मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था भाग ४: एकमेकांची उभारणी करण्याचे चालू ठेवा
१ मंडळीतील पुस्तक अभ्यास गटातील इतरांच्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रत्येकाला अर्थभरीत कार्यभाग पूर्ण करता येईल. आम्ही सर्वांनीच ‘प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष दिले पाहिजे व तो दिवस जवळ येत असता खासपणे केले पाहिजे’ या शास्त्रवचनीय आज्ञेचे पालन करण्याची इच्छा धरली पाहिजे.—इब्री १०:२४, २५.
२ एकमेकांची मदत करणे: पुस्तक अभ्यासात उबदार, प्रेमळ वातावरण उभारण्याचे सहकार्य सर्वांना देता येईल. आम्हातील प्रत्येकजण इतर सदस्यांबद्दल व्यक्तीगत आस्था दाखवीत राहिल्यास गटामध्ये जवळीक निर्माण होण्यास हातभार मिळतो. गलतीकर ६:१० मध्ये आम्हाला “सर्वांचे व विशेषतः विश्वासबंधूंचे बरे करावे,” असे मार्गदर्शन देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला पुस्तक अभ्यासातील कोणी आजारी असल्याचे व तो सभेला येत नसल्याचे लक्षात आले आहे का? तुम्हाला कदाचित जाऊन त्यांची भेट घेता येईल. पुस्तक अभ्यासात दाखविला जाणारा असा आत्मा बांधवांना एकमेकांच्या जवळ आणतो.
३ दैनंदिन दबाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा इतर समस्यांमुळे कोणास सांत्वन देण्याची गरज आहे कसा कोणी आहे का? मदत देण्यासाठी तुम्हाला काय करता येणे शक्य आहे? यासाठी सभेत नुसते अभिवादन न करता इतरांशी अधिक संभाषण करण्याकरता खास प्रयत्न करा. काही कदाचित लाजाळू असतील, पण तेच कोणी तरी आम्हाबरोबर बोलावे अशी वाट बघत असतील. याकरताच, त्यांच्याशी बोलल्यास ते चांगला प्रतिसाद देतील. (uw पृ. १३७-८) प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना “अल्पधीराचे आहेत त्यांस धीर द्या, अशक्तांस आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा” असे उत्तेजन दिले. (१ थेस्स. ५:१४) कोणी आजारी किंवा निराश असला आणि त्याच्याकडे जाऊन कोणी भेट दिली तर ते त्याला किती सांत्वन देते! आमची कोणाला काळजी आहे हे जाणणे इतकेच त्यामध्ये जरुरीचे असते.
४ आम्ही क्षेत्रकार्याच्या योजनेशी सहकार्य करण्याची इच्छा राखावी. तसेच गटातील विविध बांधवांसोबत कार्य करण्याचा प्रयत्न राखावा. (२ करिंथ. ६:११-१३; १२:१५) आम्हाला कधीकधी आमच्या पुस्तक अभ्यास चालकांद्वारे गटातील कोणाला तरी साहाय्य देण्याची विचारणा केली जाईल. आमचा कसा प्रतिसाद असेल? जेव्हा प्रचारक व पायनियर प्रचाराच्या तसेच शिष्य बनविण्याच्या कार्यातील विविध प्रकारात एकमेकांसोबत मिळून कार्य करतात तेव्हा पुस्तक अभ्यासाचा गट अधिक बळकट होतो.
५ व्यक्तीगत उदाहरण: पुस्तक अभ्यासाच्या व्यवस्थेला तुम्ही आणखी काही मार्गांनी हातभार लावू शकता. तुमचे चांगले उदाहरण यात महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही राज्य सभागृहातील सभांना उपस्थित राहताना जसा पेहराव करता तसाच येथेही करता तेव्हा तुम्ही आदर दाखवत असता. याद्वारे, जे गबाळेपणाने पुस्तक अभ्यासास येत असतात अशांसाठी तुम्ही एक सकारात्मक उदाहरण घालून देता. अभ्यासात इतरांना व्यत्यय येऊ नये म्हणून तुम्ही वेळेवर येण्याची सवय स्वतःला लावून घेतली आहे का?
६ मंडळीचा पुस्तक अभ्यास ही यहोवाकडील एक प्रेमळ योजना आहे व याला आम्ही आपले पाठबळ दिले पाहिजे. (यशया ४०:११) आम्हाला व्यक्तीगत साहाय्य मिळण्याचे तसेच इतरांना आध्यात्मिक तजेला मिळू देण्यात हातभार लावण्याचे हेच ते स्थळ आहे. यास्तव, या व्यवस्थेला पूर्ण रुपाचे पाठबळ देऊन आपण “एकमेकांस बोध” करु व “एकमेकांची वृद्धी” करु या.—१ थेस्स. ५:११.