क्षेत्रावरील आमचे राज्याचे सेवकपण पूर्ण करणे
१ यहोवा देव व शेजाऱ्यावरील प्रेम हे आम्हाला राज्याचा सुवार्तेचा प्रचार करण्याची चालना देते. आम्ही सत्याची कुशलतेने हाताळणी करण्याद्वारे “सर्व तर्कविर्तक व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्व काही” पाडून टाकू शकतो. (२ करिंथ १०:५) याविषयी वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स आम्हाला योग्य ती मदत देतो.
२ क्षेत्रावरील आमच्या प्रचारकार्याच्या हालचालीच्या अनुषंगाने या खंडात “फिल्ड मिनिस्ट्री” हे प्रमुख शिर्षक देण्यात आले आहे. यात आमची व्यक्तीगत प्रवृत्ती, प्रस्तावना, आक्षेपांवर मात करणे, विविध प्रकाशनांची सादरता, पुनर्भेटी व पवित्र शास्त्र अभ्यास यासोबत प्रत्येक गोष्टीविषयीची चर्चा आहे. तुम्हाला एखाद्या मुद्याचे विवेचन एखाद-दुसऱ्या अनुभवाच्या मदतीने करायचे आहे का? तर मग, हवी असणारी माहिती तुम्हाला “एक्स्पीरियन्सेस्” या सदराखाली सापडू शकेल.
३ कधी कोणी तुम्हाला परस्परविरोधी मत असल्याचे भासवणाऱ्या वचनांचा संदर्भ दाखवून पवित्र शास्त्र तसे असल्याचे म्हटले आहे का? तर मग, “बायबल ऑथेंटिसिटी” या सदराखालील “काँट्र्याडिक्शन्स,” आणि “हार्मनी” या उपशिर्षकात अशा आक्षेपांविषयीची सर्वसाधारण चर्चा केल्याचे संदर्भ आढळतील. “स्क्रिपचर्स हार्मनाइज्ड” या उपशिर्षकाखाली तुम्हाला शास्त्रवचनांची एक यादीच दिसेल, जी परस्परविरोधी असल्याची भासतात; तसेच यांचे यथाकारण स्पष्टीकरण देणारे संदर्भही आहेत.
४ काही क्षेत्रात त्र्यैक, नरकाग्नी, जिवाचे अमरत्व या ख्रिस्ती धर्मराज्याच्या खोट्या मूलभूत शिकवणी प्रचलित आहेत; अशांना आपल्याला तोंड द्यावे लागते. या शिकवणींचे एकेक सदर सापडते. “त्रिनिटी” तसेच “इमॉर्टलिटी ऑफ द सोल” याखाली “स्क्रिपचर्स मिसअप्लाईड टू सपोर्ट” हे उपशिर्षक दिसेल. हे तुम्हाला विशिष्ट वचनाविषयीच्या चर्चेकडे निरवील. अशाचप्रकारे “हेल” याखाली “स्क्रिपचर्स मिसइंटरप्रिटेड” उपशिर्षकामध्ये असाच विषय आढळेल.
५ तुम्हाला पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याची खरीच तळमळ आहे का? किंवा तुम्हाला असा एक अभ्यास आहे जो प्रगतिशील आहे असे दिसत नाही? तर मग, “बायबल स्टडीज्” या सदराखाली “स्टार्टिंग,” “असिस्टींग—,” व “टिचिंग” ही माहिती आहे, ज्यामध्ये तुम्हाला पवित्र शास्त्र अभ्यास मिळवता येऊन तो प्रगतिकारकपणे चालवता येण्याविषयीच्या सूचना मिळतील. एखादा अभ्यास केव्हा बंद करावा त्याविषयी “टर्मिनेटिंग अनफ्रुटफूल,” व “डिस्कंटिन्यूईंग” ही सदरे बघा.
६ क्षेत्रसेवेच्या अधिक हक्कांची प्राप्ती करण्याची तुमची इच्छा आहे का? तेव्हा “फूल-टाईम मिनिस्ट्री,” “ऑक्झिलरी पायनियर्स,” “पायनियर्स,” “मिशनरीज्,” आणि “सर्विंग व्हेअर द नीड इज ग्रेटर” ही सदरे तुम्हाला ही ध्येये कशी मिळवावीत याच्या व्यावहारिक साहित्याकडे आणि ज्यांनी ती ध्येये मिळविलीत त्यांच्या आनंदी अनुभवांकडे निरवतील.
७ आमचे क्षेत्रावरील राज्याचे सेवकपण मोठे समाधान मिळवून देते. (योहान ४:३४) वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स तुम्हाला या आनंदी कामात सहभाग घेत असता योग्य ती मदत देऊ शकेल.