पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
भाग ५: पूर्ण जिवाने केलेल्या कार्याचे समृद्ध लाभ
१ पूर्ण जिवाने कार्य करीत असलेल्या सेवकांसाठी यहोवा समृद्ध लाभांचा मुबलक पुरवठा करतो. (स्तोत्र. ११६:१२) तर मग, आपल्याला सेवकपणात यहोवाकडून मुबलक आशीर्वादांचा कसा लाभ मिळवता येऊ शकेल? आम्हासाठी कोणकोणते लाभ राखून ठेवले आहेत? त्याची संमती व कृपादृष्टी यांची खात्री होण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?
२ वैयक्तीक प्रयत्न जरुरीचा: तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी जितके अधिक वैयक्तीक प्रयत्न करता तितक्या अधिकपणे तुम्हाला देवाकडील लाभांचा आनंद उपभोगता येईल. पौलाने लिहिलेः “प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल.” (१ करिंथ ३:८) यास्तव, आपल्याला सेवकपणात जितका अधिक सहभाग घेता येईल तितका घेऊ या. देवाबद्दलची ओळख घडविण्यात पौलाला कित्येक वैयक्तीकांना एवढेच काय पण सबंध मंडळ्यांनाही मार्गदर्शन देण्याचा लाभ मिळाला. त्यांची विश्वासातील दृढता बघून त्याला केवढा आनंद झाला! (१ थेस्स. २:१९, २०) अर्थात, पौलाप्रमाणे सेवकपणात पूर्ण सहभाग घेण्यासाठी तुम्हाला तुमची परिस्थिती कदाचित मुभा देत नसेल. पण तेच, कोणा वैयक्तीकाला किंवा सबंध कुटुंबाला जीवनाच्या मार्गावर स्थिर करण्याचा लाभ मिळणे हा समृद्ध आशीर्वाद नाही का? तर मग, ही गोष्ट आम्हाला घरोघरच्या सेवकपणात परिश्रमाने सहभाग घेण्याला व पुनर्भेटी व पवित्र शास्त्र अभ्यासात याचा मागोवा घेण्यात केवढी प्रेरणा देणारी आहे!
३ आणखी लाभ: पूर्ण जिवाने कार्य करण्याचा अवर्णनीय लाभ म्हणजे एक सहकारी या नात्याने यहोवा व येशू ख्रिस्त यांच्या समीप जाण्याची एखाद्याला संधी मिळते. (मत्तय ११:२९, ३०; १ करिंथ ३:९) तुमच्या सेवकपणात देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मदत देत आहे याची संवेदना घडणे हे देखील केवढ्या आनंदाचे आहे! (मत्तय १०:२०; योहान १४:२६) तसेच मंडळीतील इतरांसोबत मिळून खांद्याला खांदा लावून परिश्रमाने कार्य करणे हे आमचे प्रेम व ऐक्याचे बंधन अधिकच बळकट करते.
४ या शेवटल्या काळात आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी देव ज्या संस्थेचा वापर करीत आहे तिला पूर्ण रुपाचे सहकार्य दिल्याविना आपल्याला पूर्ण लाभांचा अनुभव घेता येणार नाही. (पडताळा २ राजे १०:१५.) देवाच्या माध्यमाकडून मिळणारे मार्गदर्शन आपण जवळून व पूर्ण अंतःकरणाने अनुसरतो आणि मंडळीच्या कार्यहालचालीत क्रियाशीलपणे भाग घेतो तेव्हा आपल्याला सैतानाच्या युक्तीबाज कारवायांकडून आध्यात्मिक रितीने संरक्षण मिळत असते. आपल्याला सेवकपणात अधिक फलदायी सहभाग मिळू शकतो.
५ पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करण्याच्या या पाच भागांच्या मालिकेने कित्येक गोष्टीची माहिती आपल्याला दिली. जेणेकडून एखाद्या व्यक्तीला अधिक पूर्ण अंतःकरणी बनण्याची चालना मिळते त्या यहोवाबद्दल वाटणाऱ्या रसिकता अधिक उभारण्याची गुरुकिल्ली काय आहे ते तुम्हाला आठवते का? (ऑगस्ट) क्षेत्रकार्याचा आवेश वाढविण्यासाठी तयारी का जरुरीची आहे? आम्ही ती तयारी कशी करू शकतो? (सप्टेंबर) अनुभवी प्रचारक इतरांना अधिक पूर्ण जिवाने कार्य करण्यासाठी कशी मदत करू शकतात? (ऑक्टोबर) उत्तम अशी व्यक्तीगत संघटना आम्हाला सेवकपणात पूर्ण जिवाने असण्यासाठी कशी मदत करू शकते? (नोव्हेंबर) या सूचनांचा तुम्ही अवलंब करीत आहात का?
६ यहोवाची आज्ञा मानून आपण लाभ मिळवावा अशी त्याची इच्छा आहे. (यशया ४८:१७) याचप्रमाणे, जे तुमचे ऐकतात अशांना तुम्ही पूर्ण जिवाने करीत असलेल्या कार्याचे फायदे मिळतात. (१ तीम. ४:१५, १६) हाताशी असलेल्या कामात परिश्रम उचलल्यास यहोवा त्याचे निरिक्षण करील आणि मग तुम्हाला त्याच्याकडून “वतनरूप प्रतिफळ,” सार्वकालिक जीवन मिळू शकेल.—कलस्सै. ३:२३, २४.