सत्याचे वचन कुशलतेने हाताळा
१ आम्ही देवाचे वचन ज्या कुशलतेने वापरतो त्याचा परिणाम लोक ज्या पद्धतीने सुवार्तेविषयी आपला प्रतिसाद दाखवतात त्यावर होऊ शकतो. सेवकपणात आपण आपली कुशलता वाढवावी असे पौलाने उत्तेजन दिले. तो म्हणालाः “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला कामकरी असा देवाला पटलेला, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीमथ्य २:१५.
२ पवित्र शास्त्राची हाताळणी करण्यामधील आपली कुशलता वाढविली पाहिजे. व्यक्तीगत अभ्यासासाठी तसेच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासाठी वेळ देणे जरुरीचे आहे. तथापि, जे काही आपण शिकलो ते, पवित्र शास्त्र सेवकपणात नियमितपणे वापरुन आचरणात आणण्यास हवे. याकरता, सतत प्रयत्न तसेच देवाची मदत व मार्गदर्शनाची गरज आहे.—१ योहान ३:२२.
३ देवाच्या वचनावर लक्ष केंद्रित करा: आम्ही सांगत असलेला संदेश आमच्या स्वतःचा नसून तो देवाच्या लिखित वचनावर आधारीत आहे हे लोकांनी जाणून घेणे जरुरीचे आहे. (योहान ७:१८) एखाद्या विषयावर पवित्र शास्त्र काय म्हणते ते त्यामधून लोकांना दाखविल्यामुळे मोठा परिणाम घडतो. सरळ मनोदय असणारे लोक पवित्र शास्त्राच्या प्रबळ संदेशाकडे आकर्षित होतात. आपण जितक्या अधिकपणे शास्त्रवचनांचा वापर करतो तितक्या अधिकपणे आपण कुशल होऊ शकतो व मग इतरांचे लक्ष आपण देवाच्या वचनांकडे केंद्रित करू शकतो; यामुळे त्यांचा फायदा होऊ शकेल.
४ बहुतेक लोक पवित्र शास्त्रासोबत परिचित नाहीत. यास्तव, त्याचा वापर करतेवेळी आपण त्यामधून वाचून दाखवण्यासोबत अधिक ते केले पाहिजे. तेव्हा एखाद्या शास्त्रवचनाची प्रस्तुती करण्यासाठी विचारपूर्वक तयारीची आवश्यकता आहे. एखादा प्रश्न किंवा सांगितलेली समस्या आस्था निर्माण करू शकते. तसेच वचन वाचल्यावर आपण काय म्हणतो याकडेही लक्ष दिले पाहिजे. केवळ एका वाचनात त्या माणसाला आपण सांगू इच्छिणारा मुद्दा कदाचित समजणार नाही. यासाठी प्रमुख शब्दावर परत जोर देणे व त्याचा अवलंब स्पष्ट करणे हे त्याच्या मनात त्या कल्पना शिरण्यास मदत करील.—पहा स्कूल गाईडबुक, अध्याय २४ व २५.
५ सादरता: डिसेंबरमध्ये कार्य करताना जे लोक आपल्याला आस्थेवाईक आढळतील अशांना आपण न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स हे द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? या पुस्तकासह सादर करू. या सादरतेसह आपण लोकांची कशी भेट घेऊ शकतो? आपली ओळख करून दिल्यावर आपल्याला असे म्हणता येईलः “आज पुष्कळ लोक कोणा विशिष्ठाकडे किंवा प्रकाशनांकडे मार्गदर्शनासाठी बघतात. तर, व्यावहारिक मार्गदर्शनाचा सर्वोत्तम स्रोत कोणता असावा असे तुम्हास वाटते? [प्रतिसादास वाव द्या.] ज्ञानाचा खऱ्या उगमाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. [वाचा नीतीसूत्रे २:६, ७.] मानवी ज्ञान हे अपुरे असल्याचे व ते दैन्यावस्थेला व निराशेप्रत नेते हे दुःखाचे आहे. पण, देवाकडील सूज्ञान हे मात्र नेहमीच विश्वासार्ह व लाभदायक असल्याचे दिसून आले आहे. [वाचा यशया ४८:१७, १८.] यास्तव, आज आपल्याला ज्या समस्या आहेत त्यांच्याशी सामना देण्याकरता आपण जरुरीच्या मार्गदर्शनासाठी देवाकडे बघावे. हे मार्गदर्शन तो देतो.” यानंतर आपल्याला गॉडस् वर्ड पुस्तकातील १२ व्या अध्यायाकडे वळता येईल व २ऱ्या परिच्छेदाकडे घरमालकाचे लक्ष नेता येईल. मग, या अध्यायातील लागू होणारा मुद्दा स्पष्ट करता येईल.
६ देवाच्या ज्ञानाची श्रेष्ठता दाखवण्यासाठी नीतीसूत्रे २:६, ७चे वाचन केल्यावर न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन सादर करा आणि तुम्हाला स्वतःला पवित्र शास्त्राचा आदर का वाटू लागला व ते तुम्ही का मोलाचे मानता याचे विवेचन करा. पवित्र शास्त्राचे शिक्षण घरमालकाला लाभदायक ठरेल व ते त्याला भविष्यासाठी सबळ आशा देईल हे त्याला कळू द्या. अशा चर्चेमुळे, संभाषण, पवित्र शास्त्र दैनंदिन समस्येबद्दल कोणता सूज्ञ सल्ला देते त्याच्या स्पष्टीकरणाकडे वळण घेईल आणि मग पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याकडे ते नेईल.
७ प्रामाणिक लोकांच्या मदतीसाठी तसेच आपल्या विरोधकांचे खंडण करण्यासाठी येशूने नेहमी शास्त्रवचनांचा वापर केला. पौलाने जे काही शिकवले ते “धर्मशास्त्राचा उलगडा करुन प्रतिपादन” करण्याचा सराव अनुसरला. (प्रे. कृत्ये १७:२, ३) आपलाही कार्यातील आत्मविश्वास व आनंद हा, आपण सत्याचे वचन कुशलतेने हाताळण्यामध्ये जितका झटून प्रयत्न करू त्या परिमाणाने वाढत राहील.