आमच्या क्षेत्रातील युवकांना मदत करणे
१ युवकांना येणारे प्रश्न व त्यांच्यापुढे उभ्या राहणाऱ्या समस्या त्यांना गोंधळात टाकणाऱ्या आहेत. स्तोत्रकत्यार्न विचारलेः “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील?” दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, युवकांना गोंधळात टाकणाऱ्या समस्यांना कशाने व्यावहारिक मदत मिळू शकेल? त्या समस्या, ‘मी मादक पदार्थ व मद्यपान घ्यावे का?,’ ‘लग्नाआधीच्या लैंगिक समागमाबद्दल काय?,’ ‘मी कोणते जीवनध्येय निवडून घ्यावे?’ अशा आहेत. स्तोत्रकर्ता याचे उत्तर देऊन म्हणतोः “तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने.”—स्तोत्रसंहिता ११९:९.
२ होय, युवकांसाठी देवाचे वचन, पवित्र शास्त्र हे सल्लाप्राप्तीचा सर्वात उत्तम असा उगम आहे. ते का? कारण ते यहोवा देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे; आणि तो “तरुणपणाच्या प्रक्षुब्ध इच्छा” काय असतात ते चांगलेपणाने जाणून आहे. (२ तीमथ्य २:२२, फिलिप्स) पवित्र शास्त्र युवकांना आज भेडसावणाऱ्या कित्येक समस्यांच्या मुळाशीच जाते व त्यांना भावी काळाबद्दल चांगली आशा देते. पवित्र शास्त्राचा सल्ला आज अनुसरणाऱ्या हजारो ख्रिस्ती युवकांच्या जीवनातील खरे अनुभव याची प्रचिती देतात की, त्याचा सल्ला कार्यवाही आहे. आमच्या क्षेत्रातील युवकांना मदत देण्यासाठीच आम्ही एप्रिल दरम्यान क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क या पुस्तकाची सादरता करणार आहोत. हे पुस्तक युवकांना काळजीत पाडणाऱ्या बहुविध पैलूंचा आढावा घेते आणि त्यातील सल्ला पवित्र शास्त्रावर आधारलेला आहे!
३ युवकांना यंग पीपल आस्क पुस्तकाबद्दल काय वाटते? सोळा वर्षाची एक मुलगी म्हणतेः “मी अनुक्रमणिका बघितली तेव्हा जणू मी माझ्या स्वतःच्याच जीवनाकडे पाहात आहे असे मला दिसले. हेच प्रश्न मी पुष्कळदा मला स्वतःला वेळोवेळी विचारले होते.” आणखी एक पंधरा वर्षे वयाचा युवक म्हणालाः “मला वाचनाची आवड तशी पाहता नाही, पण मी हे पुस्तक हाती घेतले तेव्हा ते मला इतके आवडले की, ते संपूर्ण वाचूनच काढले, मी ते खाली ठेवलेच नाही.” प्रौढांनी देखील या पुस्तकाबद्दल आपली पसंती व्यक्त केली आहे. एका फिरत्या देखरेख्यांच्या बायकोने म्हटलेः “आम्हाला आमची मुले नाहीत, पण या पुस्तकातील साहित्य आम्हा दोघांनाही व्यावहारिक मोलाचे वाटले. खरे म्हणजे, या पुस्तकाला ‘क्वश्चन्स पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क!’ असेच नाव दिले जायला हवे.” यास्तव, हे यंग पीपल आस्क पुस्तक वाचून पुष्कळ जण आनंद व त्याकडून लाभ मिळवून घेत आहेत हे उघड आहे.
४ यंग पीपल आस्क हे पुस्तक प्रांजळपणे सर्वांना प्रस्तुत कराः एप्रिलमध्ये तुम्ही इतरांसोबत शास्त्रवचनीय चर्चा करीत असताना यंग पीपल आस्क हे पुस्तक युवक तसेच वयस्करांना सादर करण्यास मागेपुढे पाहू नका. पुस्तकाचा स्वीकार करणाऱ्या लोकांना सांगा की, पुस्तकाचे वाचन करताना जो भाग त्यांना कळत नसेल तो त्यांनी अधोरेखित करून ठेवावा आणि पुढल्या भेटीच्या वेळी परतल्यावर तुम्ही या मुद्यांची चर्चा त्यांच्याशी कराल. यामुळे पुनर्भेट घेण्यासाठी एक आधार मिळू शकेल.
५ घरोघरच्या कार्याशिवाय तुम्हाला हे यंग पीपल आस्क पुस्तक आपल्या नातेवाईकांना, परिचितांना व व्यावसायिक मित्रांना अनौपचारिकपणे सादर करता येऊ शकेल. या पुस्तकातील प्रबळ अशी रंगीत चित्रे, अनुक्रमणिका, युवकांच्या चिंतेचे त्यातील प्रश्न, प्रत्येक धड्याच्या शेवटाला देण्यात आलेले “क्वश्चन्स फॉर डिस्कशन” हे सदर किंवा तिरप्या अक्षरवळणात दिलेला मजकूर याचा तुम्हाला कसा व्यक्तीगत लाभ मिळाला हे त्यांना दाखवा. याखेरीज, आमची राज्य सेवा याच्या जानेवारी १९९१ अंकाच्या पृष्ठ ६ वर जे साहाय्यक प्रस्ताव सुचविण्यात आलेले आहेत त्यांचीही उजळणी तुम्हास करावीशी वाटेल.
६ आज युवकांना मदत देण्यासाठी तसेच पवित्र शास्त्रतील व्यावहारिक सूज्ञानाची आवड असणाऱ्या सर्वांना देवाने आपल्या माध्यमाद्वारे हे जे प्रकाशन उपलब्ध करुन दिले आहे त्याचा आम्हाला केवढा मोठा अभिमान वाटतो. यंग पीपल आस्क पुस्तकात देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण मदतीवर विश्वस्त राहून आपण ते सरळपणे सर्वांना सादर करू या. हे करण्याद्वारे पुष्कळ युवक व इतर लोकांना देवाच्या नव्या जगातील सार्वकालिक जीवनाची आशा कवटाळण्यात मदत मिळून तेही आम्हासोबत मिळून आमच्या निर्मात्याच्या इच्छेप्रमाणे करू लागतील ही आशा आम्ही व्यक्त करतो.—प्रक. ४:११.