार्ग आहे. तेव्हा अशा परिस्थितीत तुम्हाला त्या डॉक्टरांना पुढे जाण्याची संमती द्यावी हे बरे वाटेल. परंतु, हे स्पष्ट करा की, तुम्ही तुमच्या मुलावर इलाज करण्याची डॉक्टरांना संमती देत आहात तरी त्याला रक्त संक्रमण देण्याची तुम्ही मुभा देत नाही. असे हे मार्गाक्रमण धरल्यामुळे, तुमच्या निर्णयाला हातमिळवणी असे न धरता ती तुमची व्यक्तिगत जबाबदारी आहे हे स्पष्ट व्हावे.
७ अर्थात, तुम्हाला व्यवहार्य असा पर्यायी इलाज सापडला, जेथे रक्त वापरण्याच्या समस्येला शक्यतो कमी केले वा काढून टाकले जाईल, अशावेळी अधिक कमी जोखमीचा मार्ग तुम्हाला मिळेल. यास्तव, हे अपेक्षित आहे की, इतर कोणाही पेक्षा रक्त न देण्याची खात्री देणारा कोणी वैद्य वा शल्यचिकित्सक तुम्ही शोधून काढावा. समस्या उद्भवू शकतात अशी अपेक्षा धरणे ही गोष्ट चांगले समर्थन करण्यास पुढे नेते. आपल्याला सहकार्य देणारा डॉक्टर असेल अशी अगाऊच तयारी ठेवा. शक्य आहे तेथे सहकार्य न देणाऱ्या डॉक्टर्स व इस्पितळांपासून दूरच राहा.
८ काही देशात, इस्पितळात घेतल्या जाणाऱ्या काळजीला जो खर्च भरावा लागतो त्यावर रक्त संक्रमण देण्यात यावे की न यावे हे ठरविण्यात येते. यामुळे फरक घडू शकतो. जेथे पालकांना आरोग्य विमा आहे किंवा इतर काही सुरक्षा आहे, जेथे त्यांना आपल्या पसंतीच्या वैद्यांची निवड करण्याची मुभा असते, अशावेळी मुलांना सहकार न देणाऱ्या इस्पितळांपासून व वैद्यांपासून सहजतेने बाजूला ठेवता येते. एखाद्या कुटुंबाला डॉक्टर्स व इस्पितळे यांजकडून जी सेवा व सहकार्य मिळते ते त्यांना दिलेल्या आर्थिक खर्चातून दिसून येते. तसेच कोणी इस्पितळ अथवा डॉक्टर, मुलाचे प्रकरण दुसऱ्याकडून आपणाकडे घेईल हेही पालकांना किती खर्च भरण्याची क्षमता आहे यावर अवलंबून असते. शिवाय संभाव्य मातांनो, आपल्या गर्भारपणात स्वतःच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या! यामुळे बालकाला अकाली जन्म देणे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या अवघड अशा समस्या टळतील. कारण अशा अकाली जन्मणाऱ्या बालकांच्या बाबतीत आणि त्यांच्या समस्यांच्या बाबतीत जी साधारण उपचार पद्धत आहे त्यात रक्ताचा कित्येक वेळा वापर होण्याचा संभव असतो.
९ कधी कधी डॉक्टरांची अशी तक्रार असते की, यहोवाचे साक्षीदार शेवटल्या मिनिटापर्यंत त्यांना वाटणारा रक्ताचा आक्षेप सांगत नाहीत. असे कधीही घडू नये. इस्पितळात जाताना किंवा कोणा डॉक्टरांना इलाजासाठी नेमणूक देताना साक्षीदार पालकांनी जी पहिली गोष्ट केली पाहिजे ती, त्यांची रक्ताबाबत असणाऱ्या भूमिकेची चर्चा त्यांच्याशी करणे. शस्त्रक्रिया व्हावयाची असेल तर खूप आधी भूल देणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली जावी. याबाबत शस्त्रक्रिया करणारा तुम्हाला काही मदत करू शकेल. शस्त्रक्रियेला संमती होण्याचा फॉर्म काळजीपूर्वक तपासण्यास हवा. आक्षेपार्ह अशा गोष्टींवर काट मारण्याचा तुमचा हक्क आहे. कोणतीही शंका न ठेवण्यासाठी या फॉर्मवर स्पष्ट लिहावे की, रक्त हे धार्मिक आणि वैद्यकीय कारणांमुळे कोणत्याही परिस्थितीत द्यावयाचे नाही किंवा स्वीकारण्याची इच्छा नाही.
१० यहोवाच्या संस्थेकडून मदत: आपल्या मुलांना रक्तापासून संरक्षण द्यावे म्हणून मदत करण्यासाठी यहोवाच्या संस्थेने कोणत्या तरतूदी पुरविल्या आहेत? पुष्कळशा. रक्त व रक्तहीन व्यवस्थेबद्दल संस्थेने आम्हाला बरेच काही लिहून प्रसिद्ध केले आहे. या विषयाबद्दल तुम्ही रक्त तुमचे जीवन कसे वाचवू शकते? हे माहितीपत्रक व इतर प्रकाशनांचा अभ्यास केला आहे. शिवाय तुम्हाला मदत व आधार देऊ शकणारे तुमच्या मंडळीत बंधूभगिनी आहेत. आणिबाणीची परिस्थिती उद्भवलेली असेल अशावेळी इस्पितळात २४ तासांची देखरेख ठेवण्याचे इच्छितील; हे कदाचित कोणी वडील व रुग्णाचा पालक किंवा जवळचा कुटुंबातील सदस्य मिळून करू शकतील. रक्त संक्रमण हे जेव्हा सर्व नातेवाईक व मित्र रात्री घरी निघून जातात, त्यानंतर बहुधा दिले जाते.
११ आम्ही भारतात लवकरच प्रमुख शहरी इस्पितळांशी संपर्क ठेवणाऱ्या समित्यांची नेमणूक करणार आहोत. देशातील प्रत्येक मंडळी ही अशा एका समितीशी संबंधित राहील, ज्यामध्ये प्रशिक्षित असणारे बांधव असून ते तुमच्या मदतीसाठी तयार राहतील. त्यांची जरुरी लागेल तेव्हा तुमच्या वडीलांद्वारे त्यांची भेट घ्या. लहानसहान गोष्टींसाठी त्यांची भेट घेण्याची गरज नाही; पण समस्या गंभीर होत आहे हे पाहत राहून बराच काळ थांबून राहू नका. ही समिती तुम्हाला सहकारी वैद्याची तसेच पर्यायांबद्दल प्रस्ताव सुचवू शकेल. जेथे शक्य आणि जरुरीचे आहे तेथे या समस्येची हाताळणी करण्यासाठी हे बांधव प्रत्यक्ष घटनास्थळी हजर राहून मदत देण्याची व्यवस्था करू शकतात.
१२ न्यायालयाचा अंतर्भाव असणाऱ्या गोष्टींची अपेक्षा करणे व त्यांना तोंड देणे: कोणा डॉक्टराने किंवा इस्पितळाने तुमच्या मुलाला संक्रमित करण्यासाठी कोर्टाकडून परवानगी मिळविण्यासाठी धाव घेतली तर काय? अशावेळी हार मानावी आणि आता काही करता येणे शक्य नाही असे वाटून घ्यावे का? मुळीच नाही! संक्रमणाला अद्यापही टाळता येणे शक्य आहे. याबद्दलची तयारी अगाऊपणे करण्यास हवी. त्यासाठी काय करता येईल?
१३ या प्रकरणात इस्पितळे व न्यायाधीश यांना मार्गदर्शित करणारी वा प्रभूत्व करणारी काही कायदेशीर तत्त्वे यांची समज प्राप्त करून घेणे हे तुम्हाला आपले समर्थन प्रस्तुत करण्यामध्ये उचित मदत देऊ शकेल. यापैकी मूलभूत स्वरुपाचे महत्त्व राखणारे तत्त्व हे आहे की, कायदा हा पालकांना आपल्या मुलांसाठी वैद्यकीय इलाज स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा अमर्यादित हक्क देत नाही. प्रौढांना एखादा वैद्यकीय इलाज स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क सहसा असला तरी मुलाच्या कल्याणास्तव ठरविण्यात आलेली उपचार पद्धती, पालकांनी धार्मिक विश्वासानुरुप कितीही प्रामाणिकपणे मनधरणी केली तरी ती नाकारण्याची मुभा त्यांना नाही.
१४ हेच मूलभूत तत्त्व १९४४ मधील अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्वाळा दिला त्यामध्ये प्रवर्तित झाल्याचे दिसले. त्यात म्हटले आहेः “पालकांना स्वतः हुतात्मे बनण्याची मोकळीक आहे; पण त्यांना आपल्या मुलांना, जे सज्ञान बनेपर्यंत आणि त्यांना स्वतःला निवड करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त होत नाही तोपर्यंत हुतात्मे बनविण्याची मोकळीक नाही.” मुलाचे शारीरिक आरोग्य व कल्याण याबाबत वाटणारी ही मूलभूत काळजी आजच्या बाल-कल्याण संस्थेच्या कायद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मुलांना वाईट वागणूक मिळण्यापासून दूर ठेवण्यासाठी करण्यात आलेले हे कायदे त्यांना वैद्यकीय इलाजाच्या बाबतीत त्यांचे दुर्लक्ष होऊ नये यासाठीही साहाय्यक ठरविण्यात आले आहेत.
१५ पालकांकडून मुलांना वाईट वागणूक मिळणे व दुर्लक्ष होणे यापासून त्यांचे संरक्षण करणे याबद्दल ख्रिस्ती पालकांचा कसलाही आक्षेप नाही. तरीपण मुलांकडे दुर्लक्ष करण्याविरुद्धचे कायदे आणि वर नमूद केलेले सर्वोच्च न्यायालयाचे विधान या गोष्टी बहुधा यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांचा समावेश असणाऱ्या प्रकरणांसाठी चुकीने संदर्भ म्हणून वापरल्या जातात. ते का? कारण साक्षीदार पालकांना आपल्या मुलांना “हुतात्मे” बनविण्याची मुळीच इच्छा नाही, कारण असती तर, त्यांनी मुलांना इस्पितळात उपचारासाठी नेलेच कसे असते? उलटपक्षी, साक्षीदार पालक मुलांसाठी स्वेच्छेने वैद्यकीय इलाज शोधीत असतात. त्यांची आपल्या मुलांवर प्रीती आहे आणि त्यांना उत्तम आरोग्य असावे अशीही त्यांची मनोमन इच्छा असते. पण आपल्या मुलांसाठी कोणता वैद्यकीय इलाज सर्वोत्तम आहे हे ठरविण्याचे त्यांच्यावर देव-प्रणीत कर्तव्य आहे असे ते मानतात. मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निदान रक्ताशिवाय व्हावे अशी त्यांची इच्छा असते. अशी ही रक्तहीन पर्यायी योजना रक्तापेक्षा चांगली व सुरक्षित आहे इतकेच त्यात नसून अधिक महत्त्वाचे म्हणजे ते त्यांच्या मुलांना यहोवा देव या थोर जीवनदात्याच्या मर्जीत ठेवते.
१६ रक्तहीन वैद्यकीय इलाजाचे फायदे असताना देखील पुष्कळ डॉक्टर्स व बाल-कल्याण संस्था यांना संक्रमण पद्धत हाच दर्जेदार इलाज किंबहुना विशिष्ट परिस्थितीत जीवन वाचविणारा उपाय वाटतो. या कारणास्तव, साक्षीदार पालक जेव्हा शिफारस करण्यात आलेल्या संक्रमणाला आपला नकार देतात अशावेळी समस्या उद्भवते. सर्वसाधारणपणे, डॉक्टरांना पालकांच्या संमतीशिवाय मुलांना कायदेशीरपणे इलाज करता येत नाही. रक्त वापरण्यास पालकांची संमती नाही म्हणून डॉक्टर्स व इस्पितळातील अधिकारी, न्यायाधीशांकडून न्यायालयाच्या आदेशाच्या रुपात ही संमती मिळवतात. असा हा कोर्टाच्या अधिकाराच्या संमतीचा दस्तऐवज, ठरवलेल्या वैद्यकीय इलाजात हेळसांड होत आहे असे वाटणाऱ्या व त्यापासून मुलांची सुटका करण्याचा मानस राखणारे बाल-कल्याण अधिकारी, किंवा डॉक्टर्स किंवा इस्पितळाचे अधिकारी यांच्याकडे पाहण्यास मिळू शकेल व तो मिळवता येईल.a
१७ कधी कधी रक्ताचा उपयोग करण्याबद्दलचा न्यायालयाचा आदेश इतक्या त्वरित मिळतो की, त्याबद्दल पालकांना अगाऊ सूचनाही दिली जात नाही किंवा क्वचितच मिळते. या गोष्टीला हाताशी धरुन डॉक्टर्स, इस्पितळ अधिकारी किंवा बाल-कल्याण संस्थांचे अधिकारी याचे समर्थन करतात की, एवढ्या त्वरेने आदेश मिळवण्याचे कारण तातडीची परिस्थिती उद्भवली होती आणि काय घडत आहे ते पालकांना कळविण्यासाठी वेळ नव्हता. पण जेव्हा चौकशी झाली तेव्हा डॉक्टरांना कबूल करावे लागले की, तशी खरी आणिबाणी नव्हती आणि त्यांना वाटले की, भविष्यात त्यांच्या मते “कधी गरज लागलीच” तर हाताशी तो न्यायालयाचा आदेश राहावा. मुलांचा संभाळ करणारे पालक या अर्थी तुम्हाला डॉक्टर्स, इस्पितळ अधिकारी, किंवा बाल-कल्याण संस्थांचे अधिकारी तुमच्या मुलासंबंधाने सर्वदा काय करीत आहेत याबद्दल जाणून घेण्याचा हक्क आहे. कायद्यात हे सदर आहे की, न्यायालयाचा आदेश मिळवला जात आहे याबद्दल तुम्हाला शक्यतो कळवले जाण्यास हवे; आणि तुम्ही न्यायालयापुढे आपली प्रतिवादी बाजू मांडली पाहिजे.
१८ या कायदेशीर वास्तवता सहकार्य देणाऱ्या डॉक्टरांना शोधून काढण्याचे मूल्य ठळकपणे सांगतात. त्यांच्यासोबत काम करा; तसेच इस्पितळांशी संपर्क ठेवणाऱ्या समितीच्या सदस्यांच्या मदतीने त्यांना तुमच्या मुलाला रक्तहीन इलाज देण्यात मदत करा किंवा अशा डॉक्टरांकडे किंवा इस्पितळाकडे तुमच्या मुलाला स्थलांतरित करा जेथे तसे उपचार त्याला मिळू शकतील. तुम्हाला असा संकेत दिसतो की, डॉक्टर, इस्पितळाचे अधिकारी किंवा बाल-कल्याण संस्था न्यायालयाकडून आदेश मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर तुम्ही त्यांना स्पष्टपणे विचारावे की, अशी योजना आखली जात आहे का. कारण कधीकधी हे गुप्तपणे टेलिफोनवर केले जाते. न्यायालयाकडे जाण्याची त्यांची योजना आहे तर यावर भर द्या की, त्यांनी तुम्हाला ते कळवले पाहिजे, म्हणजे तुम्हाला न्यायालयाला आपली देखील बाजू सादर करता येईल. (नीती. १८:१७) वेळ आहे तर कोणा वकिलाची मदत घेणे व्यवहार्य ठरू शकते. काही प्रसंगी न्यायालय वकिलांची नियुक्ती करते. तुमचा स्वतःचा किंवा न्यायालयाने नियुक्त केलेला वकील असला तर संस्थेमधील कायदेशीर गोष्टींचे खाते या वकिलाला काही माहिती देऊ शकतील, ज्यामुळे त्याला आपले समर्थन त्या परिस्थितीत उचितपणे मांडता येऊ शकेल.
१९ तुम्ही रक्ताला देत असलेल्या नकाराचे प्रकरण न्यायालयात आले तर, मुलाचे जीवन किंवा आरोग्य राखावे यासाठी रक्त जरुरीचे आहे हे डॉक्टरांचे मत अधिक मनधरणी करणारे ठरू शकते. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन न्यायाधीश बहुधा अनुकूल निर्णय देतात. जेव्हा पालकांना आपली बाजू सादर करण्यासाठी थोडीबहुत किंवा काहीच संधि दिली जात नाही तेव्हा हे खासपणे खरे ठरते. आणि डॉक्टरांना कोणतेही आव्हान न देता आपली बाजू, म्हणजे रक्ताची केवढी “तातडीची” गरज आहे हा दावा प्रस्तुत करण्याचा वाव देण्यात येतो. अशाप्रकारे एकतर्फी हाताळणीमुळे सत्याला निश्चित ठरवता येत नाही. डॉक्टर्स रक्ताची गरज असल्याचे का व जेव्हा म्हणतात ते बहुधा कोणा दबावाखाली असणारे व अनिश्चित असते. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण जेव्हा एखादे डॉक्टर म्हणतात की, मुलाचे जीवन वाचविण्यासाठी रक्ताची अगदीच गरज आहे, तेव्हा तीच वैद्यकीय समस्या रक्ताशिवाय हाताळू शकणारे दुसरे अनुभव डॉक्टर स्पष्ट सांगतील की, येथे रुग्णाला रक्त देण्याची आवश्यकता नाही.
२० न्यायाधिशाने तुम्हाला विचारले की हे “जीवनदायी” संक्रमण घेण्यास तुम्ही का नकार देता, तेव्हा तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला कदाचित वाटेल की, आपण पुनरुत्थानावरील विश्वास त्यांना विवेचीत करावा व म्हणून तुम्ही म्हणाल की, मूल जरी मेले तरी माझा दृढ विश्वास आहे की, देव त्याला परत उठवील. पण या उत्तरामुळे न्यायाधिशाचे समाधान होऊ शकणार नाही. कारण मुलाचे शारीरिक कल्याण व्हावे हा त्यांच्यासमोर सर्वात मोठा विषय असतो. या कारणामुळे तुम्ही धर्मवेडे आहात असा निष्कर्ष ते काढतील व यासाठीच तुमच्या मुलाचे रक्षण करता यावे म्हणून आपण स्वतः पाऊल उचलले पाहिजे असे ते ठरवतील.
२१ वस्तुतः न्यायालयाला याची खात्री करायची असते की, तुम्ही जरी तुमच्या प्रगाढ धार्मिक कारणामुळे रक्ताबद्दलचा नकार दर्शवीत असला तरी तुम्ही वैद्यकीय इलाजाचा अव्हेर करीत नाही. न्यायाधिशाने तुमच्या बाबतीत दुर्लक्ष करणारा किंवा वाईट वागणूकीचा पालक नव्हे तर कर्तव्यदक्ष व मुलाची काळजी असणारा पालक असे पाहिले पाहिजे. तुम्हाला एवढेच वाटत असते की, जरी रक्तापासून काही “फायदे” आहेत असे दाव्याने सांगितले जाते तरी त्याद्वारे निर्माण होणारे घातक परिणाम व गुंतागुंती तर, वैद्यकीय औषधी पर्याय उपलब्ध असताना ते न केल्यामुळे, अधिक वरचढ आहेत.
२२ जी परिस्थिती असेल त्यावर अवलंबून तुम्ही न्यायाधिशांना कळवू शकाल की, रक्त हवे आहे हे या डॉक्टरांचे मत आहे, पण डॉक्टरांची याबद्दल विविध मते असतात. या कारणास्तव, आपल्याला असा डॉक्टर मिळायला हवा आहे, जो उपलब्ध असणाऱ्या रक्तहीन उपचार-व्यवस्थेचा उपयोग करून आपल्या मुलाचा इलाज करील. इस्पितळाशी संपर्क ठेवणाऱ्या समितीकडून तुम्हाला अद्यापपावेतो, तुमच्या मुलाला रक्ताविना इलाज करू शकणाऱ्या डॉक्टरचे नाव मिळाले असेल, जो कदाचित, दूरध्वनीने का होईना, न्यायालयाला उपयुक्त साक्ष देऊ शकेल. कदाचित इस्पितळाचा संपर्क ठेवणारी समिती न्यायाधिशांना तसेच न्यायालयीन आदेशाची मागणी करणाऱ्या डॉक्टरांना असे काही वैद्यकीय लेख दाखवू शकतील, जे रक्ताच्या वापराशिवाय तुमच्या मुलाची वैद्यकीय समस्या कशी निवारण करता येईल याची माहिती देऊ शकतील.
२३ न्यायाधिशांना कोर्टाचा आदेश घाईने काढण्याचे सांगितले जाते तेव्हा रक्ताचे असणारे धोके म्हणजे एडस्, हत्तीरोग आणि इतर घातक गोष्टी यांचा विचार होत नसतो किंवा बहुधा यांचे त्यांना स्मरण दिले जात नाही. तुम्ही न्यायाधिशांना हे दाखवू शकता. तसेच तुम्ही त्यांना हेही कळवू शकता की, एक ख्रिस्ती पालक या नात्याने तुम्ही, जीवाचे पोषण व्हावे म्हणून दुसऱ्या कोणाचे रक्त देणे हे देवाच्या नियमाचा कटुपणे भंग करणे आहे असे मानता आणि मुलाला जबरीने रक्त देणे ही गोष्ट त्याच्यावर बलात्कार करण्यासारखे आहे. तुम्ही व तुमचा मुलगा (तो स्वतःची मते बोलून दाखवण्याएवढा मोठा असल्यास) दोघेही, शरीरावर होणाऱ्या अतिक्रमणाचा तुम्हाला केवढा वीट वाटतो ते सांगू शकता आणि न्यायाधिशांना आदेश न देण्याचे अपील करू शकता व विनंती करू शकता की, मुलाला पर्यायी औषधी इलाज देण्याची संमती मिळावी.
२४ तुम्ही योग्यपणे समर्थन मांडल्यास, न्यायाधिशांना दुसरी बाजू—तुमची—पालक या नात्याची बाजू चांगली दिसू शकते. मग, ते संक्रमणाला लागलेच संमती देण्याचे आवरुन धरतील. काही प्रकरणात न्यायाधिशांनी डॉक्टरांच्या स्वातंत्र्यावर कडक बंधन घातले आणि त्यांना प्रथम पर्यायी इलाज करण्याचे सांगितले, नाहीतर रक्ताविना इलाज करणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरांचा शोध पालकांना घेण्याची मुभा मिळावी असे सांगितले.
२५ जे संक्रमणाची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात अशांपुढे आपण आपल्या विश्वासात डळमळीत होत आहोत असे कधीही दाखवून देऊ नये. न्यायाधीश (आणि डॉक्टर्स) कधी कधी पालकांना विचारतात की, तुमच्या विवेकाला त्रास होऊ नये आणि आम्हालाही आमचे काम सोपे व्हावे म्हणून संक्रमित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर “स्थलांतरित” करता का. पण अशावेळीही तुम्ही सर्वांपुढे हे स्पष्ट रुपात सांगितले पाहिजे की, पालक या नात्याने तुम्हाला संक्रमण टाळता येण्यासाठी जे काही करता येणे शक्य आहे ते करण्याची तुमची तयारी आहे. ही तुमची देव-प्रणीत जबाबदारी आहे. तिचे स्थानांतर होणे शक्य नाही.
२६ अशाप्रकारे, डॉक्टर्स व न्यायाधीश यांच्यासोबत बोलताना तुम्ही आपली भूमिका स्पष्ट व पटण्याच्या रुपात सांगितली पाहिजे. तुम्ही चांगले प्रयत्न करून देखील शेवटी न्यायालयाने आदेश दिला, तरीही तुम्ही त्या डॉक्टरांना संक्रमण न करण्याची गयावया करू शकता आणि पर्यायी इलाजासाठी आग्रह धरु शकता. त्यांनी वैद्यकीय लेखांचा विचार करून पहावा आणि या समस्येबद्दल इतर डॉक्टरांचा सल्ला विचारात घेण्यास त्यांची मनधरणी करा; म्हणजे संक्रमण टळू शकेल. कोणाचे ऐकणार नाही असे वाटणाऱ्या एकापेक्षा अधिक डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरबाहेर येऊन मोठ्या दिमाखाने सांगितले की, त्यांनी रक्ताचा वापर केला नाही. अशाप्रकारे, न्यायालयाने आदेश दिला असला तरी कधीच हार खाऊ नका!—पहा द वॉचटावर जून १५, १९९१ अंक, “वाचकांचे प्रश्न.”
२७ येशूने जे म्हटले ते लक्षात ठेवाः “मनुष्यांविषयी जपा; कारण ते तुम्हांस न्यायसभांच्या स्वाधीन करतील. . . . आणि देशाधिकारी व राजे यांस व विदेश्यांस साक्ष पटावी म्हणून तुम्हास त्यांजपुढे माझ्यामुळे नेतील.” अशा परिस्थितीत आमचे सांत्वन करण्यासाठी येशूने पुढे म्हटले की, अशा वेळी जे योग्य व लाभदायक आहे ते बोलण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करील.—मत्तय १०:१६-२०.
२८ “जो वचनाकडे लक्ष पुरवितो [“जो अंतर्दृष्टी दाखवतो,” न्यू.व.], त्याचे कल्याण होते.” (नीती. १६:२०) पालकहो, आपल्या मुलाचे आध्यात्मिक दृष्ट्या प्रदूषित असणाऱ्या रक्त संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती तयारी अगाऊपणे करा. (नीती. २२:३) मुलांनो, तुमचे पालक ही तयारी करीत असता त्यांच्या तालमीला प्रतिसाद द्या आणि ती आपल्या अंतःकरणी लावा. कुटुंब या नात्याने “रक्त अगदी सेवन करू नये,” असा दृढ निर्धार करा की, ज्याद्वारे यहोवाचा आशीर्वाद व संमती मिळून “तुमचे कल्याण होईल.”—अनु. १२:२३-२५.
[तळटीपा]
a केवळ जेव्हा आणिबाणीची वेळ चालू असते अशावेळी डॉक्टरांच्या मताने मुलाचे जीवन किंवा आरोग्य याला अनुलक्षून (रक्त संक्रमणाचा समावेश असणारा) त्वरित इलाज आवश्यक असेल तर तो पालक किंवा न्यायलयीन संमतीशिवाय कायदेशीरपणे केला जातो. अशा प्रकारच्या कायद्याने बहाल केलेल्या आणिबाणीच्या वेळी वापरण्याच्या शक्तीसाठी तो डॉक्टर हा अर्थातच जबाबदार ठरतो.