पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
भाग ४: आमचे सेवकपण प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी संघटीत
१ पूर्ण जिवाने जाहीर सेवकपण पार पाडण्याकरता चांगल्या व्यक्तीगत संघटनेची गरज आहे. आमच्या आजच्या सेवकपणाबद्दल येशूने एक अप्रतिम नमुना घालून दिला. (लूक १०:१, २; प्रे. कृत्ये १:८) याशिवाय, पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांनी आपले सेवकपण ज्या पद्धतीने पूर्ण केले त्यापासूनही आपण पुष्कळ शिकू शकतो. (प्रे. कृत्ये ५:४२; २ तीम. ४:५) पण आज तुम्हाला कसे चांगले सुसंघटीत होता येईल व चांगले परिणाम कसे मिळवता येतील?
२ क्षेत्रकार्यासाठी वेळेचा आराखडा तयार करा: आमचे सेवकपण हे आमच्या जीवनातील किरकोळ किंवा आकस्मिक गोष्ट नव्हे. आमचे सेवकपण पूर्ण करण्यामध्ये घालविलेला वेळ आपण संधीवर सोडू शकत नाही. आमचे सेवकपण प्रभावीपणे संघटीत करण्यासाठी त्याच्या विविध प्रकारांसाठी वेळ नेमून दिलाच पाहिजे. (इफिस. ५:१५, १६) काही प्रचारक, आपण दर महिन्यात क्षेत्र कार्यात केवढा वेळ घालवणार त्याचा आराखडा तयार करतात. यासाठी दर आठवडी क्षेत्र कार्यात सहभागी होण्याकरता आपल्या सर्व कामकाजाची व्यवस्थित आखणी करावी लागते. ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना क्षेत्र कार्याच्या विविध प्रकारात नियमित रुपाने सहभागी होण्यासाठी मदत करावी.—अनु. ६:७; नीती. २२:६.
३ व्यक्तीगत ध्येये ठेवा: खरी ध्येये तुम्हाला गाठण्यासाठी काही तरी करण्याची प्रेरणा देतील. तुम्ही ठेवलेले ध्येय पूर्ण केल्यावर तुम्हाला तृप्ती मिळेल. (नीती. १३:१२) प्रेषित पौलानेही आग्रहाने सांगितलेः “आपण ज्या नियमाने इतकी प्रगति साधली त्याच नियमाने पुढे चालावे.” (फिलिप्पै ३:१६, न्यू.व.) तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या हर प्रकाराच्या बाबतीत तुमच्या क्षेत्रकार्याच्या हालचालीने, संघटीत क्रमाचा पुरावा दिला पाहिजे.
४ उदाहरणार्थ, तुम्हापाशी हस्तपत्रिका व निमंत्रण पत्रकांचा भरपूर साठा आहे का? तुम्ही अद्ययावत मासिकांचा पुरेसा साठा सोबत ठेवता का व तो चांगल्या स्थितीत आहे का? तुम्ही हाऊस-टू-हाऊस पत्रकाचा चांगला उपयोग करता का? यामध्ये एकाचा आढळलेल्या आस्थांची नोंद ठेवण्यात तर दुसऱ्यात घरी न भेटलेल्यांची नोंद ठेवण्यासाठी वापर करता का?
५ कार्याला जाण्याआधी सध्याच्या संभाषणाच्या विषयाची उजळणी करा. जे प्रकाशन सादर केले जात आहे त्यातील बोलके मुद्दे वेगळे तयार ठेवा व यांचा आस्था निर्मिण्यात चांगला वापर करा. याखेरीज, क्षेत्रकार्यात रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स या पुस्तकाचा उपयोग करण्याची तयारी ठेवा. दोन घरातील भेटीच्या अंतरात तुम्ही चटकन या पुस्तकातील प्रस्तावांची चाळणी करू शकता. हे व्यावहारिक मुद्दे वापरल्यास तुमच्या सेवाकार्याचा प्रभावीपणा सुधारेल.
६ या शेवटल्या काळात ‘सुवार्तेच्या पवित्र कामात’ पूर्ण रुपाने सहभागी होण्याची संधि एक आशीर्वादित हक्क आहे. (रोम. १५:१६) “आमचे ओठांचे फळ” वापरुन शक्य आहे तितक्या अधिक चांगल्या पद्धतीने साक्ष देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. (इब्री १३:१५; पडताळा होशेय १४:२.) हे करण्यासाठी, आपण क्षेत्रकार्यात नियमित सहभाग घेण्याकरता वेळ योजून ठेवावी व व्यवहार्य ध्येये ठेवावीत, जी आम्हाला यहोवाच्या स्तुतीकरता आपले सेवकपण पूर्ण करण्याची मदत देतील.