पुरुषांनी पुढे येऊन लायक बनावे यासाठी मदत देणे
या वर्षी जुलै ९ व १० तारखांना लोणावळा येथे भारतातील सर्व फिरत्या देखरेख्यांसोबत सभा झाली. या सभेला सव्वीस बांधव आणि बेथेल येथील सेवा खात्यातील चार बांधव उपस्थित राहिले होते. भारताच्या शाखा दप्तराचे काम पाहणारे तीन बांधव आणि ऑस्ट्रेलिया शाखा दप्तराचे संयोजक आणि भारतात या वर्षी मे ते जुलै या दरम्यान अंतरिम शाखा दप्तर कमिटी संयोजक म्हणून राहिलेल्या बंधू व्ही. मौर्टीझ यांनी शिक्षक म्हणून काम केले.
२ चर्चेला घेण्यात आलेल्या अनेक विषयांमध्ये एक, आमच्या बांधवांना मंडळीतील अधिक जबाबदाऱ्या घेण्यासाठी पोहंचण्यास व पात्र ठरण्यात मदत देणे हा होता. १ले करिंथकर ३:६ मध्ये पौलाने म्हटले की, मानवांनी रोविलेल्या व पाणी घातलेल्या बीजाची देव वाढ करतो. हे तत्त्व प्राथमिकरित्या शिष्य बनविण्याच्या कामाला लागू होणारे असले तरी तेच मंडळीमध्ये लागू होऊ शकते. मेंढरासमान लोकांना यहोवासोबत संमतीकारक नातेसबंधात येण्यासाठी मानवी मदतीची तसेच देवाच्या पृथ्वीवरील संघटनेची गरज आहे. याचप्रमाणे मंडळीतील बांधवांना सेवेच्या विशेष हक्कासाठी पात्र होण्याकरता मदतीची गरज आहे.
३ तुम्हाला मदत करता येईल त्या मार्गाबद्दल दक्ष असा: कोणी पुरुष देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करतो तेव्हा ही “स्तुतीपात्र” गोष्ट आहे. (१ तीम. ३:१, फिलिप्स) वडील या नात्याने सेवा करणाऱ्या बांधवांनी मंडळीतील तरुण व नव्या बांधवांच्या संभाव्यतेबद्दल जाण ठेवावी आणि अशांना पात्र ठरण्यासाठी मदत तसेच उत्तेजन द्यावे. अशा तरुण बांधवांनी कोणा साहाय्याविना प्रगति करावी ही अपेक्षा धरुन त्यांना थांबून राहता येणार नाही. अशा बांधवांनी पुढे यावे म्हणून तुमच्या मंडळीत तुम्हाला अधिक करता येऊ शकेल का?
४ वडील व उपाध्य सेवकांच्या गुणविषेशतांची चर्चा केल्यावर १ ले तीमथ्यी ३ऱ्या अध्यायातील १० वे वचन सांगते की, ‘अदूष्य ठरणाऱ्या’ पुरुषांची निवड व्हावी. याचा हा अर्थ नव्हे की, वडील आपले ‘आरामात बसून’ इतर बांधवांच्या वर्तणूकीची छानणी करतील. चांगले स्थान असणाऱ्या सर्व बांधवांना काही कामे नेमून देऊन ती ते जाणीवपूर्वकपणे पार पाडतात का हे त्यांनी बघावे. अशांना काही व्यक्तिगत ध्येये प्राप्त करण्याचे नेमून द्यावेः एखादा पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे, साहाय्यक किंवा नियमित पायनियरींग करणे, सबंध पवित्र शास्त्र वाचून काढणे इत्यादि. मग वडील त्यांची प्रगति आणि त्यांचे “अदूष्य”पण याबद्दलची उजळणी करू शकतात. विभागीय देखरेख्यांबरोबरच्या भेटीत त्यांनी मंडळीतील प्रत्येक पुरुष सदस्याची चर्चा करावी व तो त्या हक्कासाठी पात्र आहे का ते बघावे आणि नसल्यास त्याला ती पात्रता मिळविण्यासाठी कोणती मदत करता येईल ते बघावे.
५ बांधव प्रगति दाखवू लागतात तेव्हा अशांना जाहीर वक्ते, उपाध्य सेवक किंवा वडील बनण्यापासून अनावश्यकपणे मागे ठेवले जात नाही याबद्दलची काळजी घ्यावी. वडील अशांच्या गुणविशेषतांची उजळणी करतेवेळी त्यांच्यामध्ये परिपूर्णता अपेक्षिणार नाही, कारण वस्तुतः आपण कोणीच परिपूर्ण नाही. (स्तोत्र. १३०:३) त्या बंधूची एकदंरीत जीवनशैली शास्त्रवचनाच्या सहमतात आहे आणि त्याचा ज्या हक्काबद्दल विचार होत आहे त्यासाठी आवश्यक असणारी क्षमता, गुणवत्ता व अनुभव त्यामध्ये काही प्रमाणात आहे का हे ते बघतील. अर्थातच, याचा हा अर्थ नाही की, शास्त्रवचनीय गुणविशेषतांकडे दुर्लक्ष होण्यास हवे.
६ विशीच्या उत्तरार्धात असणारे आणि काही वर्षे उपाध्य सेवक म्हणून काम केलेल्या बंधूंना वडील बनण्याची शिफारस करण्यामध्ये हेळसांड होऊ नये. कधी कधी आपण अशा बांधवाला भेटतो की, जो उपाध्य सेवक आणि बदली वडील म्हणून कित्येक वर्षे विश्वासूपणे सेवा करीत राहिला आहे; त्याच्याठायी गंभीर अशा अपात्रता नाहीत, तरी त्याची वडील म्हणून शिफारस केली गेली नाही. अशा व्यक्तींनी पुढे यावे असे आम्हाला वाटते. त्यांची वाढ होण्यात मदत द्या. त्यांना वाढती जबाबदारी द्या आणि ती ते व्यवहार्यपणे पूर्ण करीत आहेत असे दिसते तर सेवेच्या पुढच्या हक्कासाठी अशांची शिफारस करा. मंडळीत अधिक लायक बंधू सेवा करीत राहणे हे मंडळीच्या लाभाचे असते इतकेच नसून ते वाढीला आणि मग यहोवाच्या नामाचे गौरव करण्यासाठी परिणामित होणारे आहे.—स्तोत्र. १०७:३२.