वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९२ पृ. २
  • एप्रिलसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिलसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • उपशिर्षक
  • एप्रिल ६ ने सुरु होणारा सप्ताह
  • एप्रिल १३ ने सुरु होणारा सप्ताह
  • एप्रिल २० ने सुरु होणारा सप्ताह
  • एप्रिल २७ ने सुरु होणारा सप्ताह
  • मे ४ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९२
km ४/९२ पृ. २

एप्रिलसाठी सेवा सभा

एप्रिल ६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १३९ (७४)

१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. या शनिवारी मासिक कार्यासाठी वापरता येतील असे अलिकडील मासिकातील लेख ठळकपणे दाखवा. स्मारकविधी दरम्यान आयोजित केलेल्या खास क्षेत्रकार्यासंबंधाने अधिक जोर देऊन सांगा.

२० मि: “यहोवाची कृत्ये विदीत करा” लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. एप्रिल हा महिना सर्वांनी कार्यहालचालीचा खास महिना करावा असे उबदार उत्तेजन द्या.

१५ मि: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” अध्यक्षीय देखरेख्यांचे भाषण व सभागृहाची सहभागिता. चौकोनातील मजकूराचा समावेश करा. बंधूंना, स्मारकविधीच्या निमंत्रणाचा सुयोग्य वापर करून सर्व आस्थेवाईक लोकांना निमंत्रित करण्याचे हरप्रयत्न करण्याचे उत्तेजन द्या.

गीत १५ (९८) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १०१ (२३)

१० मिः स्थानिक घोषणा. मे महिन्यात साहाय्यक पायनियरींग करण्याची योजना करणाऱ्‍यांनी अर्ज घेऊन ते त्वरित भरुन देण्याचे उत्तेजन द्या.

२० मिः “आमच्या क्षेत्रातील युवकांना मदत करणे.” प्रश्‍नोत्तराने लेख हाताळावा. यंग पीपल आस्क पुस्तकाची सादरता करताना स्थानिकरित्या व्यावहारिक असणाऱ्‍या एका सादरतेस ठळकपणे मांडा. सर्वसाधारण आक्षेपांवर कशी मात करता येईल याबद्दलचे एक त्रोटक प्रात्यक्षिक दाखवा. घरमालकाने जर म्हटले की, ‘मला माझा स्वतःचा धर्म आहे,’ तर तुम्हाला कुशलतेने विचारता येईलः ‘युवकांना आज ज्या समस्या भेडसावत आहेत त्याबद्दल तुमच्या चर्चमध्ये अलिकडे काही चर्चा झाली का?’ हे संभाषण यिर्मया १०:२३च्या वाचनाकडे निरवा. आणखी एक प्रश्‍न असा विचारला जाऊ शकतोः ‘मादक औषधांचे सेवन तसेच त्याचा ख्रिस्ती युवकांवर होणारा परिणाम याबद्दल तुमचे चर्च काय म्हणते?’

१५ मिः “प्रतिसाद देणाऱ्‍या सादरता.” अनुभवी वडील आणि दोन वा तीन पायनियर आणि/किंवा प्रचारकांतील चर्चा. स्थानिक क्षेत्रात व्यावहारिक ठरणाऱ्‍या वेगवेगळ्या पवित्र्यांबद्दल विचार करा.

गीत १९ (२९) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २० ने सुरु होणारा सप्ताह

गीत १९७ (२२)

१० मिः स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल, आणि संस्थेकडून मिळालेल्या अनुदान पाचेपावतीची माहिती द्या. बंधुजनांनी अनुवाद १६:१७ चे अनुकरण करण्यात जे केले त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा.

१५ मिः “विलंब न लावता आस्थेचा मागोवा घ्या.” प्रश्‍नोत्तराद्वारे चर्चा.

२० मिः मे महिन्यात साहाय्यक पायनियरींग करण्याची योजना केलेल्या किंवा पूर्वी ती केलेल्या तीन किंवा चार प्रचारकांसोबत एक वडील चर्चा करतात. त्यांना पायनियरींग करण्याची चालना कशामुळे मिळाली, त्यांनी मेसाठी कोणत्या योजना आखलेल्या आहेत, आणि पूर्वी साहाय्यक पायनियरींग करताना जे अनुभव आले त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती काढून घ्या. ज्यांना मे साठी साहाय्यक पायनियर म्हणून मंजूरी देण्यात आली आहे अशांची नावे घोषित करा.

गीत १२३ (६३) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १९३ (१०३)

१० मिः स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त. मे महिन्यात साहाय्यक पायनियरींग करून बघण्याचा विचार करण्याचे उत्तेजन द्या.

२० मिः “आस्था आणखी वाढविण्यासाठी मी काय म्हणू शकतो?” उत्तम तालीम केलेली दोन किंवा तीन प्रात्यक्षिके सादर करा. प्रत्येक सादरतेनंतर ती सादरता, घरमालकाची आस्था आणखी वाढविण्यासाठी प्रभावी आहे असे त्यांना का वाटते ते सभागृहाकडून काढून घ्या.

१५ मिः स्थानिक गरजा किंवा वॉचटावरच्या सप्टेंबर १५, १९९१ मधील “इलस्ट्रेशन्स—ए की टू रिचिंग हार्टस्‌” या लेखावर उत्स्फुर्त भाषण. अलिकडच्या सादरतेस अनुलक्षून कोणती उदाहरणे स्थानिक क्षेत्रात लागू होण्याजोगी अहेत ते सुचवा. (प्रादेशिक: “विश्‍वासू दास व त्याचे नियमन मंडळ.” टेहळणी बुरुज, ऑक्टोबर १, १९९०.)

गीत २१३ (८५) व समाप्तीची प्रार्थना.

मे ४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०९ (८४)

८ मिः स्थानिक घोषणा. सर्वांना मे व जून महिन्यातील वॉचटावर मासिकाच्या वार्षिक वर्गणी मोहिमेबद्दलची आठवण करून द्या. जेथे वर्गणी स्वीकारली जात नाही, पण खरी आस्था प्रदर्शित झाल्याचे दिसते तेथे दोन मासिके व कोणतेही एक माहितीपत्रक (स्कूल माहितीपत्रक सोडून) सादर करा.

१५ मिः वॉचटावरच्या नोव्हेंबर १, १९९१ अंकातील “डू यू ॲप्रीशिएट जेहोवाज्‌ अर्थ्‌ली ऑर्गनायझेशन?” लेखावर आधारित भाषण. मंडळीचा संस्थेवर विश्‍वास तसेच आत्मविश्‍वास वाढवा. (प्रादेशिक: “आजच्या नियमन मंडळाशी सहकार्य करणे.” टेहळणी बुरुज, ऑक्टोबर १, १९९०.)

१२ मिः रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ २९-३२ वरील “ॲन्सेस्टर वर्शिप” या विषयावर चर्चा. पाश्‍चिमात्य जगतात बहुतेक पूर्वजांची भक्‍ती करीत नाहीत असे जरी पुष्कळांचे म्हणणे असेल तरी आधुनिक समाजात मृतांना सन्मान देण्यासाठी पुष्कळ काही केले जाते. ते मृत अद्याप जिवंत आहे असे समजून काही लोक त्यांची भक्‍ती व सन्मान करतात. प्रसिद्ध व्यक्‍तींच्या मूर्त्या, चित्रे, व चरित्रवाड्‌.मय त्यांचे स्मरण घडवतात. एक बाप आपल्या मुलासोबत बोलत आहे या दृश्‍याची प्रस्तावना सादर करा. बाप रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ ३० वरील माहितीचा वापर करतो. पहिल्या दोन उपशिर्षकाखालील माहिती, भूतविद्येला चालना देणारे किंवा मृत लोक जिवंतांना पछाडण्यासाठी परत येतात या कल्पनेवर आधारलेले भीतीदायक चित्रपट पाहणे का धोक्याचे आहे ते स्पष्ट करण्यात वापरतो. मृतांची स्थिती व पुनरुत्थानाची आशा स्पष्ट करतो व यामुळे आमच्या मृतांबद्दलच्या दृष्टीकोणावर परिणाम घडला पाहिजे हे दाखवतो. मुलगा दुरात्मिक गोष्टींना चालना देणारे चित्रपट टाळण्याची इच्छा दर्शवतो.

१० मिः एप्रिलमधील यंग पीपल आस्क पुस्तकाच्या वितरणाचे अनुभव. प्रचारकांना वेळेनुसार काही निवडक व सकारात्मक अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करा.

गीत ७२ (५८) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा