वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९२ पृ. १
  • निर्माणकर्त्या देवाचे गौरव करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निर्माणकर्त्या देवाचे गौरव करा
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या घडवणाऱ्‍याला सन्मान देण्यासाठी इतरांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • सर्व गोष्टी घडविणाऱ्‍या निर्मात्याचा सन्मान करा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • निर्मितीवरील माझ्या विश्‍वासाचे मी समर्थन कसे करू शकतो?
    सावध राहा!—२००६
  • परत भेट घेण्याची खात्री करा
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km १०/९२ पृ. १

निर्माणकर्त्या देवाचे गौरव करा

१ रमणीय भूप्रदेश, रंगीत सूर्यास्त, ताऱ्‍यांनी भरलेले आकाश, पक्ष्यांची मधूर गाणी—या सर्व सुंदर गोष्टींचे श्रेय तुम्ही कोणाला देता? होय, आम्हा सर्वांनाच निर्माणकर्त्या देवाची स्तुति करण्याची चालना मिळते. प्रकटीकरण ४:११ मध्ये जी घोषणा देण्यात आलेली आहे तिच्यासोबत आम्ही पूर्ण अंतःकरणाने सहमत आहोत. सर्व गोष्टींची निर्मिती करण्याच्या कारणावरुन यहोवा देव आमच्या स्तुतीचा पात्र आहे.

२ देवाच्या निर्मिती कार्याचा एवढा भरपूर पुरावा असताना लोकांनी ही विचारधारा अंगिकारली आहे की, जीवन हे आकस्मिकपणे अंध अशा उत्क्रांतीने सामोरे आले. या प्रचंड लबाडीने लोकांना मानहानीकारक व नीतीभ्रष्ट बनविले आहे आणि हा आमच्या थोर निर्मात्यावर अत्यंत निंद्य असा आरोप थोपला आहे.—उप. १२:१; रोम. १:२०, २५.

३ आपल्याला यहोवाचे निष्ठावंत सेवक या नात्याने आक्टोबरमध्ये आमचा निर्माणकर्ता व त्याची अद्‌भूत कार्ये याबद्दलचे सत्य प्रस्तुत करण्याची संधि आहे. ज्यांना जीवनाचा आरंभ व उद्देश जाणून घेण्यात खरी आस्था आहे अशांना लाईफ—हाव डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? हे पुस्तक सादर करायचे आहे. जीवनाच्या मूळ उगमाच्या सत्याबद्दल धैर्याने समर्थन करण्यात हे पुस्तक आम्हाला सज्ज करते.

४ खास क्षेत्रे: उत्क्रांती वा निर्मिती या विषयाबद्दल रस वाटणाऱ्‍या लोकांची घरोघरच्या साक्षीकार्यात भेट घेण्याव्यतिरिक्‍त आपण अशा लोकांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा शाळेतही भेट देऊ शकतो. काही तरुण साक्षीदारांनी आपल्या शिक्षकांना हे क्रिएशन पुस्तक दाखवले तेव्हा ते त्यांना सादर करण्यात चांगले यश मिळाले. एका युवक साक्षीदाराने आपल्या शिक्षिकेस हे क्रिएशन पुस्तक दिले आणि जेव्हा असे दिसले की, तिच्या या शिक्षिकेने या पुस्तकाचा कसून अभ्यास केला इतकेच नाही तर तिने वर्गाला शिकवण्यासाठी या पुस्तकाचा वापर सुरु केला आहे तेव्हा तिला खरेच आश्‍चर्य वाटले. (वॉ.९० ९/१ पृ. ३२; वॉ.८६ १०/१ पृ. ३२) यास्तव, तुम्ही देखील, तुमच्या ज्या शिक्षक व विद्यार्थीमित्रांना हे पुस्तक वाचण्यास आवडेल असे तुम्हाला वाटते अशांना का भेटू नये.

५ तुमच्या क्षेत्रात राहणाऱ्‍या कॉलेज विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना भेटण्याचा खास प्रयत्न करता येईल. क्रिएशन पुस्तकात आढळणारे गाढ संशोधन व माहितीचे भांडार याबद्दल वकील आणि डॉक्टर्स अशा व्यावसायिक लोकांनी खूप रसिकता दाखवली आहे. (yb८७ पृ. ५४) ज्यांची तुम्ही भेट घ्याल अशांना देखील सुंदर चित्रे असणारे हे प्रकाशन आपल्या माहिती व संदर्भासाठी ठेवून घेण्याची इच्छा होईल.

६ अर्थात, आपणाला भेट देणाऱ्‍या प्रत्येकाला आपण हे क्रिएशन पुस्तक सादर करणार नाही, कारण पुष्कळांना या विषयाबद्दल रस वाटत नाही. अशा लोकांना, तुम्हाला त्यांना अपील होऊ शकतील असे वाटते ते इतर प्रकाशन किंवा मासिके देता येतील. पण जेव्हा तुम्ही क्रिएशन पुस्तकातून शैक्षणिक स्वरुपाचा आणि निर्माणकर्त्यावर विश्‍वास वाढवणारा एखादा किंवा अधिक विशिष्ट मुद्यांची चर्चा कराल तेव्हा सरळ मनोदय राखणाऱ्‍या लोकांना अधिक शिकून घेण्याची इच्छा आहे हे तुम्हाला त्यामधून दिसून येईल. अशा लोकांनाच आम्ही हे क्रिएशन पुस्तक सादर करू या.

७ या सुंदर प्रकाशनामुळे, उत्क्रांती हे तत्त्व केवढे हास्यास्पद आहे एवढेच नाही तर जीवनाच्या देणगीबद्दल अधिक कदर वाढविण्यात पुष्कळांना साहाय्य मिळो. हे पुस्तक त्यांच्यामध्ये जीवनदाता आणि ‘आकाश व पृथ्वी यांचा निर्माता’ याचे गौरव करण्यासाठी सदासर्वकाळ राहण्याची इच्छा प्रज्वलित करू शकेल.—स्तोत्र. १४६:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा