विलंब न लावता आस्थेचा मागोवा घ्या
१ “जे आज करता येते ते उद्यावर टाकू नका.” ही म्हण पुष्कळांना परिचित असून ती आवश्यक गोष्टी त्वरेने उरकण्याची चालना देते. हे तत्त्व आपल्याला आमच्या सेवकपणात लागू करता येऊ शकते याची स्पष्टता पुढील अनुभवांद्वारे मिळते.
२ एका भगिनीने एका माणसाला पुस्तक दिले व परत येईन असे सांगितले. पण एका तासाने याच माणसाला दुसऱ्या भगिनीने चुकीने परत भेट दिली. तो माणूस ते पुस्तक हातात घेऊन आला व म्हणालाः “तुम्ही मला म्हटले होते की, परत याल, पण इतक्या लवकर याल हे मला वाटले नव्हते; तरी काही हरकत नाही. कृपया आत या. मी अभ्यासाला तयार आहे.”
३ इतक्या लवकर पुनर्भेट नेहमी घेतली जात नसली तरी हा अनुभव, आपण आमच्या सेवकपणात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या आस्थेचा मागोवा घेण्याबद्दल जागृत राहिले पाहिजे हे ठळकपणे सांगतो. एप्रिल महिन्यादरम्यान आपण यंग पीपल आस्क हे पुस्तक सादर करणार आहोत. आज जगातील युवकांमध्ये नष्ट होत असलेली मूल्ये बघून त्यांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी पवित्र शास्त्राच्या व्यावहारिक सल्ल्याची केवढी गरज आहे ते कळते. (२ तीमथ्य ३:१६, १७) यंग पीपल आस्क हे पुस्तक पवित्र शास्त्रावर आधारलेली उत्तरे घेऊनच सामोरे आलेले आहे व त्यातील उत्तरे खरीच कार्यवाहित आहेत!
४ लोकांना अधिक साहाय्याची गरज आहेः लोकांना या प्रकाशनातील माहिती समजण्यासाठी व ते त्यांच्या जीवनाशी व भवितव्याशी अद्ययावत असेच आहे याची रसिकता वाढवण्यासाठी आम्ही, पहिली भेट घेतल्यानंतर काही दिवसातच त्यांची पुनर्भेट घेण्याची व्यवस्था केली पाहिजे. हे आम्हाला कसे करता येईल? तुम्ही त्या माणसाकडे परत जाणार आहात हे त्याला सांगण्यामुळे त्याची आस्था केवढी आहे हे ठरविण्यात तुम्हाला मदत मिळेल.
५ पुनर्भेटीसाठी मार्ग तयार कराः सध्याच्या काळात एका विशिष्ट वेळी भेट ठरविणे हे नेहमीच सोपे नसते व शिवाय घरमालक या भेटीबद्दलचे स्मरण ठेवीलच असे नाही. तथापि, अशा पुनर्भेटीच्या वेळेची तुम्ही नोंद करून घेतली व शक्यतो काही दिवसातच ती भेट घेण्याची खात्री केली तर नियुक्त केलेली भेट घेण्यामध्ये तुम्ही गंभीरता दाखवीत आहात हे दिसून येईल. घरमालक घरी भेटला नाही तर त्याची भेट घेण्याचे पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही घरमालकाला शोधण्याचा निश्चयाने प्रयत्न करीत आहात हे जेव्हा त्याला दिसून येईल तेव्हा तो तुमच्या भेटीची नक्कीच कदर बाळगील.
६ आम्ही सुरवातीला भेट घेतो तेव्हा घरमालकाची किती आस्था आहे हे निश्चितपणे ठरवू शकत नसल्यामुळे, त्याने जरी साधारण काळजी व्यक्त केली असली तरी त्याच्याकडे पुन्हा जाण्यासाठी नोंद करून घ्या. अशा आस्थेचा विलंब न लावता मागोवा घेणे लाभदायक ठरू शकेल. तुम्ही त्या व्यक्तीची यंग पीपल आस्क पुस्तकाबद्दलची आस्था जागृत केलेली असल्यामुळे परत भेट घेतल्यावर हाच माणूस तुमचे केवढे चांगले स्वागत करतो ते पाहून तुम्हाला सुखद आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या कारणास्तव, विलंब न लावता आस्थेचा मागोवा घ्या!