ऑक्टोबरसाठी सेवा सभा
ऑक्टोबर १२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ८४ (३०)
१५ मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. “आस्था पुन्हा प्रज्वलित केली जाऊ शकते का?” या लेखावर चर्चा करा आणि अशी भेट कशी घेता येऊ शकते याबद्दल एक त्रोटक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: “निर्माणकर्त्या देवाचे गौरव करा.” लेखाची प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ४ मध्ये ज्या प्रकाशनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामधून अनुभव सांगू देण्यासाठी उदाहरणशील युवकांची आधीच योजना करा, आणि परिच्छेद ५ मध्ये देण्यात आलेला अनुभव दुसरा कोणी प्रचारक सांगू शकतो. हे महत्त्वपूर्ण पुस्तक सादर करण्यात चाणाक्षपणा वापरावा यावर अधिक भर द्या.
१५ मि: “आस्था चेतविणाऱ्या प्रस्तावना.” तुमच्या स्थानिक क्षेत्रात दाखवलेल्या प्रस्तावांचा कसा अवलंब होऊ शकेल त्याबद्दल मंडळीसाबत चर्चा करा. दोन किंवा तीन खरी, तयार केलेली प्रात्यक्षिके आयोजित करा.
गीत ९६ (७२) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ७९ (५०)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल तसेच अनुदानाची पोच यांचा समावेश करा. स्थानिक गरजेसाठी तसेच संस्थेच्या जागतिक कामासाठी दिलेल्या आर्थिक साहाय्याबद्दल मंडळीची प्रशंसा करा. वेळ मिळेल तसा क्रिएशन पुस्तक सादर करण्याबद्दल आधीच तयार करून ठेवलेले अनुभव सांगण्यास वाव द्या.
२० मि: “तुमच्या मुलांना रक्ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे.” वडील पुरवणीतील या विषयावर परिच्छेद १ ते ११ वर भाषण देतात. परिच्छेद ५-७ मध्ये दाखविण्यात आलेल्या परिस्थितीमध्ये एखाद्या डॉक्टरने मुलावर इलाज करण्याबद्दल पालकांनी दिलेली संमती ही हातमिळवणी आहे असे समजण्याचे कारण नाही हे स्पष्ट करा.
१५ मि: “परत भेट घेण्याची खात्री करा.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या माहितीवर चांगली तयारी केलेले एक प्रात्यक्षिक तयार करा. या महिन्यात आरंभाला ज्या ज्या लोकांच्या भेटी घडल्या अशा आस्थेवाईकांची पुनर्भेट घेण्याची गरज ठळकपणे प्रस्तुत करा.
गीत १० (१८) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२५ (४४)
५ मि: स्थानिक घोषणा. स्थानिक क्षेत्रावरील एक त्रोटक अनुभव कथन करा किंवा या आठवडी क्षेत्रकार्यात कोणते बोलके मुद्दे वापरता येतील ते सांगा.
१५ मि: “तुमच्या मुलांना रक्ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे.” परिच्छेद १२-२८ पर्यंत परिच्छेदांची प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. परिच्छेद १२ व २० मध्ये देण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मुलांच्या वैद्यकीय इलाजाबद्दल अगाऊपणेच काळजी घेणे संक्रमण टाळण्यातील यशाची गुरुकिल्ली आहे हे जोर देऊन स्पष्ट करा.
१५ मि: “पुरुषांनी पुढे येऊन लायक बनावे यासाठी मदत देणे.” प्रश्नोत्तरे. स्थानिक मंडळीत जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी बांधवांना कशी प्रगति करता येईल याबद्दलचे व्यावहारिक मार्ग दाखवा.
१० मि: मंडळीच्या कार्यहालचालीची उजळणी करणे. सप्टेंबरच्या सुरवातीला संस्थेला पाठविलेल्या काँग्रिगेशन ॲनलिसिस रिपोर्ट (एस-१०) वरील मुखपृष्ठावर असणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर अध्यक्षीय देखरेखे व सेवा देखरेखे मंडळीच्या गतवर्षीच्या कार्यहालचालीची चर्चा करतात. प्रचारक व पायनियरांनी सेवा कार्यात दिलेले स्वार्थत्यागी स्वरुपाचे प्रयत्न व विश्वासूपणे सभांना दाखवलेली उपस्थिती याबद्दल त्यांची उबदार प्रशंसा करा. त्यांनी जेथे उत्तम प्रगति साध्य केली तिचा खासपणे उल्लेख करा. याच्या आधीचा मंडळीचा कार्य अहवाल उपलब्ध असल्यास त्यावर तुलना करता येईल. तसेच १९९३ या कार्यवर्षात कोठे सुधारणा करता येईल ती क्षेत्रे सांगा.
गीत ४३ (११) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ५१ (२४)
१५ मि: स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. क्षेत्रकार्यासाठी कोणती मासिके उपलब्ध आहेत त्याची घोषणा करा आणि एक किंवा दोन असे बोलके मुद्दे प्रस्तुत करा की, स्थानिकरित्या लागू होऊ शकतील. शास्त्रवचनीय सादरता प्रस्तुत करून अलिकडील मासिके कशी सादर करता येतील त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. ती शास्त्रवचनीय सादरता मासिकाच्या पाठीमागच्या पानावरील वरील बाजूस आहे.
१५ मि: “बाप्तिस्मा,” रिझनिंग पुस्तक, पृ. ५४-८. “व्याख्या” या सदरावर प्रास्ताविक भाषण. बाप्तिस्मा घेण्यास कोणी माघार घेतली आहे अशा कोणासोबत एखादा वडील कसे बोलेल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. पृष्ठ ५४ वरील माहिती ठळकपणे मांडा. समर्पण करणे व त्याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेणे याच्या महत्त्वावर भर द्या. वक्ता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, मृतांचा बाप्तिस्मा, आणि अग्नीचा बाप्तिस्मा यावर त्रोटकपणे बोलून समारोप करतो.
१५ मि: नोव्हेंबरमध्ये मासिके सादर करा. अवेक! तसेच द वॉचटावर मासिकांचे मूल्य ठळकपणे मांडणारे त्रोटक भाषण. आलेल्या नव्या अंकांचे वाचन प्रचारकांनी उत्साहपूर्वकतेने केले पाहिजे म्हणजे ती इतरांना सादर करताना आणि वर्गणीबद्दल सांगताना उत्साहाने बोलता येईल. प्रचारकांना मासिके कशी सादर करता येतील आणि पुढील अंक आल्यावर त्याला सोबत घेऊन ते त्या घरमालकाला देऊन मासिक मार्ग कसा तयार करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ४८ (२८) व समाप्तीची प्रार्थना.