१९९१ च्या “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आत्ताच योजना आखा
१ जगाची आजची परिस्थिती लक्षात घेता कित्येक देशातील लोक आपणाला आहे त्यापेक्षा अधिक स्वातंत्र्याची अपेक्षा बाळगून आहेत यात काही आश्चर्याचे नाही. पण खरे स्वातंत्र्य कोठे मिळू शकते? येशू ख्रिस्ताने म्हटलेः “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखरी माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.” (योहान ८:३१, ३२) हे स्वातंत्र्य, लोक एखादी राजकीय सत्ता वा सरकार याला दुसऱ्याखातर डावलून लावून जी स्वातंत्र्याविषयीची आशा धरतात त्याच्यासारखे मर्यादित असणारे नाही. उलटपक्षी, ते मानवी समस्यांच्या गाभ्यापर्यंत जाते. येशू येथे ज्या स्वातंत्र्याविषयीची चर्चा करीत होता ते पापाच्या दास्यत्वात ठेवणाऱ्या बंधनापासूनचे स्वातंत्र्य आहे. (पहा योहान ८:२४, ३४-३६.) अशाप्रकारे जेव्हा कोणी येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य बनतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या जीवनात लक्षणीय बदल होण्यात, त्याची मुक्तता घडण्यात होतो.
२ तीन दिवसांचे अधिवेशन: १९९१च्या “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाची मालिका भारतात सप्टेंबर १३-१५ पासून सुरु होईल. कार्यक्रमाची सुरवात शुक्रवारी सकाळी १०:२० होईल व अधिवेशन रविवारी दुपारी ४ वाजता संपेल. कार्यक्रमात प्रत्येक भागात आमच्या आध्यात्मिक आरोग्यास महत्त्वपूर्ण ठरणारी काळजीपूर्वक निवडण्यात आलेली माहिती प्रस्तुत करण्यात येईल. विविध विषयांद्वारे, रोमकरांस पत्र ८:२१ मध्ये सांगण्यात आलेले स्वातंत्र्य आम्हाला कसे मिळू शकते ते ठळकपणे दाखवण्यात येईल. भाषण, प्रात्यक्षिके, मुलाखती व एक नाटक याद्वारे थरारक माहितीची स्पष्टता सादर करण्यात येईल.
३ यापैकीचा एखादाही कार्यक्रम चुकविला जाऊ नये असा निर्धार करा. यासाठी तुमच्या आराखड्यातील काही गोष्टींमध्ये सुधारणा व काही व्यक्तीगत गोष्टींना काट द्यावी लागेल. काहींना आपल्या नोकरीच्या व्यवस्थापकांशी खास व्यवस्था आखावी लागेल. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी काहीजण आर्थिक फायदाही सोडून देतात. जे यहोवाला प्रामाणिकपणे प्रार्थना करतात आणि उपस्थित राहण्याचा कसून प्रयत्न करतात अशांना यहोवा निश्चितपणे आशीर्वाद देतो.—लूक १३:२४.
४ लवकर या: यहोवाचे लोक भरवसापात्र तसेच वक्तशीर असल्याचे सर्वपरिचित आहे. (लूक १६:१०) हेच प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्याविषयीही लागू आहे. दर दिवशी लवकर या आणि कार्यक्रम सुरु होण्याआधी आपल्या जागेवर बसा. यामुळे तुम्हाला काळजी घ्याव्या लागणाऱ्या गोष्टी, जसे की आपले वाहन थांब्यावर उभे करणे व आपल्या कुटुंबासाठी बसण्याची जागा बघणे याविषयी पुरेसा वेळ मिळू शकेल.
५ प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्यामुळे सुखावह सहवासाचा अनुभव घेण्याची संधि मिळते. पण तेच आपल्या परिचितांना रात्री उशीरापर्यंत भेट दिली तर त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहण्यात अडचण होणार. उशीरा उठल्यामुळे काळजी व चिंता वाढतात व सकाळी सारे काही घाईतच उरकावे लागते. हे टाळण्यासाठी, रात्री विश्रांतीसाठी पुरेसा वेळ निश्चित करणे जरुरीचे आहे. ठरविलेल्या आराखड्याचे कटाक्षाने पालन केल्यामुळे सर्वांना रात्रीची चांगली झोप मिळू शकते व दुसऱ्या दिवशी लवकर कामाला सुरवात करता येते. यामुळे कार्यक्रम सुरु झाल्यावर घाईने येण्याचे टळते; कारण असे झाल्यावर बसलेल्या इतरांचे लक्ष विचलीत केले जाते व त्यांना चिडचिडे झाल्यासारखे वाटते. दर दिवशी लवकर आल्यामुळे तुम्हाला आपल्या बंधूभगिनींची भेट घेता येईल. ख्रिस्ती प्रेम व समंजसपणा तसेच यहोवा व तो देत असलेल्या आध्यात्मिक गोष्टी याबद्दलचा आदर यांनी आम्हाला वेळेवर येण्यासाठी होता होईल ते करण्याची चालना दिली पाहिजे.
६ लक्षपूर्वक ऐका: ऐकणे याचा अर्थ मन व अंतःकरण, आमचे कान व समजण्याची बुद्धी या दोहोंकरवी लक्ष देणे हा आहे. आम्ही “यहोवाचे वचन” ऐकण्याची व समजण्याची गरज आहे. (यिर्मया २:४) यशया ५५:२ मध्ये यहोवाने इस्राएलांना हे आज्ञापिले: ‘माझे लक्षपूर्वक ऐका.” “लक्षपूर्वक” याचा अर्थ, “एकाग्र किंवा उत्सुकतेने लक्ष देणे” असा आहे. आम्ही अधिवेशनात लक्ष देऊन आहोत तर मग, उत्सुकतेने ‘ऐकू व अधिक सुविचार मिळवून घेऊ.’ (नीती. १:५) प्रांतिय अधिवेशनात लक्ष देणे व ऐकणे यासाठी राज्य सभागृहापेक्षा अधिक श्रम व एकाग्रता लागते. ते का? कारण एक तर आम्ही अधिक वेळ बसतो आणि उपस्थिती अधिक असल्यामुळे निरनिराळा विचलीतपणा येत असतो. आम्ही लक्ष दिले नाही तर समृद्ध असे जे आध्यात्मिक पोषण देण्यात येत आहे ते गमावून बसू व त्यापासून वंचित राहू. (१ पेत्र. २:२) तर मग, काय करता येईल? कार्यक्रमाच्या दरम्यान पुष्कळ अधिवेशन प्रतिनिधी नोंदी घेण्याची उपयुक्त सवय लावून घेत आहेत हे पाहणे मोठे संतुष्टकारी आहे. प्रांतिय अधिवेशनातील काही भाषणे ही नंतर काही काळाने प्रकाशनात छापण्यात येतील, तरीही सर्वच येणार नाहीत. याठीच सर्वांना प्रांतिय अधिवेशनाच्या दरम्यान त्रोटक नोंदी घेण्याचे उत्तेजन दिले जात आहे; कारण जे काही म्हटले जात आहे त्यावर लक्ष केंद्रित ठेवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे.
७ टिपणे फारच लांबलचक किंवा तपशीलवार असण्याची गरज नाही. एका मुख्य मुद्यासाठी एक किंवा दोन वाक्ये पुरेशी होतील. लहान मुलांना एखादी छोटीशी वही, पेन वा पेन्सिल दिली आणि त्यांना वक्त्याने सांगितलेले मुख्य मुद्दे, प्रमुख शास्त्रवचने तसेच सादर करण्यात आलेला एखादा नवा विचार लिहिण्याचे प्रोत्साहन दिल्यास त्यांनाही भाषणांपासून खूप लाभ मिळेल व त्यांचे लक्ष एकाग्र ठेवण्यात मदत होईल. वडीलांनी सुव्यवस्थीत रीतिने घेतलेली टिपणे त्यांना सेवासभेत अधिवेशन कार्यक्रमाची अर्थभरीत उजळणी घेताना फायदेकारक आढळली आहेत. अधिवेशनात सादर केलेले पुष्कळ मुद्दे ते त्यांच्या शिकविण्यात व मेंढपाळकत्वाच्या कार्यात संक्रमीत करू शकतात.
८ गीत गाण्यात व प्रार्थनेत ऐक्य राखा: येशू व त्याच्या प्रेषितांनी केले तसेच गीत गाऊन यहोवाची स्तुती व सन्मान करणे हा आमच्या उपासनेचा एक भाग आहे. (मार्क १४:२६) पौलाने १ करिंथकर १४:१५ मध्ये गीत गाण्याविषयी काढलेले उद्गार हे सूचित करतात की, ही गोष्ट ख्रिस्ती उपासनेचा एक नियमित भाग होती. (तसेच आमची राज्य सेवा, मार्च १९९१, पृष्ठ ३ पहा.) प्रांतिय अधिवेशन आपल्याला आमच्या हजारो बंधु-भगिनींसोबत एकत्र मिळून ऐक्याने यहोवाची स्तुती गायन व प्रार्थनेद्वारे करण्याची संधि देते. तरीपण काहींनी उपासनेच्या या महत्त्वपूर्ण भागाविषयी अनादर दाखविला आहे. तो कसा? अधिवेशनाचे गीत व प्रार्थना झाल्यावर तेथे येऊन. तसेच कार्यक्रम संपण्याच्या बेतात असताना काहीजण गीत व प्रार्थनेमध्येच सभागृह सोडून बाहेर पडतात. अपवादात्मक स्थितीत याविषयी खरे कारण असू शकेल. पण जर कोणी आपले वाहन लवकर काढून घ्यावे किंवा खाद्यगृहातील चीजवस्तु लवकर मिळाव्या यासाठी गीत गाण्याचे व प्रार्थनेत सहभागी होण्याचे नाकारीत असतो तर ते यहोवाच्या मेजाविषयी योग्य तो आदर व आवड दाखविण्याजोगे आहे का?—मत्तय ६:३३.
९ आम्ही जगाच्या मी-पणाच्या प्रवृतीस किंवा आमच्या आध्यात्मिक प्रगतीस तडा जाऊ देण्यास दुष्ट योजना, लोभ व स्वार्थीपणा यास वाव देऊ नये. अलिकडील वर्षांत पूर्व युरोपीय देशात आमच्या बंधू-भगिनींना सरतेशेवटी एकत्रितपणे गायन व प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यांना ज्याप्रमाणे मोठ्या मेळाव्यात एकत्र गायन गाण्याचे व प्रार्थना करण्याचा आनंद शिरशिरी भरविणारा ठरला त्याचप्रमाणे आपणही आता पवित्र गोष्टींविषयी तीच रसिकता दाखवू या व एकत्र मिळून गायन गाण्याच्या व प्रार्थना करण्याच्या संधीला कधीही हलके मानू नये.
१० आमचे ख्रिस्ती शिष्टाचार: आमचे ख्रिस्ती शिष्टाचार व प्रांतिय अधिवेशनातील आमचे स्वरुप यांनी आमच्याविषयी यहोवाचे साक्षीदार यानाते चांगला नावलौकिक मिळविला आहे. याचे कारण आम्ही आमच्या अधिवेशनास सामाजिक मौजमजा म्हणून नव्हे तर यहोवास तेथे गंभीरपणे उपासना दिली जाते या नात्याने बघत असतो. अशा खास प्रसंगी आम्ही एकत्र येतो तेव्हा आम्ही ख्रिस्ती प्रतिष्ठा व आध्यात्मिक मनोवृत्ती राखली पाहिजे आणि सर्वदा सेवक या नात्याने वागविले पाहिजे.—१ करिंथ. १०:३१-३३.
११ आम्ही हे करण्यात अपयशी ठरलो तर त्याद्वारे इतरांच्या आनंदावर विरजण घालणारे व नवीन लोकांना अडखळणारे होत असतो. आम्हाबाबतीत जी लहान-सहान गोष्ट करण्यात येते त्या प्रत्येकाविषयी आपण कदर करून त्याविषयी आभार मानतो का? आम्हासभोवती असणाऱ्यांविषयी आपण जाणीव बाळगली पाहिजे व त्यांना आदर तसेच समंजसपणा दाखविला पाहिजे. प्रत्येकाने याची जाण राखावी की, कार्यक्रम चालू असतो तेव्हा ती बोलण्याची नव्हे तर ऐकण्याची, श्रवण करण्याची वेळ असते.—अनु. ३१:१२.
१२ आणखी जेथे यहोवा देवाला आमच्या ख्रिस्ती शिष्टाचाराद्वारे थोरवी लाभू शकते ते क्षेत्र आहे, जेथे आपण निवासास असतो तेथील लोकांशी होणारे आमचे दळणवळण. आम्ही व्यवहार्य किंमतीत चांगल्या हॉटेल-खोल्यांचे आरक्षण करून देत असतो. यासाठीच हॉटेलमधला कर्मचारीवर्गासोबत आपण सौजन्य दाखवून रसिकता दाखविली पाहिजे, त्यांच्याकडून वाजवीपणे मागणी करू नये. (गल. ६:१०) हॉटेलमध्ये आपले वर्तन कसे असावयास हवे यासाठी चांगल्या सूचना आधीच दिल्या गेल्या आहेत. पुष्कळांनी याला योग्य प्रतिसाद दिला आहे व ते हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत पूर्ण रुपाचे सहकार्य देण्याचा यत्न करीत आहेत, तरी यहोवाच्या साक्षीदारांविषयी अद्यापही काही ठिकाणी नकारात्मक दृष्टीकोण दिसत आहे हे निराशाजनक आहे. असे का?
१३ काटकसर करण्याचा जरी आमचा विचार असला तरी आमची सेवा केल्याबद्दल जे बक्षिसाची अपेक्षा बाळगून असतात अशांविषयी आम्ही विसरू नये. अवेक मासिकाच्या जून २२, १९८६ च्या अंकातील पृष्ठे २४-७ वर देण्यात आलेले दोन लेख, “टू टीप—ऑर नॉट” व “टीप्स ऑन टीपिंग,” आम्ही लक्षात घेणे जरुरीचे आहेत. पृष्ठ २४ वर हे दर्शविण्यात आले होते की, “जी सेवा सादर करण्यात आली तिजसंबंधाने देण्यात येणारी ‘टीप’ ही ‘आभारी आहोत’ म्हणण्याच्या पुढची आहे. तो त्या व्यक्तीच्या मिळकतीचा प्रमुख भाग असतो.” अवेक! याने हेही दाखविले की, “अधिवेशनाला उपस्थित झाल्यावर तुम्ही जे काही करता ते सबंध गटावर परिणाम करणारे असते. लोक सबंध गटाला तुमच्या वागणुकीवरून बरेवाईट म्हणतील.” त्यामुळे ‘टीप’ देण्याविषयी तुमचे मत काहीही असले तरी, एखाद्या शहरी
यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाला तुम्ही प्रतिनिधी म्हणून जाता तेव्हा तारतम्य व समज बाळगा आणि “सुवार्तेसाठी सर्वकाही करण्याची” तयारी दाखवा.—१ करिंथ ९:१९-२३.
१४ साक्षीदारांनी हॉटेलमधील खोली सोडली तेव्हा तिची अव्यवस्थित दशा बघून व्यवस्थापकांना मोठी चिंता वाटली. स्वच्छता व नीटनेटकेपणा हा केवळ आमची वेषभूषा व वर्तणूक यांच्याबाबतीत नव्हे तर इतरांच्या चीजवस्तूंचा आम्ही वापर करतो त्याविषयीही प्रकट झाला पाहिजे. हॉटेलची खोली सोडताना ती स्वच्छ व नीटनीटकी न सोडण्याचे काही वाजवी कारण आहे का? आमची अविचारी वागणूक आमचे चांगले नाव वाईट करते. यास्तव येणाऱ्या प्रांतिय अधिवेशनात आपण अशा स्वरुपाची वागणूक ठेवण्याचा निश्चय करू की ज्याकरवी “सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणली जाईल.—तीत २:१०.
१५ पालकांसाठी: “स्वातंत्र्याचे चाहते” या प्रांतिय अधिवेशनाला लहान मुले व युवकांनाही येण्याचे आमंत्रण आहे. जग जी स्वतंत्रता प्रदान करते ती त्यांना आध्यात्मिक मृत्युकडे निरविते. मानवजातीला आरंभी जे स्वातंत्र्य देण्यात आले ते आदामाने घालवले. यहोवाच्या प्रेमळ संस्थेने आम्हाला या विषयासंबंधाने बरोबरची विचारसरणी दिली आहे. ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणारी तसेच अधिवेशनाच्या कार्यक्रमाविषयी खरी आस्था राखणारी मुले बघितल्यावर कितीतरी बरे वाटते. (स्तोत्र. १४८:१२, १३) पण हे बहुतांशी पालक ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन देतात व स्वतःचे उदाहरण ठेवतात त्यावर अवलंबून आहे. पुष्कळ मुलांना नोंद घेण्याची चांगली तालीम मिळालेली आहे. तुम्ही पालक या नात्याने मुलांना हे शिकवले नसल्यास अधिवेशनाआधी हा जो समय आहे त्यात आपल्या मुलांना ही तालीम का देऊ नये? अगदी लहान असणाऱ्यांना शास्त्रवचनीय अवतरणे व वक्ता उच्चारतो व ते ऐकतात असे मुख्य शब्द लिहिण्यास उत्तेजन दिले जाऊ शकते. कांही पालक त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी किंवा घरी परतताना प्रवासात मुख्य मुद्यांची उजळणी करण्याची योजना करतात.
१६ अर्थात, सर्व पालक लेकरांचा स्वाभाविक गुण खेळकरपणा याची गुणग्राहकता बाळगतात. त्यांना जीवनातील अनुभवांची कमतरता असते, व ते कमअनुभवी असतात. यास्तव त्यांना केव्हा लक्ष द्यावे व सभेत कसे स्वतःस वागवावे हे शिकविले गेले पाहिजे. ही गोष्ट त्यांच्या पालकांच्या चांगल्या देखरेखीस हाक देते. याबाबत कांही पालक ढिलेपणा देतात. कांही वेळेस पालक प्रार्थनेत यहोवास उचित भीतीदायक आदर दाखवितात तरी त्यांची लेकरे खेळत व इतरांना विचलीत करीत असतात. पालकांना त्यांची मुले प्रार्थनेच्या दरम्यान काय करीत असतात हे ज्ञात असावे. त्यांनी त्यांच्या जागा कार्यक्रमादरम्यान कधी सोडल्या तर ते काय करतात? अधिवेशन कार्यक्रमादरम्यान किंवा नंतर लेकरांना देखरेखीविना मोकाट सोडले आहे का?—नीती. २९:१५.
१७ हॉटेलमध्ये राहतेवेळी काही पालकांनी ते आत असता, किंवा बाहेर जेवणास गेले असता किंवा दुसऱ्या काही कामात गुंतले असताना आपल्या मुलांकडे लक्ष दिले नाही. हे योग्य नाही. तेव्हा काही मुले बेशिस्त वागली आणि ज्या बंधू व भगिनींनी त्यांना दयाळूपणे सल्ला दिला त्यांचाही त्यांनी अपमान केला. अशी ही बेशिस्त व गैरख्रिस्ती वागणूक घरात लाड पुरविणे व योग्य ती शिस्त न लावण्याचे परिणाम आहेत. ती सुधारली गेली पाहिजे. मुलांचा “यहोवाकडील बोध व शिस्त यांच्या योगे प्रतिपाल” करण्याची जबाबदारी पूर्ण करीत असता सर्व ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांकडे चांगले लक्ष देण्यास हवे.—इफिस. ६:४.
१८ तुमच्या पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे: अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या सर्वांना पुरेशा बसण्याच्या जागा, प्रकाशने, अन्न व इतर तरतुदी उपलब्ध असण्यासाठी पुष्कळ योजना व परिश्रम केले जात आहेत. या परिणामकारक योजनांची खात्री देण्यासाठी प्रत्येक मंडळीस विशिष्ठपणे खास अधिवेशनासाठी नेमणूक दिली आहे. अधिक गर्दी टाळण्यासाठी तुमचे पूर्ण सहकार्य महत्वाचे आहे. अर्थात, अशी परिस्थिती असेल की जी काही थोडक्यांना अधिवेशनास इतर भागात उपस्थित राहाणे जरूरीचे बनवेल. तथापि अधिकांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी अधिवेशनात उपस्थित राहावे.—१ करिं. १३:५; फिलि. २:४.
१९ बैठका राखून ठेवण्याबाबत तुमच्या पूर्ण सहकार्याबद्दल विनंती केली जात आहे. कृपया हे लक्षात ठेवा की जागा केवळ तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठी राखल्या जाव्यात. इतरांसाठी कृपया जागा राखून ठेवू नका. कांही वेळेस जादा जागा राखल्या जातात पण त्या कोणासाठीही नसतात. हे निर्दयीपणाचे व ॲटेन्डन्ट तसेच उपलब्ध जागा शोधणाऱ्यांची दिशाभूल करण्यासारखे आहे. पवित्र शास्त्राच्या सूचनेनुसार आम्ही बंधुभाव प्रदर्शित केला पाहिजे व जागा राखून ठेवण्याच्या मान्य योजनेसोबत पूर्ण सहकार्य केले पाहिजे. जागा मोफत आहेत याचा अर्थ कोणालाही आपल्या मित्रपरिवारासाठी हव्या त्यापेक्षा अधिक जागा राखण्याचा हक्क नाही.—२ पेत्र १:७.
२० रात्रीच्या वेळीच जागा धरून ठेवण्याची परवानगी नाही. स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या बांधवांशिवाय कोणालाही सकाळी ७ च्या आधी अधिवेशनाचे सभागृह उघडे करून दिले जाणार नाही. या स्वयंसेवक बांधवांना सुद्धा बाकीचे सकाळी ७ नंतर आत येईपर्यंत जागा राखून ठेवण्याची मुभा नाही. ॲटेन्डन्ट सेवक आपल्या नेमून दिलेल्या जागी या वेळेच्या आधी येतील व नियुक्त वेळी सभागृह उघडल्यावर ज्या हालचाली होतील त्यावर नियंत्रण राखतील. याद्वारे संस्थेने जागा राखून ठेवण्याविषयी जे निर्देश दिले आहेत त्यांचे पालन होऊ शकेल. कृपया ॲटेन्डन्टसोबत पूर्ण रुपाचे सहकार्य द्या, कारण ते सर्व उपस्थितांच्या फायद्यास्तव आपले काम करीत असतात.
२१ अधिवेशन ठिकाणी व्यक्तीगत वस्तु आणताना विचारीपणाचा उपयोग करण्याचे सुचविले जाते. गत काळात, काहींनी मोठमोठे कुलर्स व इतर बोजड वस्तु आणल्या होत्या ज्या त्यांच्या खुर्चीखाली ठेवता आल्या नाहीत. त्या रांगातून किंवा खुर्च्यावर ठेवल्या होत्या, याचा परिणाम इतरांना जागा मिळण्यापासून वंचित ठेवण्यास व कांहीवेळेस त्याने आग व सुरक्षिततेचे नियम उल्लंघले. आम्हास अशा गोष्टीत विचारीवृत्ती दाखविण्याची गरज आहे.
२२ कृपया याची काळजी घ्या की, अन्न तसेच अधिवेशनातील इतर तरतुदींचा अपव्यय होऊ देऊ नका. गेल्या वर्षीच्या अधिवेशनात कचऱ्याच्या टोपल्यात सबंध सँडवीचेस् व इतर अन्न टाकलेले आढळले. हा प्रकार, जे औदार्य बंधूवर्गाने दाखवले आहे त्याची विटंबना करण्यासारखा व शास्त्रवचनीय तत्त्वांचे उल्लंघन करणारा आहे.—योहान ६:१२.
२३ यहोवाच्या लोकांना सुंदर सुविधा असणाऱ्या जागी एकत्रित होणे व आनंदी आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेणे याची रसिकता निश्चितपणे वाटते. अशा या मेळाव्यात पुरविल्या जाणाऱ्या सर्व सुविधा तसेच सेवा यांचे आम्हाला मोल वाटते. अधिक काळजी तसेच संस्थेकरवी केल्या जाणाऱ्या बऱ्याच खर्चाने अधिवेशनाच्या पुरेशा बैठका, ध्वनिक्षेपण सामग्रीची व्यवस्था, प्रभावी भोजन सेवा पुरविणे आणि इतर व्यवस्था व सेवा प्रदान करणे या गोष्टी संपन्न केल्या जातात व यामुळेच अधिवेशनास उपस्थित राहणे हे आनंददायक व आध्यात्मिकरित्या तजेला देणारे ठरते.
२४ हा सर्व खर्च तुम्ही संस्थेच्या जागतिक कार्यासाठी जे ऐच्छिक अनुदान देता त्यावर भागविला जातो. यासाठीच, तुम्हास दिसू शकतील अशी स्पष्टपणे लिहिण्यात आलेली अनुदान पात्रे अधिवेशनाच्या सभागृहात ठेवलेली असतात. सर्व अनुदानांविषयी खरी आत्मीयता व्यक्त केली जाते. तद्वत, तुम्ही राज्य आस्थेसंबंधाने या प्रकाराने जे औदार्ययुक्त अनुदान द्याल त्याविषयी संस्था तुमचे आगाऊच आभार मानू इच्छिते. अनुदान किती द्यावे याची रक्कम ठरविण्यात आलेली नाही याविषयी एका बांधवाने रसिकतापूर्णतेने लिहिले. तो म्हणतोः ‘हे अनुदान आमच्या इच्छेवर, आमच्या पसंतीवर सोडण्यात आले आहे हीच गोष्ट आम्हाला भारावून टाकते. या कारणामुळे आम्हाला, वाजवीपेक्षा अधिक द्यावे अशी चालना मिळत राहते.’ एकंदरीत खर्चासंबंधाने सर्वजण आपापल्या वैयक्तीक जबाबदारीची जाण राखतील आणि परिस्थितीनुसार शक्य आहे तेवढे सहकार्य दिले जाईल असा आत्मविश्वास आम्ही बाळगतो.—लूक ६:३८.
२५ “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनास उपस्थित राहा! “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनास येऊन कार्यक्रमास नीट लक्ष देऊन आम्हाला, ख्रिस्ताद्वारे लाभणाऱ्या स्वातंत्र्याचे महत्त्व तसेच या ख्रिस्ती स्वातंत्र्याच्या योग्य वापराची अधिक रसिकता वाटू लागेल. तेव्हा आत्ताच योजना निश्चित करा व अधिवेशनाच्या पहिल्या गीताला उपस्थित राहून सर्व कार्यक्रमास हजर व्हा व रविवारी दुपारच्या शेवटल्या प्रार्थनेपर्यंत आपली उपस्थिती दाखवा.
[६ पानांवरील चौकट]
प्रांतिय अधिवेशन स्मरणिका
राहण्याच्या व्यवस्था: अधिवेशनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या राहण्याच्या जागांचा उपयोग करण्यातील तुमच्या सहकार्याची फारच गुणग्राहकता बाळगली जाते. तुमच्या जागेचे आरक्षण रद्द करणे तुम्हास जरूरीचे वाटते तर तुम्ही हॉटेलला सरळपणे लिहावे किंवा फोन करावा असे करणे शक्य तो लवकर करावे ज्यामुळे खोली दुसऱ्या कोणास उपलब्ध करून दिली जाईल.
बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी विशेष आयोजित केलेल्या विभागात त्यांच्या खुर्चीवर असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विनयशील असा अंघोळीचा पेहराव व टॉवेल जे बाप्तिस्मा घेण्याची इच्छा करतात त्या प्रत्येकाने आणावा. बाप्तिस्म्याचे भाषण व वक्त्याने केलेल्या प्रार्थनेनंतर, कार्यक्रम अध्यक्ष बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना संक्षिप्त सूचना देतील व नंतर गीत होईल. शेवटच्या ओळीच्या सुरुवातीस ॲटेन्डन्ट बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना बाप्तिस्मा ठिकाणाकडे किंवा त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनाकडे मार्गदर्शित करतील तेव्हाच उपस्थित सर्व गीताचे गायन पूर्ण करतील. बाप्तिस्मा हा एखाद्याच्या समर्पणाचे द्योतक असून ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्तीमधील वैयक्तीक व खाजगी बाब आहे हे पाहता भागीदारीचा बाप्तिस्मा संबोधला जातो ती तरतुद येथे नाही ज्यात दोन किंवा अधिक बाप्तिस्मा घेणारे उमेदवार बाप्तिस्मा देताना मिठी मारतात किंवा हात पकडतात.
पायनियर ओळखपत्र: सर्व रेग्युलर व स्पेशल पायनियर्स तसेच प्रवासी देखरेखे यांनी त्यांचे वॉचटॉवर आयडेन्टीफिकेशन ॲन्ड असायनमेन्ट कार्ड (एस्-२०२) अधिवेशनास आणले पाहिजे. ते उपस्थित राहणाऱ्या प्रांतिय अधिवेशन काळापर्यंत सहा महिने यादीवर असणाऱ्यांना ६० रूपयांची अधिवेशन फूड टिकीट्स त्यांचे ओळखपत्र दाखविल्यानंतर केवळ एका अधिवेशनासाठी मिळतील. यास्तव कार्डला पैश्याप्रमाणे काळजीपूर्वक जपावे. ते अधिवेशनात बदलून मिळू शकत नाही. कोणतेही नवीन प्रसिद्ध होणारे प्रकाशन बक्षीस म्हणून किंवा इतर प्रकाशने पायनियर दरावर पुस्तक खात्यामध्ये ओळखपत्र दाखविण्यानेच मिळेल. बेथेल सेवेमध्ये असणारे त्यांचे बेथेल ओळखपत्र दाखविण्याने ते प्राप्त करतील.
स्वयंसेवक सेवा: प्रांतिय अधिवेशनाच्या सुरळीत कार्य प्रवणासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे. तुम्हास अधिवेशनाच्या विशिष्ठ भागामध्ये काम करणे शक्य असेल तरीही तुमच्या सेवेची कदर जाणली जाईल. तुम्ही मदत करू शकाल तर कृपया तुम्ही अधिवेशन ठिकाणी याल तेव्हा स्वयंसेवक विभागास ते कळवा. १६ वर्षे वयाखालची मुले ही अधिवेशनाच्या यशस्वीपणास हातभार लावू शकतात, पण त्यांनी त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या सोबत काम करण्याची आवश्यकता आहे.
लेपल कार्डस: कृपया खासपणे आयोजित केलेली लेपल कार्ड अधिवेशनात व अधिवेशन ठिकाणाकडे येताना किंवा जाताना ती परिधान करा. हे आम्हास प्रवास करताना उत्तम साक्ष देणे शक्य करून देते. लेपल कार्डस तुमच्या मंडळीतून प्राप्त केली जावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतात. बॅज होल्डर्स मंडळीने ऑर्डर करून मागविण्यास हवीत. पण लेपल कार्डस् मंडळ्यांना पाठविण्यात येतील. होल्डरची किंमत रु. १ व कार्डची किंमत २० पैसे.
सावधानतेचा इशारा: तुम्ही तुमचे वाहन कोठेही लावत असाल पण ते सर्ववेळी कुलूप लावलेले व त्यात दिसेल असे कांही कधीही ठेवू नका. शक्य असेल तर तुमच्या मालकीच्या वस्तु ट्रंक मध्ये कुलुप लावून ठेवा. तसेच चोर व खिसेकापू यापासून सावध असा कारण लोकसमुदाय पाहून ते आकर्षित होतात. यामध्ये अधिवेशनातील खुर्च्यावर काहीही मोलवान कोणाच्या देखरेखीशिवाय सोडू नये हे समाविष्ठ आहे. कृपया दक्षता घ्या.
असे कळविले गेले आहे की काही हॉटेल्स टेलिव्हीजनवर अनैतिकता काय पण अश्लीलता असणाऱ्या चित्रपटाच्या सोई पुरवितात. अशा राहत्या ठिकाणी लेकरांनी देखरेखीविना टी.व्ही. पाहणे टाळावे या निकडीवर हे प्रकाशझोत टाकते.