वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९१ पृ. २
  • डिसेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • उपशिर्षक
  • डिसेंबर ९ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर १६ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर २३ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर ३० ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९१
km १२/९१ पृ. २

डिसेंबरसाठी सेवा सभा

डिसेंबर ९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १८० (१००)

१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. या शनिवारी मासिक कार्यासाठी वापरता येतील असे अलिकडील मासिकातील लेख ठळकपणे दाखवा.

२० मि: “सत्याचे वचन कुशलतेने हाताळा.” लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. घरोघरी पवित्र शास्त्र वापरण्याची गरज ठळकपणे मांडा. ५व्या परिच्छेदाची चर्चा केल्यावर सुचविलेले प्रात्यक्षिक सादर करा. तसेच संभाषणाच्या विषयाला जोडून पवित्र शास्त्र कसे सादर करता येते ते थोडक्यात सांगा. जेथे लोक आणखी एक पवित्र शास्त्र घ्यायची इच्छा दर्शवीत नाही तेथे प्रचारक केवळ गॉडस्‌ वर्ड हे पुस्तक सादर करू शकतील हे सांगा.

१५ मि: “द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन—स्कॉलरी ॲण्ड ऑनेस्ट.” वॉचटावरच्या मार्च १, १९९१ अंकातील लेखावर चर्चा. सेवाकार्यात पवित्र शास्त्र सादर करताना जे मुद्दे उपयुक्‍त ठरू शकतील ते ठळकपणे मांडा. (प्रादेशिक: “यहोवाने पुरविलेली अंतर्दृष्टी.” टेहळणी बुरुज, ऑगस्ट १, १९९०.)

गीत २३ (४०) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १६१ (७०)

८ मिः स्थानिक घोषणा. जानेवारी महिन्यात साहाय्यक पायनियरींग करण्याचे उत्तेजन द्या.

२२ मिः “सुवार्ता सादरता—घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास सादर करणे.” प्रश्‍नोत्तर रुपाने चर्चा. पवित्र शास्त्र घेतलेल्या कोणा व्यक्‍तीसोबत पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु केला जाऊ शकतो त्याचे अनुभवी प्रचारकामार्फत प्रात्यक्षिक दाखवा. जी आस्था आढळली, मग तेथे प्रकाशन घेतलेले असो वा नसो, तेथे पुनर्भेट देण्याचे बांधवांना उत्तेजन द्या.

१५ मिः स्थानिक गरजा किंवा “राज्य घोषकांचा वृत्तांत.” भाषण. पवित्र शास्त्र लोकांच्या जीवनावर जो प्रभाव पाडत आहे, त्याचे या लेखात प्रसिद्ध झालेले अनुभव विदीत करा. यासाठी एप्रिल १, १९९१ आणि ऑगस्ट १, १९९१ चे अंक वापरता येतील.

गीत १६७ (१०७) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ९६ (१३)

१० मिः स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल, आणि संस्थेकडून मिळालेल्या अनुदान पाचेपावतीची माहिती. बंधुजनांनी जो हातभार लावला त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. डिसेंबर २५ साठी योजलेल्या कार्याची माहिती द्या.

२० मिः “मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था—भाग ५.” सेवा देखरेख्यांनी केलेली प्रश्‍नोत्तर रुपाची हाताळणी. या तरतुदीकडून काहींना कसा लाभ मिळू शकला त्याबद्दल अभिप्राय देण्यास सांगा किंवा ज्यांना सेवा देखरेख्यांच्या भेटीद्वारे मदत मिळाली अशा एकदोघांची मुलाखत घ्या.

१५ मिः “घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासांची तयारी करणे व ते चालविणे.” वडील या लेखाची प्रश्‍नोत्तराच्या रुपाने चर्चा करतात.

गीत ७५ (५८) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ३० ने सुरु होणारा सप्ताह

गीत १०५ (४६)

१० मिः स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त. या सप्ताहाच्या शेवटी सर्वांना क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.

२० मिः “पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा—भाग ५.” मालिकेतील या शेवटल्या लेखाची प्रश्‍नोत्तर रुपाने हाताळणी. सुचविलेल्या प्रस्तावांना अनुसरण्याचे उबदार उत्तेजन द्या. क्षेत्रात पूर्ण रुपाचा सहभाग घेतल्यामुळे व्यक्‍तीगत लाभ मिळाले अशा आवेशी प्रचारक किंवा पायनियरांची वेळ मुभा देईल तशी मुलाखत घ्या.

१५ मिः लिव्ह फॉरएव्हर पुस्तक सादर करणे: लिव्ह फॉरएव्हर हे पुस्तक सादर करण्याचा प्रमुख मार्ग हा अर्थातच घरोघरचे कार्य हे आहे. जानेवारीमध्ये या कार्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही अधिक वेळेची योजना आखाल का? सध्याच्या संभाषणाचा विषयाचा प्रभावी वापर व त्याला जोडून केलेली सादरता यावर आम्हाला लिव्ह फॉरएव्हर पुस्तक सादर करण्यात यश मिळणार. या बाबतीत सुधारणा करता येईल असे काही आहे का? काहींना कौटुंबिकरित्या सराव करणे बरे वाटेल. जे क्षेत्रकार्याच्या सभा चालवितात ते कशी मदत देऊ शकतात? अशांना रोमकर १२:८ उत्तेजन देते की, यांनी ते ‘तत्परतेने करावे.’ कदाचित तुमच्या क्षेत्रात बहुतेक हिंदू वसाहतीस असतील. तर मग, अशांसाठी पुस्तकातील अध्याय १ ला की, “अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे” हा वापरण्यास काही हरकत नाही. देवाने वचन दिलेल्या शांतीमय नव्या जगात जगण्याची आस्था निर्माण करण्यात पहिले तीन परिच्छेद योग्य माहिती देतात. पृष्ठ ८ व ९ पानांवरील चित्र, आणि ११ किंवा १२ व १३ पानांवरील चित्रे यातील फरक डोळ्यांना चांगले अपील करते व ती शैक्षणिक मदत याअर्थी वापरता येतील. हे पुस्तक आता जगभर ११० भाषांत उपलब्ध आहे व ते जगातील सर्वात उत्तम असे पवित्र शास्त्र अभ्यासाचा मार्गदर्शक असल्यामुळे ते जानेवारीत आपण क्षेत्रावर उत्साहाने सादर करू या.

गीत २०५ (११८) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा