ईश्वरशासित वृत्त
घाना: या देशातील कार्यावरील बंदी आता उठविण्यात आली आहे. राज्य सभागृहे उघडली गेल्यामुळे बांधवांना अत्यानंद झाला आहे; तसेच त्यांना सध्याच्या कायद्याखाली नोंदणी करण्याची परवानगी मिळाली आहे.
लायबेरिया: मुलकी युद्धामुळे बरेच महिने बंद राहिल्यानंतर लायबेरियातील शाखा दप्तर पुन्हा उघडले आहे. तेथे चार मिशनरी पुन्हा सेवा करण्यासाठी परतले आहेत, आणि बांधवांना आता पुन्हा मुक्तपणे एकत्र येण्याचा आनंद वाटत आहे.