वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९१ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • पुढाकार घेणारे ओव्हरसियर —सेक्रेटरी
    आमची राज्य सेवा—१९९८
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९४
  • तुम्ही दुसरीकडे राहायला जाणार आहात का?
    आमची राज्य सेवा—१९९९
  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ३/९१ पृ. ३

प्रश्‍न पेटी

● जेव्हा एखादा प्रचारक दुसऱ्‍या ठिकाणी स्थलांतरित होतो तेव्हा नव्या मंडळीला त्याच्या बदलीविषयीची सहायता करण्यासाठी काय करता येईल?

कोणी प्रचारक जेव्हा नव्या मंडळीत येतो तेव्हा नव्या मंडळीच्या सचिवाने या प्रचारकाकडून त्याच्या पूर्वीच्या मंडळीचे नाव व तेथील मंडळीच्या सचिवांचा पत्ता मिळवावा. मग या सचिवाने त्या मंडळीच्या सचिवाला लिहून त्यांजकडून मंडळीचे पब्लिशर्स रेकॉर्ड कार्ड व प्रास्ताविक ओळख देणारे पत्र मागवावे. हे पत्र मिळताच पूर्वीच्या मंडळीच्या सचिवाने त्वरेने कारवाई करावी; त्यामध्ये विलंब लावू नये.—पहा ऑर्गनायझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री, पृष्ठे १०४-५.

जो प्रचारक स्थलांतरित होत आहे त्याने, जेथून तो स्थलांतरित होत आहे त्या त्याच्या मंडळीचे अचूक नाव तसेच सचिवाचे नाव व त्यांचा पत्ता हे सर्व अचूक असल्याची खात्री करावी. मग, नव्या मंडळीत आल्यावर ही माहिती त्याने नव्या मंडळीतील सचिवांना द्यावी म्हणजे ते त्वरित हालचाल करू शकतील. नव्या मंडळीत दिलेले प्रचार कार्याचे अहवाल त्याचे पब्लिशर्स कार्ड येईपर्यंत राखून ठेवले जाऊ शकतात. मग, त्या प्रचारकाचे कार्य त्या कार्डावर लिहिले जावे व तो अहवाल मंडळीच्या पुढील महिन्याच्या अहवालात समाविष्ट करावा.

काही प्रकरणात कदाचित प्रचारकाला, तो कोणत्या नव्या मंडळीशी संलग्न राहणार त्या मंडळीच्या सचिवाचे नाव व त्यांचा पत्ता माहीत असेल. अशा वेळी वडीलांनी त्या मंडळीतून विचारणा येईपर्यंत थांबण्याची गरज नाही. ते त्या प्रचारकाचे कार्ड व सोबत प्रास्ताविक ओळख देणारे पत्र लगेच जेथे तो प्रचारक जाणार आहे त्या नव्या मंडळीच्या सचिवांना पाठवू शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा