वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९१ पृ. ३
  • यहोवाची गायनाने स्तुती करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची गायनाने स्तुती करणे
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे गुणगान करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • हर्षाने यहोवाची स्तुती करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • आधुनिक उपासनेतील संगीताचे स्थान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाचे स्तवन करू या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ३/९१ पृ. ३

यहोवाची गायनाने स्तुती करणे

१ आपले गीताचे पुस्तक उघडून कृपया मागचे पान काढा. तुम्हाला काय दिसते? यहोवाच्या पवित्र मंदिरात लेव्यांचा गायकवृंद आहे, त्यांची तोंडे उघडी आहेत व ते मोठ्या उत्साहपूर्ण रितीने व आवेशाने गाणे गात आहेत. यहोवाच्या मंदिरातील खऱ्‍या भक्‍तीमध्ये गायन हा महत्त्वाचा प्रकार होता. दावीद राजाच्या काळी मंदिरात सेवा करणाऱ्‍यांतील १० टक्क्यापेक्षा अधिक लोकांना यहोवाची स्तुती संगीताद्वारे करण्याचे नेमून देण्यात येत असे. तो २८८ लोकांचा आकडा पूर्ण प्रशिक्षण लाभलेले गायक, “तरबेज झालेले” असे होते.—१ इति. २३:३, ५; २५:७.

२ ख्रिश्‍चनांच्या काळी आल्यावर, येशू व त्याच्या प्रेषितांनी प्रभुच्या सांज भोजनाच्या शेवटी गीत म्हटल्याचे आपल्याला कळते. (मार्क १४:२६) शिवाय प्रेषित पौल देखील आपल्याला वारंवार आमच्या देवाची स्तुती गाण्यास सांगतो. त्याने कलस्सैकर ३:१६ मध्ये लिहिलेः “ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो; परस्परांस सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा.”—तसेच इफिसकर ५:१९, २० देखील पहा.

३ यहोवाची स्तुती करण्याचा एक मार्ग म्हणजे राज्याची गाणी गाणे हा होय. तर मग, आम्ही अगदी अंतःकरणपूर्वक गाणे म्हणू नये का? आम्ही तसे म्हणतो तेव्हा देवाची स्तुती करीत असतो. आम्ही जशा त्याला प्रार्थना म्हणतो त्याचप्रमाणे त्याला उद्देशून गाणी म्हणत असतो तेव्हा तो त्यांचे श्रवण करीत असतो. आम्ही मोकळ्या मनाने गातो तेव्हा इतरांनाही आनंद देऊ शकतो व आम्हाला देखील वैयक्‍तीकपणे लाभ मिळत असतो.

४ आमच्या गायनाचे जे सुंदर शब्द आहेत त्याकडे विचारपूर्वक लक्ष द्या. ते खरेच आम्ही “परस्परांस . . . शिकवण [व] बोध” करण्यामध्ये आम्हाला साहय्य करतात. आमच्या गायनात किती सुंदर सूचना समाविष्ट आहेत! हा सल्ला गंभीरपणे अनुसरल्यास आम्हाला आत्म्याची फलप्राप्ती जोपासण्यात, त्यामध्ये वाढ करीत जाण्यात आणि दैहिक, जागतिक प्रभावाविरुद्ध दक्ष राहण्यात मदत दिली जाते. ‘आपल्या अंतःकरणात गायन कर’ण्यामुळे यहोवाची सेवा निर्भिडपणे तसेच उत्साहाने करीत राहण्याचे उत्तेजन लाभते.

५ सभेमध्ये गाण्याची सुरवात चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी ते गीत गावयास सांगणाऱ्‍या अध्यक्षांनी गीताचा केवळ क्रमांकच नव्हे तर त्याचे शीर्षक देखील सांगावे. या गीतासाठी जो शास्त्रवचनीय आधार आहे तो कधी कधी ते बांधवांच्या लक्षात आणून देऊ शकतील तसेच सभेत सादर होणाऱ्‍या माहितीसोबत त्याचा कसा संपर्क आहे ते अगदी त्रोटकपणे सांगू शकतील.

६ आमच्या कुटुंबाने गीतासोबत चांगले परिचित होण्यासाठी किंग्डम मेलडीज्‌ तसेच पियानोवर वाजविलेली व ध्वनिफितींवर मुद्रित असणारी गीते खूपच उपयुक्‍त आहेत. पार्श्‍वभूमीतील संगीत या अर्थाने ते वाजविल्यामुळे आम्हाला आमच्या गायनांशी आनंदाने परिचित होता येते.

७ आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे गुणगाण गीतांद्वारे करण्याचे आमचे जे कर्तव्य आहे त्याविषयी शास्त्रवचने आम्हाला वेळोवेळी स्मरण देतात. यास्तव आपण ते पूर्ण अंतःकरणाने करू या. यामुळे आपल्याला आमच्या सभांसाठी येणाऱ्‍या अपरिचित लोकांना एक उबदार साक्ष देता येईल. होय, प्राचीन काळच्या दाविदाने केले त्याप्रमाणे आपण देखील यहोवास गीत गाऊन त्याचा जयजयकार करू या.—स्तोत्र. १०८:१-३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा